Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 02/03/2011 - 13:25
" काल रात्री कुणीतरी मिल्टन नावाची बाई तुम्हाला फोन करत होती" उठवायचस ना. "रात्री एक वा़जता"? काय म्हणत होती? "नीटसे काय कळत नाही. पण अमेरिकन वाटत होती. कोण ही"? माहीत नाही ब्वॉ? "तुम्ही परत फोन लावा बघु माझ्या समोर. काय ते मला पण कळू दे" वेडी की काय तु. अमेरिकेला फोन लावायची जहागिरदारी ? हॅट. असेल गरज तर परत फोन करेल. ----------------------------------------------------------------------------------------- "उठा आता. बघा तीच बया परत फोनवर आहे. काय बोलते आहे ते कळले तर शप्पथ." हॅलो. "प्र्फुमॅस्टर, मी पॅरिस हिट्लन . जरा काम होते तुमच्या कडे." माझा नंबर कुणी दिला हो तुम्हाला. "तुमच्या इथल्या एका मित्राने" बोला काय काम काढलेत. लवकर सांगा. उगाच जिलेब्या पाडू नका. इथे रात्रीचा एक वा़जला आहे. "मला लग्न करायचे आहे" बर मग? त्याचा माझ्याशी काय संबंध. माझे लग्न होउन २५ वर्षे झालीत. आता ह्या वयात आणखी एक करायची काही एक इच्छा नाहीये. "अहो मला एका होतकरु भारतीय मुलाशी लग्न करायचे आहे. तुमच्या ओळखीत कुणी असेल तर सुचवा" सर्व जग सोडुन भारतीय? "अहो तुम्ही मायलेज ऑब्सेस्ड नेशन आहात ना म्हणुन." बर बर. काय अपेक्षा.? " स्मार्ट असायला हवा. शिकला सवरलेला. वर्जीन. देवा वर विश्वास असलेला. मल्टी टास्कींग ची आवड असलेला. लेखक असला तर उत्तम. संस्कॄत येत असेल तर फारच छान. फायनानशीयल मॅटर मधे जाणकार असेल तर अगदी दुधात साखर" वयाची अट? "वरील सर्व गुण असतील तर अधीक उणे चालतय. पण तुमची ओळख महत्वाची." ते कशाला बॉ? "ते लग्न झाल्यावर सांगेन. आत त्याची चर्चा नको." तुम्हाला प्री न्युप इ मेल करते. माझा फोटो पाठवायची गऱज आहे असे वाटत नाही. टाइम्स मधे परवा आला आहेच. अ‍ॅगल जर बोल्ड आहे. पण चालुन जाईल. हवे असले तर पत्रिका पण पाठवते. तुमच्या साईट वर जे महाराज आहेत त्यांच्याकडुन जुळवुन घ्या." अजुन काही? "ज्यांच्याशी माझी पत्रिका जुळेल त्याचा फोटो व प्री न्युप पाठवा. ___________________________________________________ मी जुळणारी पत्रिका करुन घेतो. जास्तीत जास्त काय महाराज 'विशिष्ट सेवा' म्हणुन जादा आकार घेतील. चालेल. नानासाठी मला दोन पाचशे काही मोठे नाहीत. ---------------------------------------------------------------------------------------- लग्न आमच्या बिल्डींग च्या गच्चीवर. शाकाहारी जेवण - सौ. मास्तर मांसाहारी जेवण-गणपा सनई वादन्-छोटा डॉन मद्यपान सेवा-पिंडा काका उठबस्-टारझन आलेल्या पाहुण्याबरोबर विचारांचे आदान प्रदान- रामदास पत्रिका छपाई-श्रामो मंगलाष्टके-शरदीनी आणि रेवती ताई बाकी काही राहीलेली कामे असतील तर नावे सुचवा. सर्वात महत्वाचे नानाला प्री न्युप काय असायला पाहीजे त्या बाबत संपुर्ण सल्ला द्या.
  • Log in or register to post comments
  • 12436 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 02/03/2011 - 13:30

Permalink

आयला...

आयला! मास्तर, हसून हसून लोळतोय... :) पत्रिका छापून मिळतील. मजकूर कळवा लगेच. ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 02/03/2011 - 13:29

Permalink

पिठ्ठा !!

_/\_ अगगगग !! मास्तर , याला म्हणतात पिठ्ठा पाडणे . अवांतर : मास्तर अलीकडे अंमळ येन्जॉय करायला शिकले आहेत वाट्ट !!
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 02/03/2011 - 13:37

Permalink

लै बेष्ट... प्यारीसला वर्जिन

लै बेष्ट... प्यारीसला वर्जिन नवरा हवा ही मागणी अंमळ रोचक वाटली...
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 02/03/2011 - 13:40

In reply to लै बेष्ट... प्यारीसला वर्जिन by भडकमकर मास्तर

Permalink

हाहाहाहा

स्थळ पाहून अटी ठरल्या आहेत असं दिसतंय, मास्तर*. ;) काय नाना, बरोबर आहे ना? हे मास्तर क्रमांक दोन. म्हणजे भडकमकर मास्तर. पहिले मास्तर प्रभूमास्तर.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 02/03/2011 - 13:44

In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक

Permalink

तिला बहुतेक एखाद दोन गोष्टी

तिला बहुतेक एखाद दोन गोष्टी शिकवायचा आनंद घ्यायचा असेल हो, तसंही याशिवाय अजुन तिला काही येत असेल की नाही कुणास ठावुक. ;-) (ह्या मास्तर लोकांना काही कळेल तर शपथ!)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on गुरुवार, 02/03/2011 - 14:00

Permalink

मी गिल्वर घेउन तय्यार आहे,

मी गिल्वर घेउन तय्यार आहे, दिदि तेरा देवर दिवाना, हाय राम कुडियोंको ** **.
उठबस्-टारझन
बघुनच पळुन जातील कि हो सगळे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 02/03/2011 - 13:44

Permalink

मास्तरांचा धागा म्हणुन मोठ्या

मास्तरांचा धागा म्हणुन मोठ्या उत्सुकतेने लागलीच उघडला.... द्येवा एकदम पोपट केलात. =)) (नानाची परवानगी घेतली असाल अशी आशा करतो ;)) असा निखळ धागा हवा दंगा करायला. =))
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 02/03/2011 - 13:47

Permalink

सनई वादन्-छोटा डॉन =)) =))

सनई वादन्-छोटा डॉन
=)) =)) =)) =))
उठबस्-टारझन
=)) =)) =)) म्हंजे नक्की काय हो? ;-) बाकी नानाशेटना प्रिन्युप म्हणुन काही (श्रेय असलेली) चित्रं दाखवुन 'संसाराचे चार धडे' शिकवा मास्तर तुम्हीच. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 02/03/2011 - 15:12

In reply to सनई वादन्-छोटा डॉन =)) =)) by Nile

Permalink

अगायायाया

सनई वादन्-छोटा डॉन
--- ऑबॉबॉबॉबॉ, पडोसन पिच्चरमधला शेवटचा शीन आठवला (मेहमूद डोळ्यात पाणी आणून सनई वाजवत असतो तो) =))
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 02/03/2011 - 15:30

In reply to अगायायाया by नंदन

Permalink

हम्म

नंदन, ही निव्वळ आठवण आहे की 'सुचवण' देखील?
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 02/03/2011 - 16:10

In reply to हम्म by रमताराम

Permalink

हे कात तुम्हा दोघा कोटी

हे कात तुम्हा दोघा कोटी बहाद्दरांना दाद द्यायला आलो तोवर दोन्ही कोट्या उडाल्या? असो.. आम्हाला त्या उडण्या आधी वाचायला मिळाल्या हे आमच भाग्यच म्हणायच ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 02/03/2011 - 16:54

In reply to हे कात तुम्हा दोघा कोटी by गणपा

Permalink

आम्हाला त्या उडण्या आधी

आम्हाला त्या उडण्या आधी वाचायला मिळाल्या हे आमच भाग्यच म्हणायच >>> हम्म !! माझा ही प्रतिसाद उडविलेला दिसतो आहे...असो ..ज्याने कोणी उडविली त्याचे देव भले करो.. आता भले करो म्हणतोय तर तेही उडवाल का ? अवांतर : मन कस शांत झाल असेल नाही आता ?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 02/03/2011 - 17:12

In reply to आम्हाला त्या उडण्या आधी by सुहास..

Permalink

आता भले करो म्हणतोय तर तेही

आता भले करो म्हणतोय तर तेही उडवाल का ? अवांतर : मन कस शांत झाल असेल नाही आता ?
अलिकडे मी हे सगळं येंजॉय करायला शिकलो आहे,
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 02/03/2011 - 13:50

Permalink

विषय

एक महत्वाचे राहीले. हनिमुम प्रेसिडेंशियल सुट मधे असेल. घरभरणी च्या आधीचे स्मुप्देशन नान्स ला कोण करणार?
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 02/03/2011 - 13:56

In reply to विषय by विनायक प्रभू

Permalink

ओ मास्तर, ती हिल्टनकाकु

ओ मास्तर, ती हिल्टनकाकु शेवटी पाश्चिमात्य, आमच्या नान्यालादररोज साधं-वरण भात अन शिकरण कोण करुन घालेल? तीला कुकिंग कोण शिकवणार?? (विंक्षिप्त बाईंना नेमा, या कामावर. ;-) )
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 02/03/2011 - 20:12

In reply to विषय by विनायक प्रभू

Permalink

घरभरणी?

गृहप्रवेशाबरोबरच वास्तुशांतीचेही समुपदेशन केल्यास उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 02/03/2011 - 13:56

Permalink

चुचु करवली का?

चुचु करवली का?
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 02/03/2011 - 13:58

In reply to चुचु करवली का? by परिकथेतील राजकुमार

Permalink

हल्कत बाव्लत आच्रतं =))

हल्कत बाव्लत आच्रतं =))
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on गुरुवार, 02/03/2011 - 14:06

Permalink

कान पिळायला कोन येनार हाय ?

कान पिळायला कोन येनार हाय ?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 02/03/2011 - 16:04

In reply to कान पिळायला कोन येनार हाय ? by नरेशकुमार

Permalink

कान

आरे बाबा, सर्वार्थाने नाना पिळला जाणार आहेच. कान तरी बा़की ठेवा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on गुरुवार, 02/03/2011 - 14:13

Permalink

उठबस्-टारझन म्हनजे बसनार्याना

उठबस्-टारझन
म्हनजे बसनार्याना उठवुन उभे आहेत त्याना बसवनारे ते तर पार झोपव्तील वर्‍हाडाला
बाकी काही राहीलेली कामे असतील तर नावे सुचवा.
हा नरेशकुमार- संसारोपयोगी, पत्नीनिष्ठ, १ निष्ठ,घनिष्ट अशा टिप्स द्याय्ला. आनि शिन्दे - वरमाय
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 02/03/2011 - 14:13

Permalink

=)) चुचु सुपारी देते आता

=)) चुचु सुपारी देते आता मास्तराची!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on गुरुवार, 02/03/2011 - 14:49

In reply to =)) चुचु सुपारी देते आता by बिपिन कार्यकर्ते

Permalink

अग्दी !!!!! त्रिच नान्स चुच्स

अग्दी !!!!! त्रिच नान्स चुच्स ला भाव देत नाय असे कुठे तरि ऐक्ले होते
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 02/03/2011 - 14:26

Permalink

आग्गागागागागा... मुलीचे

आग्गागागागागा... मुलीचे मामा(आवाज कमी), मुलीचे मामा (आवाज मध्यम) मुलीला (असेल तशी) घेऊन या. मुहूर्ताची वेळ टळून गेली असली तरी लग्न लागणारच. नवरा मुलगा आला का...??? घोड्याचं- अहो नवर्‍याचं नाही- खर्‍या घोड्यांचं काय???? आटपा, आटपा लवकर. टारु, त्याला नाही त्याला नाही, पलिकडचा. दोनच दे. चुचुला बघतोय बघ. निळ्या, अक्षता... अरे मुलगी नाही. तांदूळ मेल्या....
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 02/04/2011 - 14:29

In reply to आग्गागागागागा... मुलीचे by प्यारे१

Permalink

+१ प्यारे...

अव्वल लिवलाय बगा.. ह.ह.पु.वा. झाली आमची... परसंग जसाच्या तेसा उम्टीला...
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/03/2011 - 14:43

Permalink

काय मास्तर ? आज दुपारी ?

काय मास्तर ? आज दुपारी ? :) हे उठबस मधे काय करायचं असतं बुवा ? हो , कोनी पंगा केला तर आडवा करायचे काम असेल तर आणंदाणे करु :) बाकी प्यारिस हिल्टण ? जगदंब .. जगदंब .. ह्यांनी म्हणे एका वॅलेंटाईन डे ला बेकहॅम काका बाहेरदेशी दौर्‍यावर असताना स्वत:ला विवस्त्र एका गिफ्ट पॅक मधे बंद करुन घेतलं होतं , आणि ते गिफ्ट पॅक बेकहॅम ला पोच केलं होतं ! आता हे असं वळवलेलं गिफ्ट णाणांणा चालेल काय ? ह्या वर त्यांचे विचार जाणुन घेण्यास उस्तुक .. बाकी पॅरिसकाकुंचं अ‍ॅव्हरेज काय आहे ? :) -(एलिशा कथबर्ट प्रेमी) टारझन उठाबशे
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 02/03/2011 - 17:34

In reply to काय मास्तर ? आज दुपारी ? by टारझन

Permalink

नान्या उष्टं खातो का?

नान्या उष्टं खातो का?
  • Log in or register to post comments

Submitted by विकाल on Fri, 02/04/2011 - 12:44

In reply to काय मास्तर ? आज दुपारी ? by टारझन

Permalink

न व्हय ओ...लग्नात बन्द पाकीट

न व्हय ओ...लग्नात बन्द पाकीट चालतय न्हव...? नाय कवा कवा पाकीट फोडुन वाचत्यात...न मन्ग प्राबलेम म्नताना ईचारल ओ?
  • Log in or register to post comments

Submitted by मी ऋचा on गुरुवार, 02/03/2011 - 14:43

Permalink

वा व्वा अगदी लग्नघर करून

वा व्वा अगदी लग्नघर करून टाकलत की हो मिपाचं..मज्जाच मज्जा... हाहाहाहा हाहाहाहा ( हे राजश्री प्रोडक्शन्स च्या पिच्चर मधील लग्नात नवरीच्या भोंगड्या मैत्रिणी हसतात त्या चालीवर वाचावे ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 02/03/2011 - 14:47

In reply to वा व्वा अगदी लग्नघर करून by मी ऋचा

Permalink

ड्या नीट टंकल्याबद्दल आभार.

ड्या नीट टंकल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 02/03/2011 - 14:45

Permalink

अगगागागागागागा ____/\_____ मा

अगगागागागागागा ____/\_____ मास्तरने पार बाजार उठवला मास्तरला आम्ही वास्को द गामाचा भाऊ गोबोगामा* म्हणतो =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) @गणपा - मास्तरला असे विचारतात? ऑ ! चावट ! * गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 02/03/2011 - 15:03

In reply to अगगागागागागागा ____/\_____ मा by अवलिया

Permalink

+१

* गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध सहमत. मग नाना 'घरजमाई' होणार का? तसे झाले तर मग 'हिरवा माज' क्याटेगरीत जाणार तर. सगळी समीकरणेच बदलतील की हो. अरे हो अभिनंदन करायचे राहिलेच. जोरदार हाबिणंदण!
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 02/04/2011 - 15:09

In reply to अगगागागागागागा ____/\_____ मा by अवलिया

Permalink

मास्तरने पार बाजार

मास्तरने पार बाजार उठवला मास्तरला आम्ही वास्को द गामाचा भाऊ गोबोगामा* म्हणतो *गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध एक ७-८ वर्ष तरी मागे गेलो राव मी.. गोबोगामा :: तर टोपिक एवढा भन्नाट सुरु आहे... त्यात पुन्हा असल्या phrases... जाम मजा आलीये आज तर... ------------ बाकी चालू द्या... ------------
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 02/03/2011 - 14:57

Permalink

पण नान्याचे वय लग्नाचे आहे?

पण नान्याचे वय लग्नाचे आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by वारकरि रशियात on गुरुवार, 02/03/2011 - 17:24

In reply to पण नान्याचे वय लग्नाचे आहे? by llपुण्याचे पेशवेll

Permalink

+१ कालच थत्ते काका म्हणत

+१ कालच थत्ते काका म्हणत होते, "नानांना अजून थांबायला लागणार. वय १६ च वर्षांचं राहणार आहे."
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on गुरुवार, 02/03/2011 - 14:57

Permalink

माझ जरा कुठे दुर्ल्क्श झाले

माझ जरा कुठे दुर्ल्क्श झाले तर ह्यानी नानाच लग्नच लावुन टाकले.. आणी मी करवली...कुठे फेडाल हि पापे ?
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/04/2011 - 06:12

In reply to माझ जरा कुठे दुर्ल्क्श झाले by पर्नल नेने मराठे

Permalink

चुच्स अजून लग्न लागायचय. खूप

चुच्स अजून लग्न लागायचय. खूप कामं आहेत बाई. मुंडवळ्या, लज्जाहोमाच्या लाह्या, अष्टगंध, नारळ, कलश, तांदूळ, सुपारी, विड्याची पाने, हळद, कुंकू, खण वगैरे सामुग्रीची व्यवस्था मी करेन. किती लोक केव्हापासून पुण्यात बोलवलेत? नाही फराळाचं करवून घ्यायला लागेल. पाहुण्यांची झोपायची व्यवस्था गच्चीवर करू. गुलाबी गारव्यात. ________________________________________ मुलगा कसा राजबिंडा आहे..... मुलगी अगदीच सो सो आहे त्यामानाने ........आता एकमेकांना पसंत पडलेच आहेत म्हणून काही बोलत नाही पण अगदी खरं सांगायचं तर आमच्या नानांना नाही हो शोभत ही पॅरीस .
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on गुरुवार, 02/03/2011 - 14:59

Permalink

नियोजीत वधुवरास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by वारकरि रशियात on गुरुवार, 02/03/2011 - 15:11

In reply to नियोजीत वधुवरास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! by यकु

Permalink

बाकी नाना म्हणतात तसा खरंच

बाकी नाना म्हणतात तसा खरंच बाजार उठवलाय ! अवांतरः येश्वंत्राव, इतका उत्साह बरा न्हवं ! फटुंचा श्रेयाव्हेर कसं इसरता ? (लग्नाचा आहेर न्हवं)
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on गुरुवार, 02/03/2011 - 15:20

In reply to बाकी नाना म्हणतात तसा खरंच by वारकरि रशियात

Permalink

म्हणजे? फोटू आत्तापासूनच

म्हणजे? फोटू आत्तापासूनच नानांना विचारून टाकावा असं म्हणायचं आहे का तुम्हाला? बाकी इतर काही असेल तर चि. सौ.का.पॅरिस हिल्टन आणि चि. बॅटमॅन च्या कायदेशीर प्रतिनिधीला पाठवा; की तुम्हीच आहात?
  • Log in or register to post comments

Submitted by वारकरि रशियात on गुरुवार, 02/03/2011 - 16:06

In reply to म्हणजे? फोटू आत्तापासूनच by यकु

Permalink

न्हाय हो, फोटु कुठनं (गुगल,

न्हाय हो, फोटु कुठनं (गुगल, आंजा, वेबसाईट चा पत्या) मिळाले वगैरे ल्हीलं नाय तर त्यांना 'पंछी बनु उडते फिरु' आसं गानं म्हनावं लागल ना म्हनुन सुचवलं. बाकी आमी विजुभाऊंबरोबर (त्यांच्या संमतीने) आहेर जमा करायला ष्टेजवर असु की.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 02/03/2011 - 17:13

In reply to न्हाय हो, फोटु कुठनं (गुगल, by वारकरि रशियात

Permalink

सहमत आहे.श्रेय नोंद आवश्यक

सहमत आहे.श्रेय नोंद आवश्यक आहे असे सध्याचे आमचे मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/03/2011 - 16:13

In reply to म्हणजे? फोटू आत्तापासूनच by यकु

Permalink

चि. सौ.का.पॅरिस हिल्टन

चि. सौ.का.पॅरिस हिल्टन
पॅरिस् बाई अजुन ही चि सौ का आहेत ? =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on गुरुवार, 02/03/2011 - 19:55

In reply to चि. सौ.का.पॅरिस हिल्टन by टारझन

Permalink

नाही

त्या अखंड चिसौकां असाव्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 02/03/2011 - 20:06

In reply to नाही by रामदास

Permalink

ऑबॉबॉबॉबॉ........

=)) =)) =)) _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 02/04/2011 - 08:11

In reply to नाही by रामदास

Permalink

किंचितसा असहमत. त्या कदाचित

किंचितसा असहमत. त्या कदाचित अखंड सौभाग्यवती असाव्यात. ;) (गोंएकर) पेशवे.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 02/03/2011 - 15:23

Permalink

नेहमीचे क्रिप्टीक नाही

नेहमीचे क्रिप्टीक नाही त्यामुळे मजा नाही आली.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 02/03/2011 - 15:48

Permalink

मास्तर स्टेजवर आलेले "आहेर "

मास्तर स्टेजवर आलेले "आहेर " घेण्याचे काम मी करेन. धम्या माझ्या सोबतच राहील. तेवढीच कंपनी होईल
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 02/03/2011 - 16:09

Permalink

ते तेवढं व्हिडीयो शूटिंग कोण

ते तेवढं व्हिडीयो शूटिंग कोण करणार आहे ते पण सांगा की. आणि शूटिंग मध्ये कशाकशाचा अंतर्भाव असेल ते पण सांगा. काय आहे की वधूच्या आवडीनिवडी लक्षात घेउन प्रश्न विचारला. गरज पडल्यास मी शूटिंग करायला तयार आहे. आणि हो, वॉर्डरोब डिझायनिंगचे काम कोणाकडे आहे ते पण सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on गुरुवार, 02/03/2011 - 16:29

In reply to ते तेवढं व्हिडीयो शूटिंग कोण by मृत्युन्जय

Permalink

व्हिडीयो शूटिंग

व्हिडीयो शूटिंग सर्वसाक्षी , जयपाल करतील , दोघेही ठाण्यातच राहतात. मिडिया पार्टनर : सहज राव अन मदन बाण ( जालावर प्रदर्शित करायची जबाबदारी यांची)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com