गोष्ट माझ्या भावाची
गणेशा यांनी लिहायला प्रोत्साहन दिल्यामुळे ह्या सदरात लेख लिहिण्याचा श्रीगणेशा करीत आहे माझा पहिलाच लेख असल्याने काही चुकल-माकलं तर आपल म्हणून तुम्ही समजून घ्यालच (अपवाद-टारझण ) याची खात्री वाटते .
तर खालील कथा ही माझ्या लहान भावाची आमच्या लहान पणीची असून ती रंगविण्यासाठी अजिबात माल-मसाला वापरला नाहीये जसे आठवले तसेच्या तासे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे .
माझा भाऊ पप्पू माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान ,एकुलता एक असल्यामुळे घरात सर्वांचा लाडका,(आईचा नाही ) म्हणून त्याला जराही खरचटले तर सगळ्या घरालाच ताप यायचा आणि त्यामुळेच मी आणि माझा लहान मामा (नानामामा) नेहमीच त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचो पण नेहमी उलटाच प्रकार व्हायचा .
असाच एकदा मला खडू हवा होता जो गॅसओट्यावरील एका लाकडी खात्यात ठेवलेला होता तिथे माझा हात पुरात नसल्याने मी आईला तो काढून द्यायला सांगत होते पण आजूबाजूच्या बायका जमल्या होत्या व आई त्यांच्याशी गप्पा मारण्यात मग्न होती पप्पुही किचनमध्येच दूध पोळी खात होता .आई काही येत नव्हती मग मी स्वतःच.गॅसओट्यावर चढले आणि खडू काढायला घेतला ,खडू तर काढला पण तिथेच पाण्याने भरलेल्या पिंपाच्या नळात माझा फ्रॉक अडकला याकडे माझे लक्ष नव्हते मी ओट्यावरून उडी मारली आणि पाण्याने भरलेला पिंप माझ्या अंगावर पडला ,माझ्या गुडघ्याला लागले तसेच तो नळही माझ्या पाठीत लागला होता मी माझा गुडघा पाहत नाही तितक्यातच पप्पूने जोराचा भोंगा पसरला ,आई व जमलेल्या बायका पळतच आल्या .मी तर खूपच घाबरले होते.,अरे बापर.,!आता याला काय झाले ?याला जर काही झाले असेल ना?तर आपले काही खरे नाही आधीच आईचे काम केले नव्हते आणि आता हे! मला तर आज पगारासाहित बोनसही मिळेल (म्हणजे जरा जास्तीचा मार मिळेल) म्हणून मी मागच्या दाराजवळच उभे राहिले याला जर जास्त लागले असेल तर आपल्याला इकडून पळायला बरे!पण त्याच्या रडण्याचा भोंगा काही थांबतच नव्हता ,सारे त्याला कुठे लागले,,कुठे लागले म्हणून विचारत होते मला लागले असूनही कुणी विचारात नव्हते आणी माझेही तिकडे लक्ष नव्हते .आई आयोडेक्साची बाटली घेऊनच त्याच्याजवळ बसली होती पण तो काही सांगत नव्हता फक्त रडताच होता ,जमलेल्या बायकांपैकी एका आजीने तर,"हाई पोर ना गैरीच बेक्कार शे ,देख त तो पोरगा कितला रडी राहीना ते"असा माझ्यावर शेरा मारला ,सगळे मलाच दोषी समाजात होते आणि पप्पुही काही बोलत नव्हता शेवटी अजून १० मिनिटे भोंगा पसरून त्याने त्याच्या रडण्याचे कारण सांगितले ,तर तो २ कारणांसाठी रडत होता -
१ म्हणजे त्याच्या अंगावर पाणी पडले आणि त्याला थंडी वाजायला लागली म्हणून आणि दुसरे म्हणजे -
तो जी दूध पोळी खात होता त्यातील त्याच्या आवडत्या दुधाच्या सायीत पाणी पडले म्हणून !त्याला कुठेही लागले नव्हते
मग काय?मग मी भोंगा पसरला आणि सगळ्यांनी माझ्याकडे मोर्चा वळविला ......
माझ्या भावाचे अजून बरेच किस्से आहेत जे मी एकानंतर एक लिहिणार आहे .
वाचने
6477
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
प्रतिक्रिया
छान गोष्ट.......
तुझ्या भोंग्याचा काही उपायोग झाला का............ कि तो अणखीनच जस्त कर्कश वाजू लागला.........
माझ्या भोंग्याचा नक्कीच उपयोग झाला आणि आईने त्यालाच एवढ्या शुल्लक कारणासाठी रडतो म्हणून रागावले .
मस्त लिहलय, आवल शे
>>>>"हाई पोर ना गैरीच बेक्कार शे ,देख त तो पोरगा कितला रडी राहीना ते"
हया वाक्याचा एक्झक्ट अर्थ काय ते कळेल का?
म्हण्जे तसा सन्दर्भ कळलाय....
आणि हो भाषा कोण्ती ते पण सान्गा....
तुमच्या भावाच्या जागी असतो तर मी सुद्धा हेच केलं असतं....
मस्त लेखन ! आवडले !!
लेख वाचुन वा.ई.ट. वाटले.
..आनी हो,
औ दुस्रो भाशा नई बोलानु, मर्हाठी मंदीच बोलानु. कळीका ?..
कच्ची कैरी , छान लेख. अजुन येऊ द्या.
>>>>"हाई पोर ना गैरीच बेक्कार शे ,देख त तो पोरगा कितला रडी राहीना ते"
@ वडापाव, हि खान्देशातिल अहिरानि भाषा आहे.
ककै,
छान लिहिले आहेस
येउ द्या अजुन पन निवडक किस्से
वा छान किस्सा सांगितलास ककै, आणि मसाला न लावता सांगितलास हे जास्त चांगलं केलंस. उगाचच शब्दांचं बंबाळ नाही.
हर्षद.
गैऱ्ही भारी गोट सांगी बरका .
अरे हि अहिराणी भाषा आहे आमची मायबोली
मस्त लिहिले आहे .. पुढील भाग नक्कीच असेच छान होतील ....
"हाई पोर ना गैरीच बेक्कार शे ,देख त तो पोरगा कितला रडी राहीना ते"
ह्या भाषेत ही विषेश लय वाटला.
बहुतेक वर्हाडी - ऐरानी-खानदेशी अश्या पैकी भाषा आहे ही असे वाटते .. मस्त वाटते ऐकायला ..
लिहित रहा.. वाचत आहे.
@ कच्ची कैरी : लेख छान आहे , अहिराणी भाषेची काही माहिती जर माहितीजाळावर असल्यास कळवावे . jaydip.kulkarni@gmail.com
खरंच आहे बालपणीचा काळ सुखाचा ..........
छान किस्सा
कच्ची कैरी -अनुभव छान शब्दात सांगितला आहे.
शब्दांशी खेळता खेळता ती आपली होऊ लागतात. आपल्याला हवी तशी वाकवता येऊ लागतात
लवकरच आपण तरबेज व्हाल. पण आपले गाव कोठले .मी खूप वर्ष मालेगावला काढली.म्हणून ....?
आपल्या संवादात ती भाषा दिसली .. जाणवली .असो लिहित रहा. खूप शुभेच्छा ..!!
हा असा दुजाभाव बरा नव्हे हे कितीवेळा आईवडिलांना सांगून कळत नाही.. बाकी कैरीताय तुझे किस्से मात्र मस्त...
- (बिग ब्रदर) पिंगू
मस्त
आमचा पप्पु आनि तुमचा हि दोघे सार्खेच
:)
अरेच्या....ही तर आमच्या बहिणाबाई चौधरींची भाषा ! चोक्कस. जळगांव (विशेषतः पाचोरा तालुक्यात) आणि नंदुरबार परिसरात दोन मित्रांकडे गेलो असता सातत्याने कानावर पडणारी लाडकी 'अहिराणी' बोली. छान वाटला बहीणभावाच्या आगळ्यावेगळ्या प्रेमाचा अनुभव...!
याच भाषेचे अनेकविध कंगोरे तुमच्या पुढील लेखातून यावेत ही शुभेच्छा.
दुपारची वेळ झाली आहे....तेव्हा तुनी काय रांधेल शे, कैरी?
इन्द्रा
छान लिहिले आहेस कैरे !!!
छान आठवणी.
किस्सा छान लिहिला आहे,
स्वाती
हाहा.
लहानपणीच्या आठवणी मजेशीर असतात.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
छान गोष्ट....... तुझ्या