✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बेळगावी मांडे

अ
अजय जोशी यांनी
Mon, 06/09/2008 - 13:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4975 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Mon, 06/09/2008 - 13:07 नवीन

ते मांडे

ते मांडे चविष्ट असतात की हो अगदी, म्हणते मी!! आवडले की नाही तुम्हांला??
  • Log in or register to post comments
ल
लडदू Mon, 06/09/2008 - 13:08 नवीन

सीमा प्रश्न का सुटत नसेल ते आत्ता कळाले

>> सीमा प्रश्न का सुटत नसेल ते आत्ता कळाले तुम्हाला एका खाद्यपदार्थाचे नाव माहीत नाही हे सीमा प्रश्न न सुटण्याचे कारण ?! असो. ================================ खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Mon, 06/09/2008 - 13:43 नवीन

ज्ञानेश्वरांचे मांडे हेच का?

म्हणजे मुक्ताईने ज्ञानदेवांच्या पाठीवर डोसे भाजले होते ??
  • Log in or register to post comments
म
मधु मलुष्टे Mon, 06/09/2008 - 17:00 नवीन

(मनातले) डोसे..

मांडे म्हणजे डोसे नाही, कोणत्याही अर्थाने.. मांडे हा खास (?) बेळगावचा पदार्थ चवीने गोड आणी दिसायला रुमाली रोटीसारखे, ते पालथ्या घड्यावर भाजतात,दुधाबरोबर खातात. बाकी पाकक्रीया इतर मंड्ळी देतीलच... (माझ्या माहीती प्रमाणे) मुक्ताईने ज्ञानदेवांच्या पाठीवर भाजले होते ते हेच.. कोण तो बेळगावचा आहे ..माहीती द्या हो जरा.. नक्की करायचे असेल तर विसोबा खेचर आहेतच (ह्.घ्या.) (१२,)१३
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Tue, 06/10/2008 - 02:15 नवीन

माझ्या माहितीतली पाकक्रिया

माझ्या माहितीतली पाकक्रिया इथे देते. (बेळ्गावी मांडे असेच असतात का ह्याचा जाणकारांनी उलगडा करावा.) मळण्यासाठी साहित्यः ३ कप मैदा, पाऊण कप दूध, २ चमचे तूप सारणाचे साहित्यः २ कप पिठीसाखर , अर्धा ते पाऊण कप पोह्याची पूड , १/२ कप भाजलेले तीळ , १२-१४ वेलची ...पूड केलेली तळ्ण्यासाठी : तूप (तेल ही चालेल.) कृती : मैदा, दूध, तूप एकत्र करा आणि घट्ट मळून घ्या. सारणाचे साहित्य एकत्र मिसळून घ्या. मैद्याच्या पात़ळ पुर्‍या लाटून घ्या. (साधारण १२ सेमी व्यासाच्या.. पुर्‍या खूप मोठ्या लाटल्यास तळ्ण्यासाठी मोठी कढई घ्यावी लागेल आणि मग तेल / तूप हि जास्त घालावे लागेल. पुर्‍या पातळ च लाटाव्यात.) तूप गरम झाल्यावर पुर्‍या तळून घ्या. पुर्‍या फार कुरकुरीत आणि लाल तपकीरी नकोत. मऊ आणि पांढर्‍याच राहिल्या पाहिजेत. त्यांमुळे जास्त वेळ तळू नये. कढईतून पटकन बाहेर काढून गरम असतानाच पीठीसाखरेचे सारण २ चमचे त्यावर पसरवा. सारण अर्ध्या भागावरच पसरावे. मग पुरीची अर्धी घडी घालावी. आता परत अर्ध्या भागावर १/२ ते १ चमचा सारण पसरावे आणि परत अर्धी घडी घालावी. असे त्रिकोणी आकारातील मांडे थाळीत एकावर एक न ठेवता वेगवेगळे मांडून ठेवावेत. खायला खूप चविष्ट लागतात. टीपः सारण गरम गरम पुरीवरच पसरावे. म्हणजे पीठीसाखर व्यवस्थित पुर्‍याना चिकटते. पोह्याची पूड करण्यासाठी पोहे थोडेसे भा़जून घेऊन गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडीभरडी पूड करा. मांडे गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवल्यास ७-८ दिवस छान रहातात. ईश्वरी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा