✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कर्तव्य

व
विनायक प्रभू यांनी
गुरुवार, 02/03/2011 - 13:25  ·  लेख
लेख
" काल रात्री कुणीतरी मिल्टन नावाची बाई तुम्हाला फोन करत होती" उठवायचस ना. "रात्री एक वा़जता"? काय म्हणत होती? "नीटसे काय कळत नाही. पण अमेरिकन वाटत होती. कोण ही"? माहीत नाही ब्वॉ? "तुम्ही परत फोन लावा बघु माझ्या समोर. काय ते मला पण कळू दे" वेडी की काय तु. अमेरिकेला फोन लावायची जहागिरदारी ? हॅट. असेल गरज तर परत फोन करेल. ----------------------------------------------------------------------------------------- "उठा आता. बघा तीच बया परत फोनवर आहे. काय बोलते आहे ते कळले तर शप्पथ." हॅलो. "प्र्फुमॅस्टर, मी पॅरिस हिट्लन . जरा काम होते तुमच्या कडे." माझा नंबर कुणी दिला हो तुम्हाला. "तुमच्या इथल्या एका मित्राने" बोला काय काम काढलेत. लवकर सांगा. उगाच जिलेब्या पाडू नका. इथे रात्रीचा एक वा़जला आहे. "मला लग्न करायचे आहे" बर मग? त्याचा माझ्याशी काय संबंध. माझे लग्न होउन २५ वर्षे झालीत. आता ह्या वयात आणखी एक करायची काही एक इच्छा नाहीये. "अहो मला एका होतकरु भारतीय मुलाशी लग्न करायचे आहे. तुमच्या ओळखीत कुणी असेल तर सुचवा" सर्व जग सोडुन भारतीय? "अहो तुम्ही मायलेज ऑब्सेस्ड नेशन आहात ना म्हणुन." बर बर. काय अपेक्षा.? " स्मार्ट असायला हवा. शिकला सवरलेला. वर्जीन. देवा वर विश्वास असलेला. मल्टी टास्कींग ची आवड असलेला. लेखक असला तर उत्तम. संस्कॄत येत असेल तर फारच छान. फायनानशीयल मॅटर मधे जाणकार असेल तर अगदी दुधात साखर" वयाची अट? "वरील सर्व गुण असतील तर अधीक उणे चालतय. पण तुमची ओळख महत्वाची." ते कशाला बॉ? "ते लग्न झाल्यावर सांगेन. आत त्याची चर्चा नको." तुम्हाला प्री न्युप इ मेल करते. माझा फोटो पाठवायची गऱज आहे असे वाटत नाही. टाइम्स मधे परवा आला आहेच. अ‍ॅगल जर बोल्ड आहे. पण चालुन जाईल. हवे असले तर पत्रिका पण पाठवते. तुमच्या साईट वर जे महाराज आहेत त्यांच्याकडुन जुळवुन घ्या." अजुन काही? "ज्यांच्याशी माझी पत्रिका जुळेल त्याचा फोटो व प्री न्युप पाठवा. ___________________________________________________ मी जुळणारी पत्रिका करुन घेतो. जास्तीत जास्त काय महाराज 'विशिष्ट सेवा' म्हणुन जादा आकार घेतील. चालेल. नानासाठी मला दोन पाचशे काही मोठे नाहीत. ---------------------------------------------------------------------------------------- लग्न आमच्या बिल्डींग च्या गच्चीवर. शाकाहारी जेवण - सौ. मास्तर मांसाहारी जेवण-गणपा सनई वादन्-छोटा डॉन मद्यपान सेवा-पिंडा काका उठबस्-टारझन आलेल्या पाहुण्याबरोबर विचारांचे आदान प्रदान- रामदास पत्रिका छपाई-श्रामो मंगलाष्टके-शरदीनी आणि रेवती ताई बाकी काही राहीलेली कामे असतील तर नावे सुचवा. सर्वात महत्वाचे नानाला प्री न्युप काय असायला पाहीजे त्या बाबत संपुर्ण सल्ला द्या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12436 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

आम्हाला पण 'डिझायनर्स सारीज'

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 02/03/2011 - 19:00 नवीन
आम्हाला पण 'डिझायनर्स सारीज' हव्यात !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तुझे सोड पन नाना आनि ती

मुलूखावेगळी
गुरुवार, 02/03/2011 - 21:32 नवीन
तुझे सोड पन नाना आनि ती हिल्ट्न बाइ हे वरवधु ,उत्सवमुर्ती काय कपडे घालनारेत? कोनता डीझायनर अपॉइन्ट्ट केलाय? बाकि पिन्क फेफुरवारीत लग्न करनारेत फारच रोमॅन्टिक मुहुर्त ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

मधुचंद्राचे गाणे

टारझन
गुरुवार, 02/03/2011 - 21:39 नवीन
हम ना समझे थे बात इतनीसी, ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की !!!!!!!!!!
चित्रप्टात पाहिल्याप्रमाणे जर पॅरिस हिल्टण ने हनिमुनच्या रात्री आपल्या सहितले गाणे गायले तर ? हे इमॅजिन केले , आणि ठसका लागला :) - फिल्मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

=))

नितिन थत्ते
गुरुवार, 02/03/2011 - 21:41 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तुमचे आपले काहीपन हा ती हे

मुलूखावेगळी
Fri, 02/04/2011 - 09:58 नवीन
तुमचे आपले काहीपन हा ती हे गाणं म्हन्नारच नाही मुळी ती नाना वाले गाने म्हनेल उदा- नाना ना रे नाना ना रे, नाना करते प्यार है मै कर गयी नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे , वगेरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तुला बरं एवढं कणफर्म माहित ती

टारझन
Fri, 02/04/2011 - 10:19 नवीन
तुला बरं एवढं कणफर्म माहित ती काय म्हणेल काय नाय ते :) ठिकाय , नाना दुध पिता पिता हे गाणे म्हणेल ...
हम ना समझे थे बात इतनीसी, ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की !!!!!!!!!!
भावार्थ तोच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

तुला बरं एवढं कणफर्म माहित

मुलूखावेगळी
Fri, 02/04/2011 - 10:22 नवीन
तुला बरं एवढं कणफर्म माहित कि नाना दुधच पितो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हो माहित्ये !! नानाशी रोज

टारझन
Fri, 02/04/2011 - 10:33 नवीन
हो माहित्ये !! नानाशी रोज खर्डाखर्डी होते ... तुमची न प्यारीस काकुंची होते का हो अशी खर्डाखर्डी मावशी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

नाही खर्डाखर्डी नाही पन त्या

मुलूखावेगळी
Fri, 02/04/2011 - 11:05 नवीन
नाही खर्डाखर्डी नाही पन त्या गबोल वर भेटतात अजुन नाहीत त्या मिपावर नानानी मांग भरलयाशिवाय आनि दोरलं बान्धल्याशिवाय त्या मिपावर येनार नाहीत असे म्हनत होत्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

प्यारीस नाना समोर नववारीत उभी

प्यारे१
Fri, 02/04/2011 - 11:46 नवीन
प्यारीस नाना समोर नववारीत उभी राहून हातात कुंकवाचा करंडा घेऊन 'माँग भरो सजना' हे गाणं म्हणतेय असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले ...आणि डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

सब्से बडा खिलाडी

वपाडाव
Fri, 02/04/2011 - 14:52 नवीन
मला थोडा वेगळे आठवलाय... प्यारीस अन नाना दोघेही हुबे राह्यलेत... (ममता कुल्कार्ण्याची हो... अन अक्षय कुमार सारखे ,सब्से बडा खिलाडी चित्रपटात) नाहीत का ते एका गाण्यात... जवा ती म्हणते "भरो, मांग मेरी भरो..."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मी व माधुरी फुले व पेढे

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 02/03/2011 - 17:38 नवीन
मी व माधुरी फुले व पेढे वाटु..तेवढेच मिरवायचा चान्स ;)
  • Log in or register to post comments

मंगलाष्टकात मला भडकमकर

रेवती
गुरुवार, 02/03/2011 - 18:51 नवीन
मंगलाष्टकात मला भडकमकर मास्तरांची मदत?
  • Log in or register to post comments

आणी नविन वहिनिला नाव घ्यायला

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 02/03/2011 - 19:03 नवीन
आणी नविन वहिनिला नाव घ्यायला पण शिकवा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मंगलाष्टके इथे ऐका ! Powered

नरेशकुमार
गुरुवार, 02/03/2011 - 19:16 नवीन
मंगलाष्टके इथे ऐका ! Image removed.
Powered by mp3skull.com" alt="" />
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हाहाहाहा... हसुन हसुन

पिंगू
गुरुवार, 02/03/2011 - 19:02 नवीन
हाहाहाहा... हसुन हसुन लोळतोय... नान्याचं लग्न... म्हणजे नान्याची वरात लंडनच्या घरात... - पिंगू
  • Log in or register to post comments

आइया आम्हाला पण विमानाने

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 02/03/2011 - 19:08 नवीन
आइया आम्हाला पण विमानाने ळ्ण्द्णला जाता येइल त्या निमित्ताने... काय मज्जा ना!!! हिर्व्या नोटंचा माज म्हणुन हिणवणार्या नानाने शेवटी फॉरेनची बायकोच केली अशी आंतरजालावर चर्च्चा सुरु आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

लंटनाला सर्व वर्‍हाडी मंडळींची सोय

असुर
गुरुवार, 02/03/2011 - 20:15 नवीन
लंटनाला सर्व वर्‍हाडी मंडळींची सोय पुष्कावतीदेवींच्या गावातील जंगलात संपूर्ण नैसर्गिक वातावरणात केली जाईल. कृपया खालील अटी वाचून मगच येण्याचा विचार करावा. १. येताना आपापली पथारी,ताट,वाटी,बॅटरी,शिधा,टिश्यू पेपर घेऊन येण्याचे करावे. २. नुस्ते रिकामे येणार्‍यांची गैरसोय झाल्यास आयोजक जबाबदार नाहीत! ३. फटाके आणू नयेत. आणल्यास वाजवू नयेत. ४. इतके सांगूनही न ऐकल्यास ऐन लग्नात खुर्चीखाली सुतळी बॉम्ब लावायची व्यवस्था करणेत येईल. ५. जंगल आपले नाही. नैसर्गिक मालमत्ता आहे. जपून वापर करावा. उगाच पाने-फुले तोडत फिरु नये. ६. फुंक्या लोकांची सोय निकोटीनयुक्त 'चिंगम' देऊन करणेत येईल. ते खाऊन इकडे-तिकडे थुंकू नये. ७. येण्या-जाण्याचा खर्च स्वत:च करावयाचा असल्याने ज्यांना झेपेल अशांनीच यावे. इकडे आल्यानंतर परतीचे तिकीट नाही म्हणून गळे काढू नयेत. त्यांचा श्री. मेघवेडा यांचेतर्फे व्यायामशाळेत जाहीर सत्कार करणेत येईल! ८. एकदा बुकिंग केल्यावर ते कॅन्सल होणार नाही, किंवा पैसेही परत मिळणार नाहीत. धन्यवाद, असुर सेक्रेटरी, नान्स लगीन लंटन निवास योजना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

माझं करा एक बुकिंग. economic

नरेशकुमार
गुरुवार, 02/03/2011 - 20:17 नवीन
माझं करा एक बुकिंग. economic class नको business class चेच करा. बाकी पैसे कसे पाठवु, चेक नि कि मनी ऑर्ड्रने ? ४ जण आल्यावर काही डीस्काउंट वगेरे काही आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

४ कोन ब्वॉ तुम्ही आनि तुमची

मुलूखावेगळी
गुरुवार, 02/03/2011 - 21:35 नवीन
४ कोन ब्वॉ तुम्ही आनि तुमची बायको २ आनि कोन? मुलं बाळं का यन्दा सासु सासरे ;)? यान्न्ना पन खुश करनार का नानाच्या लग्नाच्या निमित्ताने :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/03/2011 - 20:19 नवीन
च्यायला सर, सिरियसली वाचायला सुरुवात केली होती. '' देवा वर विश्वास असलेला. मल्टी टास्कींग ची आवड असलेला. लेखक असला तर उत्तम. संस्कॄत येत असेल तर फारच छान. फायनानशीयल मॅटर मधे जाणकार असेल तर अगदी दुधात साखर" इथून उमेदवार कोण आहे त्याची खात्री झाली. :) बाकी, चालू द्या....! - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

sneharani
Fri, 02/04/2011 - 09:23 नवीन
देवा वर विश्वास असलेला. मल्टी टास्कींग ची आवड असलेला. लेखक असला तर उत्तम. संस्कॄत येत असेल तर फारच छान. फायनानशीयल मॅटर मधे जाणकार असेल तर अगदी दुधात साखर
हे वाचल्यावरच कळालं कुणासाठी इतका खटाटोप तो! अभिनंदन!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी काही राहीलेली कामे असतील तर नावे सुचवा.

सूर्यपुत्र
गुरुवार, 02/03/2011 - 21:04 नवीन
या वाक्यात थोडासा बदल : बाकी काही राहीलेली नावे आहेत, तर कामे सुचवा!! -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

वेबकास्टिंग परांकडे काय ?

५० फक्त
गुरुवार, 02/03/2011 - 23:23 नवीन
वेबकास्टिंग परांकडे काय ?
  • Log in or register to post comments

अरेरे

ब्रिटिश टिंग्या
Fri, 02/04/2011 - 10:16 नवीन
नान्या वेटर आहे हे माहिती नव्हतं!
  • Log in or register to post comments

दादा वहिनींचा नुकताच एक फोटो

नरेशकुमार
Fri, 02/04/2011 - 10:42 नवीन
दादा वहिनींचा नुकताच एक फोटो काढुन आनला आहे. Image removed.Image removed." alt="" /> साभार : http://photofunia.com/effects/couple
  • Log in or register to post comments

नरेशकुमार, हा फोटो पुल

५० फक्त
Fri, 02/04/2011 - 11:50 नवीन
नरेशकुमार, हा फोटो पुल उद्यानातला वाटतोय. होती खरी आज सकाळी तिकडे काहितरी गडबड, आणि दोन तिन दिवस बंद पण होती बाग, आधी पुतळा आणि आता हे.
  • Log in or register to post comments

सल्ला

विनायक प्रभू
Fri, 02/04/2011 - 12:05 नवीन
प्री न्युप बद्दल कुणीही सल्ला अजुनही दिलेल नाहीये.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा