गणेशा यांनी लिहायला प्रोत्साहन दिल्यामुळे ह्या सदरात लेख लिहिण्याचा श्रीगणेशा करीत आहे माझा पहिलाच लेख असल्याने काही चुकल-माकलं तर आपल म्हणून तुम्ही समजून घ्यालच (अपवाद-टारझण ) याची खात्री वाटते .
तर खालील कथा ही माझ्या लहान भावाची आमच्या लहान पणीची असून ती रंगविण्यासाठी अजिबात माल-मसाला वापरला नाहीये जसे आठवले तसेच्या तासे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे .
माझा भाऊ पप्पू माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान ,एकुलता एक असल्यामुळे घरात सर्वांचा लाडका,(आईचा नाही ) म्हणून त्याला जराही खरचटले तर सगळ्या घरालाच ताप यायचा आणि त्यामुळेच मी आणि माझा लहान मामा (नानामामा) नेहमीच त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचो पण नेहमी उलटाच प्रकार व्हायचा .
असाच एकदा मला खडू हवा होता जो गॅसओट्यावरील एका लाकडी खात्यात ठेवलेला होता तिथे माझा हात पुरात नसल्याने मी आईला तो काढून द्यायला सांगत होते पण आजूबाजूच्या बायका जमल्या होत्या व आई त्यांच्याशी गप्पा मारण्यात मग्न होती पप्पुही किचनमध्येच दूध पोळी खात होता .आई काही येत नव्हती मग मी स्वतःच.गॅसओट्यावर चढले आणि खडू काढायला घेतला ,खडू तर काढला पण तिथेच पाण्याने भरलेल्या पिंपाच्या नळात माझा फ्रॉक अडकला याकडे माझे लक्ष नव्हते मी ओट्यावरून उडी मारली आणि पाण्याने भरलेला पिंप माझ्या अंगावर पडला ,माझ्या गुडघ्याला लागले तसेच तो नळही माझ्या पाठीत लागला होता मी माझा गुडघा पाहत नाही तितक्यातच पप्पूने जोराचा भोंगा पसरला ,आई व जमलेल्या बायका पळतच आल्या .मी तर खूपच घाबरले होते.,अरे बापर.,!आता याला काय झाले ?याला जर काही झाले असेल ना?तर आपले काही खरे नाही आधीच आईचे काम केले नव्हते आणि आता हे! मला तर आज पगारासाहित बोनसही मिळेल (म्हणजे जरा जास्तीचा मार मिळेल) म्हणून मी मागच्या दाराजवळच उभे राहिले याला जर जास्त लागले असेल तर आपल्याला इकडून पळायला बरे!पण त्याच्या रडण्याचा भोंगा काही थांबतच नव्हता ,सारे त्याला कुठे लागले,,कुठे लागले म्हणून विचारत होते मला लागले असूनही कुणी विचारात नव्हते आणी माझेही तिकडे लक्ष नव्हते .आई आयोडेक्साची बाटली घेऊनच त्याच्याजवळ बसली होती पण तो काही सांगत नव्हता फक्त रडताच होता ,जमलेल्या बायकांपैकी एका आजीने तर,"हाई पोर ना गैरीच बेक्कार शे ,देख त तो पोरगा कितला रडी राहीना ते"असा माझ्यावर शेरा मारला ,सगळे मलाच दोषी समाजात होते आणि पप्पुही काही बोलत नव्हता शेवटी अजून १० मिनिटे भोंगा पसरून त्याने त्याच्या रडण्याचे कारण सांगितले ,तर तो २ कारणांसाठी रडत होता -
१ म्हणजे त्याच्या अंगावर पाणी पडले आणि त्याला थंडी वाजायला लागली म्हणून आणि दुसरे म्हणजे -
तो जी दूध पोळी खात होता त्यातील त्याच्या आवडत्या दुधाच्या सायीत पाणी पडले म्हणून !त्याला कुठेही लागले नव्हते
मग काय?मग मी भोंगा पसरला आणि सगळ्यांनी माझ्याकडे मोर्चा वळविला ......
माझ्या भावाचे अजून बरेच किस्से आहेत जे मी एकानंतर एक लिहिणार आहे .
वाचने
6477
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान गोष्ट....... तुझ्या
उपयोग झाला
मस्त लिहलय, आवल शे
>>>>"हाई पोर ना गैरीच बेक्कार
शॉल्लेट....
मस्त लेखन ! आवडले !!
लेख वाचुन वा.ई.ट. वाटले. आनी
मस्त लेख..........!
ककै, छान लिहिले आहेस येउ द्या
वा छान किस्सा सांगितलास ककै,
गैऱ्ही भारी गोट सांगी बरका
मस्त लिहिले आहे .. पुढील भाग
बालपणीचा काळ सुखाचा
छान किस्सा
कच्ची कैरी -अनुभव छान शब्दात
हा असा दुजाभाव बरा नव्हे हे
मस्त आमचा पप्पु आनि तुमचा हि
लाडकी बोली....!
छान लिहिले आहेस कैरे !!!
छान आठवणी.
छान
हाहा