Skip to main content

अन्तर्यात्रा

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 04/02/2011 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
ओवीबद्ध अनुवाद: हृदयकुहरीच्या| गाभार्यात साच| ब्रह्म एकलेच| प्रकाशते|| आत्मस्फुरणेने | सनातन सत्य| 'मी' 'मी' असे नित्य| प्रत्यया ये|| कोहम शोध घेता| मन हो विलीन| ईशपदी लीन| हृदयांतरी|| रोधुनिया प्राण| होई आत्मनिष्ठ| बाकी इष्टानिष्ट| नसे काही|| मूळ श्लोक: हृदयकुहरमध्ये केवलं ब्रह्ममात्रं ह्यहमहमिती साक्षादात्मरूपेण भाती हृदिविशमनसा स्वम चिन्वता मज्जता वा पवनचलनरोधात आत्मनिष्ठो भवत्वं - भगवान रमण महर्षी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2049
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आपल्या ब्लॉगवर रमण महर्षींचा हा श्लोक वाचला होता. अनुवाद फार सुरेख जमला आहे. प्राण म्हणजेच पवन असा अर्थ येथे होतो काय?

In reply to by शुचि

इथे तसाच अर्थ होतो. अनुदिनीवर सविस्तर लिहीले आहे. प्रतिसाद देणार्या सर्वाना धन्यवाद.

(एका ख. व. मधील एक सुरेख वाक्य वाचून सुचलेल्या ओव्या) सहज प्रासादिक| भक्ताची प्रवृत्ती| वृत्ती ची "निवृत्ती"| तेणे साध्य|| केले गंगार्पण| वृत्तीचे निर्माल्य| उरले कैवल्य| "ज्ञानदेव"| अमला भक्तीने| चित्ती समाधान| ज्ञानाचा "सोपान"| प्रकटला|| ज्ञानाच्या उजेडी| मायेचा अंधार| लोपला साचार| तीच "मुक्ती"||

खरे सांगतो, श्लोक अजिबात झेपला नाही! तू लिहिलेला अनुवाद मात्र नीट समजला.. हृदयांतरी हे जास्त महत्त्वाचे! शीर्षक समर्पक आहे अनुवादाला!! :) राघव