खुप दिवसांनी संस्कृत वाचायला मिळालं.
उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभा: मंत्रपाठका:।
परस्परं प्रशसन्ति अहोरूपमहोध्वनि:॥
हा आमचा आवडता श्लोक. एखाद्या राजकीय पक्षाची सभा असो वा अनेक ह. भ. प. उपस्थित असलेल्या एखाद्या हरीनाम सप्ताहातलं किर्तन असो, व्यासपिठावर चाललेलं गुणगान ऐकताना हा श्लोक आम्हाला राहून राहून आठवतो.
- फटू
पहिल्या तीन चरणात असे प्रश्न रचलेले आहेत, ज्यांची उत्तरे शेवटच्या चरणात एकेक शब्दाद्वारे अनुक्रमे मिळतात!
अगदी असंच "तक्रम् शक्रस्य दुर्लभम्" असा शेवटाचा चरण असलेलं एक सुभषित
भोजनान्ते च किं पेयं जयन्तः कस्य वै सुतः|
कथं विष्णुपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभम्||
जेवण झाल्यावर कोणते पेय प्यावे - ताक
जयन्त हा कोणाचा मुलगा आहे - इन्द्राचा
विष्णुपद मिळण्यास कसे आहे - दुर्लभ - अतिशय अवघड
ताक इन्द्राला (मिळण्यास) अतिशय अवघड
अजून येउदेत :)
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
- अस्मिता
शाळेत असताना संस्कृत भाषा अभ्यासाला होती आणि ती मला अतोनात आवडली पण होती. पाठ्येतर संस्कृत भाषांतर, सार्थ सुभाषितानि यासारखी पुस्तके मी वारंवार वाचली होती. भविष्यकाळातही संस्कृतशी संबंध कायम ठेवायचा असे ठरविले होते. पण कॉलेजात गेल्यानंतर संस्कृत तर दूरच राहिले मराठीशीही संबंध कमी झाल्यासारखे झाले.गेल्या अनेक वर्षांत मी हाताने मराठी लिहिलेले नाही.आणि नंतरच्या काळात अर्थशास्त्र आणि आय.आय.एम मध्ये गेल्यानंतर फायनान्स यासारख्या संस्कृतइतक्याच सुंदर विषयांचा परिचय झाला आणि सगळ्या गडबडीत संस्कृत कुठच्या कुठे मागे पडले. काव्यशास्त्रविनोदा: च्या आतापर्यंत आलेल्या दोन भागांमुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि त्याबद्दल मेघवेडा यांना धन्यवाद.
संस्कृतात सज्जन आणि दुर्जन यांची तुलना करणारे अनेक श्लोक आहेत.तसेच कालिदासाची हिमालयो नाम नगाधिराज: नावाची कविता आम्हाला शाळेत असताना होती. ’हिमालयात राहणारे हत्ती आपल्या गालाला आलेली कंड शमविण्यासाठी चंदनाच्या झाडाला आपले गाल घासतात आणि त्यामुळे झाडातून आलेल्या चिकामुळे सबंध आसमंत दरवळून जातो’ एवढा सगळा अर्थ कालिदासाच्या मोठ्या दोन शब्दांमध्ये ’कॅप्चर’ झाला होता असे आठवते. जमल्यास त्याविषयीही लिहावे ही विनंती.
क्लिंटन
केशवं पतितं दृष्ट्वा पाण्डवा: हर्षनिर्भरा:।
रोदन्ति सर्वे कौरवा: हा हा केशव केशव ॥
^^^^^^^^^^^^
इथे
रुदन्ति कौरवा: सर्वे हा हा केशव हतः हतः ।
अशी पंक्तीही मिळते.
आणि
केशव = के (क = पाणी, सप्तमी विभक्ति = पाण्यात / पाण्यातील) + शव = प्रेत --> पाण्यातील प्रेत
असा अर्थ घ्यावा.
प्रतिक्रिया
फारच
मस्त मस्त
उच्च. दोन्ह
मस्तच...
सुरेख
+१
ह्म्म्म्म सही
वाचतोय...
अप्रतिम!!
सुंदर
केशवं पतितं दृष्ट्वा पाण्डवा: