Skip to main content

इजिप्त कैरो आणि हुस्नै मुबारक

Published on मंगळवार, 01/02/2011
सुमारे बाण्णव (का ब्याऐंशी ) वर्षांचे हुस्न मुबारक सत्ता सोडत नाहीतच पण तिथली जनता विषेशतः तरूण आणि स्त्रीया यांनी मनावरच घेतले आहे की त्यांना सत्तेवरून खाली खेचायचेच आणि ते रस्त्यावर उतरले आहेत. इन्टरनेट आणि टिव्ही चॅनेल्स या बातम्यांनी ओसंडून वहात आहेत. अपेक्षा आहे की याविषयावरची चर्चा रोचक आणि मनिरंजक ठरेल. ( युद्धस्यः कथा रम्या: ) मिपावर खूप चांगली आणि महत्वाची माहिती नेहमीच मिळते. एक सामान्य वाचक आणि उत्सुक मिपा सदस्य म्हणून खालील काही प्रश्न पडतात. १) या गोष्टीना असलेली पार्श्वभूमी काय? एका हुकुमशहा इतकी वर्षे (तीस) अनिर्बंध सत्ता कशी काय भोगू शकतो ? २) यामध्ये राजकारण किती आणि सामाजीक उद्रेक किती?( जनतेला लष्कराची सहानुभूती आहे असे समजले जाते.) २) मुस्लिम ब्रदरहूड हा काय प्रकार आहे? जसे ''जगातील सर्व कामगार (पोलंड - लेक वालेसा सारखे ) एकत्र या'' असे काही? ३) जनता खरेच इतकी कावलेली आहे का, की जीवन मरणाचा प्रश्न उभा रहावा? ४) यातील धार्मिक बाबींना कितपत महत्व आहे? ५) भारत आणि विषेशत : मध्यपूर्वेत याचे काय पडसाद उमटतील? कृपया माहीती द्या.) (. . . )

याद्या 7313
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

आत्ताच डोक्यात आले होते की एखादी चर्चा या विषयावर टाकूया म्हणून! धन्यवाद! महत्वाचा प्रश्न आहे. इजिप्शियन जनता आणि विरोधी नेते यांनी कितीही मागण्या केल्या तरी मुबारक आपले म्हणत राहीलेत, "राजीनामा काय मागताय, कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?" ;) असो. ह,घ्या. १) या गोष्टीना असलेली पार्श्वभूमी काय? एका हुकुमशहा इतकी वर्षे (तीस) अनिर्बंध सत्ता कशी काय भोगू शकतो ? जीवन के बस तीन निशान, "रोटी, कपडा और मकान" हे कारण आहे असे वाटते. अती झालं आणि हसु आलं. बाकी याचा टिपिंग पॉईंट मला देखील समजून घेयचा आहे... यामध्ये राजकारण किती आणि सामाजीक उद्रेक किती?( जनतेला लष्कराची सहानुभूती आहे असे समजले जाते.) मला वाटते हा सामाजीक उद्रेक आहे. लष्कराला पर्याय नाही कारण एकतर इतक्या मोठ्याप्रमाणावर स्वकीयांचा उद्रेक ठेचण्याची संस्कृती (की विकृती?) मला वाटते इजिप्त मधे नसावी. त्यात १९७९ पासून अमेरिकेच्या वार्षिक सरासरी $२ बिलीयन्सवर ते सरकार टिकून आहे. त्यामुळे अमेरिकेचे आणि इस्त्रायलचे नक्कीच अंतर्गत संबंध आणि त्याला धरून दबाव आणणे चालू असेल. मुस्लिम ब्रदरहूड हा काय प्रकार आहे? जसे ''जगातील सर्व कामगार (पोलंड - लेक वालेसा सारखे ) एकत्र या'' असे काही? जास्त माहीत नाही पण १९२८ ला ब्रिटीशांविरुद्ध चालू झालेल्या ह्या संघटनेवर १९४८ ला बंदी घालण्यात आली आणि आजवर कुठल्याच राज्यकर्त्याने ती उठवली नाही. टोकाचे इस्लामी असतील तसेच इस्रायलच्या विरोधात असतील अशी भिती आहे. ते मात्र लोकशाहीमधे भाग घेऊ इच्छित आहेत आणि केवळ मुस्लीम कायदाधारीत राजवट आणणार नाहीत असे म्हणत आहेत. त्यांना जास्त पाठींबा नाही पण त्यांच्या संघटनेची अनेकांना भिती वाटत आहे. जनता खरेच इतकी कावलेली आहे का, की जीवन मरणाचा प्रश्न उभा रहावा? वरती उत्तर आले आहेच. अती झालं आणि हसु आलं. हेच रशियात आणि इतर साम्यवादी जगात (चीन सोडून) पण झाले होते. यातील धार्मिक बाबींना कितपत महत्व आहे? आत्ता नसावे असे वाटते. पण राज्य मिळाल्यावर काय होईल ते माहीत नाही. शिवाय अल कायदा वगैरे सारख्या संघटनांचे इन्फॉर्मल जाळे कुठे कसे काम करत असेल ते देखील माहीत नाही... भारत आणि विषेशत : मध्यपूर्वेत याचे काय पडसाद उमटतील? जॉर्डनच्या राजाने आजच स्वतःचे मंत्रीमंडळ बरखास्त करून काहीतरी नवीन करत आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात पडसाद हे तेलाच्या भावामुळे उमटू शकतात. बाकी आपण अमेरिका-इस्त्रायल-ब्रिटन-युओपिअन युनियन इतके त्यांच्याशी आंतर्राष्ट्रीय राजकारणात अडकलेलो नाहीत. मात्र आज सगळे इस्लामी जगत (कदाचीत इंडोनेशिया वगैरे सारखे काही मोजके देश सोडल्यास) हे पिचलेले आहे. एकीकडे राज्यकर्त्यांमुळे आणि दुसरीकडे इस्लामच्या नावाखाली झालेल्या दहशतवादामुळे जे एक समाज म्हणून सहन करावे लागत आहे त्यामुळे. हा वणवा सहज पसरत जाऊ शकतो. तो जर पाकीस्तान आणि बांग्लादेशात आला तर भारताला पण त्याची झळ पोचू शकेल. तुर्तास इतकेच...

In reply to by विकास

आत्ता नसावे असे वाटते. पण राज्य मिळाल्यावर काय होईल ते माहीत नाही. शिवाय अल कायदा वगैरे सारख्या संघटनांचे इन्फॉर्मल जाळे कुठे कसे काम करत असेल ते देखील माहीत नाही... आजच्याच सकाळ मधे इजिप्तमधल्या स्थानिक अल कायदा नेत्याने मुबारक यांचा धिक्कार करून ते 'बहिरे आहेत त्यामुळे त्यांना जनतेचे म्हणणे ऐकू जात नाही" अशा आशयाचे विधान केले होते. एकूणच इजिप्तही पाकीस्तान, अफगाणिस्तानच्या मार्गावर जाईल की काय अशी भिती त्यामुळे वाटू लागली आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सहमत, नव्या सरकारमध्ये अल कायदा सारख्या शक्तींचा किंवा त्यांच्या समर्थकांचा सहभाग नसावा हीच अपेक्षा...

सर्वात खालच्या प्रतीचा खुबुस नामक रोटी सदृश्य पदार्थ हे तेथील लोकांचे मुख्य अन्न. त्याचेही राशनिंग केले जाते असे ऐकुन आहे. खुबुस मध्ये फलाफल ( डाळीची भजी) कोंबुन बर्‍याच लोकांना खाताना तिथे मी पाहिले आहे. बहुसंख्य लोक हे फारच गरीब आहेत. सरकारी नोकरांचे , अन अगदी आय टी मध्ये काम करणार्‍या स्थानिक लोकांचे पगारही आपणा भारतीय लोकांच्या तुलनेत फारच कमी आहेत. बर्‍याच इंजिनिअर्सचे पगार ५०० ते ६०० ईजिप्शियन पौंड्स ( एक पौंड= ८ भारतीय रुपये) च्या दरम्यान आहेत , त्यावरुन सहजुन घ्या. इंधनाचे दर कमी आहेत अन त्यामुळेच जीवनावश्यक वस्तुंचे भाव आटोक्यात असावेत.

लोक-उठावाच्या शक्याशक्यतेबाबत साधारणतः असे कोष्टक मांडता येईल काय? राजवटीचा प्रकार - लोकांच्या दैनंदिन गरजा भागणे (रोटी-कपडा-मकान) - लोक-उठावाची शक्यता एकाधिकारशाही - गरजा भागतात (उदा. सिंगापूर) - कमी / नाही एकाधिकारशाही - गरजा भागत नाहीत (उदा. इजिप्त, ट्युनिशिया) - होईल / आहे लोकशाही - गरजा भागतात (उदा. अमेरिका, प. युरोपीय देश) - अजिबात नाही लोकशाही - गरजा भागत नाहीत (उदा. भारत) - ??? भारतात काय होऊ शकेल?

In reply to by सुनील

एकंदरीत सहमतच. लोकशाही - गरजा भागत नाहीत (उदा. भारत) - ??? मला वाटतं जो पर्यंत :
  • घरातल्यांवर, ऑफिसात हाताखालील व्यक्तींवर टर्रेबाजी करता येते आणि रस्त्यावर चुकून माखून एखादा पाकीटमार, दुसर्‍याचे पाकीट मारताना तिसर्‍याने पकडलेला असताना देखील जाता जाता लाथेने तुडवता येतो तो पर्यंत सर्व त्रागा एखाद्या प्रेशरकुकरच्या शिट्टी सारखा बाहेर पडू शकतो.
  • शिवाय "जिवोजिवस्य जीवनम" च्या पद्धतीने जो पर्यंत वर-पासून खालपर्यंत सर्व "मेजाखालून-मेजावरती" कसेही आर्थिक लाभ उठवू शकतात आणि तरीही
  • ज्यांची लोकशाहीच्या तत्वांमुळे कायदा-सुव्यवस्था पाळताना गळचेपी करता येत नाही
तो पर्यंत कुणाला असले उठाव भारतात होतील अशी भिती वाटायला नको. या उपरोधात माझ्यालेखी जरी वास्तव असले तरी चांगल्या अर्थाने विचार करायचाच झाला तर आपण "उत्क्रांतीवादी" आहोत "क्रांतीवादी" नाही. हजारो वर्षांचा हा हत्ती वरवर हालताना दिसणार नाही आणि त्याचे कधीकधी वर्तमानात तोटे दिसतातच. पण तरी देखील बदल घडत असतातच. हा काही १९४७ नंतर झालेला अचानक बदल नसून ती पिढ्यान् पिढ्यांमधे तयार झालेली मानसिकता आहे... असो.

विकीवर ही माहिती वाचायला मिळाली - उठावाची कारणे इ. संक्षिप्त रुपात नमूद केली आहेत. (दुवादार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विकीचा दुवा एकदम चांगला आहे. धन्यवाद! करंट इव्हेंट म्हणून तेथे ठेवले असेल हे इतर माध्यमांमधे बघताना लक्षातच आले नाही! आज एनपीआर वर टेरी ग्रोस नामक निर्माती न्यूयॉर्क टाईम्सच्या प्रमुख कार्यकारी संपादकाची विकीलीक्सवरून त्यांनी तयार केलेल्या पुस्तकासंदर्भात मुलाखत घेत होती. त्यात एक नवीन माहिती कळली: विकीलीक्स मधून जे काही (डीटेल्स आत्ता मला माहीत नाहीत) बाहेर पडले त्यात ट्युनिशिया संदर्भात पण होते. त्यावरून ठिणगी पडण्यास मदत झाली. नंतर ट्युनिशिया करू शकतो तर आपणही करू शकतो असे म्हणत इजिप्तमधे तो आत्मविश्वासी वणवा पसरला. आता जॉर्डन आणि सिरीयामधे पण थोडेफार चालू आहे... मात्र अजून दुसरीकडे ऐकल्याप्रमाणे, इजिप्तमधे "टेस्ट ऑफ पेशन्स" बघितली जात आहे. आधी पेशन्स कुणाचा जातो, मुबारकना वाटते आहे की जनतेचा जाईल आणि त्याप्रमाणे ते रणनिती आखत आहेत... काय होते, ते समजेलच.

In reply to by बेसनलाडू

बेसन लाडू ने खुप चांगली लिन्क दिली आहे. शतशः धन्यवाद. माहीतीचे महत्व किती आहे हे समजते. आपले नेहेमीचे उदाहरण घेतले तर थंडी वाजत असतेच पण सकाळ मध्ये '' पुण्यात थंडीचा कहर'' असे वाचले की त्याची जाणीव जास्त होते.

आर्थिक विषमता हेच या उठावाचे प्रमुख कारण आहे. खरं तर नव्या जागतिकीकरणाच्या धोरणाच्या दृष्टीने पश्विम आशियातील एक यशस्वी देश म्हणूनच अमेरीका व युरोप इजिप्तकडे पाहत होते. इजिप्तमध्ये त्यांचे बरेच आर्थिक हितसंबंधही गुंतलेले आहेत. पण जागतिकीकरणाचा एक अपरिहार्य परीणाम म्हणजे आर्थिक विषमता. त्यातून निर्माण होणार्‍या असंतोषाकडे दुर्लक्ष केलं गेलय हे या राष्ट्रांच्या लक्षात आलं नाही त्यामुळे आता या सर्वांची गोची झालेली आहे. इजिप्तच्या जनतेच्या चळवळीला आता विरोध करणं कठीण आहे हे लक्षात आलं तेव्हा अमेरीका आता तिथे होस्नी मुबारकची साथ सोडून जनतेचं हित पाहणारं ( म्हणजे त्यांचा असंतोष नियंत्रणात ठेवणारं) सरकार तिथे यावं असं म्हणत आहे. पण आता जगभरच चंगळवादी आर्थीक उदारीकरण व जागतिकीकरणाच्या परिणामातून उद्रेक होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. सुरवात टुनिशिया, इजिप्त, येमेन इथे झाली आहे.

In reply to by अविनाश कदम

राजकिय आणि सामाजिक मुस्कटदाबी हे जास्त मोठे इश्यू असावे असे वाटते. हे सर्व सहन करीत असताना टुनिशिया च्या अनुभवामुळे आपण काही करू शकतो अशी एक आशा निर्माण झाली. मला वाटते ती आशा फार महत्वाची.

ईजिप्तची जनता हुस्नी मुबारकला 'उचलणार' बहुतेक. शुक्रवारची 'डेडलाईन' दिली आहे.!

In reply to by चिरोटा

आत्ताच बीबीशीने बातमी दाखवली. इजिप्तमधे होस्नी समर्थक आणि विरोधक यांच्यात जोरदार हाणामारी चालू आहे. २०,००० होस्नी समर्थकांनी काढलेल्या मोर्चात ही घटना घडली आहे.

आपल्या देशांत हे कधीच होणार नाही. कारण, महागाई व अन्य प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गाला 'क्रिकेटची' अफु दिली जाते. उच्च मध्यमवर्गाला आयटीचे गाजर तर श्रीमंत वर्गाला चंगळवाद पुरवला जातो. त्याशिवाय बुध्दिभ्रंश करणार्‍या वाहिन्या, धार्मिक अवडंबर, अ ते ज्ञ पर्यंत जोपासलेल्या जाती, कायदा मोडणार्‍यांना अभय आणि विकली गेलेली 'मिडिया'. कोण कशाला घेतोय क्रांतीचे कष्ट ?

In reply to by तिमा

.............. ते ज्ञ पर्यंत जोपासलेल्या जाती...........
अ‍ॅक्चुली ते असे पायजे होते.

In reply to by तिमा

गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गाला 'क्रिकेटची' अफु दिली जाते उच्च मध्यमवर्गाला आयटीचे गाजर तर श्रीमंत वर्गाला चंगळवाद पुरवला जातो. कायदा मोडणार्‍यांना अभय आणि विकली गेलेली 'मिडिया'. तुम्ही Bollywood ची नशा विसरलात... Bollywood च्या बाबतित तर आपले शेजारचे देश पण कित्ती वेडे आहेत याचा अनुभव नुकताच आला.. त्यांना तर वाटते शाहरुख खान , काजोल, शिल्पा शेट्टी सगळे रस्त्यावरच हिंडतात अन कधीही दिसले की हाय हैलो करतात ...कप्पाळ काय बोलणार ?? एवढ्या अफुच्या गोळ्या खाल्यावर, आपल्या देशात तरी कशाला कोण उठाव करतोय ..

लिबिया, येमन, जॉर्डन ,सुदान देशात असेच स्वातंत्र संग्राम लवकरच सुरु होतील.. होवोत. युवाशक्ति एकत्र आली कि काय होउ शकते ह्याचे उदाहरण. साउदि अरेबियात असा संग्राम होणं अवघड आहे. ट्विटर, फेसबुक सारखे सोशल मिडिया ची ताकद जाणवली. चीन मधे सत्ताधारी घाबरले आहेत. "इजिप्ट" हा शब्द सेन्सॉर करण्यात आला आहे ! इस्रायल ची घबराट झाली आहे. जी अमेरीका जगभर स्वतंत्र देवतेचा उदो करते ती सुदान मधे धर्मावर आधारीत फाळणी करण्यात पुढाकार घेते. जगाला इस्लाम ची भीती दाखवुन स्वतः चा फायदा करुन घेते , क्रिस्ती धर्माचा पुढाकार करते, हि हिपोक्रसी जास्त दिवस चालणार नाहि. विकिलिक्स, ट्विटर, फेसबुक नी सुरु केलेली चळवळ एका संग्रामात रुपांतरीत होत आहे. अमेरीकेत हि हि चळवळ लवकरात लवकर सुरु होइल ह्याची खात्री आहे. इजिब्त आणि टुनीशिआ नी सुरु केलेली ठिणगी जगभर पसरायला हवी. अमेरीका स्वतःच्या फायद्यासाठि जगातिल किती लोकांचा छळ करते आहे हे समोर आले आहे. जगातिल "राजघराणी" घाबरली आहेत. भारतात हि असाच एक संग्राम लवकर सुरु झाला तर "राजघराण्यांच" काय होइल हे सांगायला नको. भारतीय युवाशक्ती हि ह्या संग्रामात निर्भिड पणे लवकर उतरो हि सदिच्छा.

In reply to by वडिल

वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया आणि त्यांना भारताबद्दल वाटणारी काळजी योग्यच आहे. पण निश्चिंत रहा. भारतात असे काही होइल याची शक्यता अगदी मिगर आहे. काही कारणे. १) स्वातंत्र्यानंतर आणिबाणी चा अपवाद वगळता भारतात कधीही सर्वंकष आणि जुलुमी राजवट नव्हती. ठरलेल्या वेळी किंवा कधी कधी अगोदरच निवडणूका झालेल्या आहेत. काही क्षुल्लक अपवाद वगळता त्या सर्वमान्य झालेल्या आहेत. २) चित्रे पाहून राजकारण्यांची निवड होत असली तरी मतदार जागरूक आहे. फक्त त्यांचा पेशन्स जास्त आहे. वेळ आली तर ते सत्ता उलथवू शकतात. (उदा.- आणिबाणी नंतर काँग्रेस आणि २००९ मध्ये भाजपने गमावलेली निवडणूक) ३) भारतात फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन नक्कीच आहे. घोटाळे झाले तरी ते झाले हे सर्वांना कळते आणि ते त्यावर टिप्पणी पण करू शकतात. त्यावर कारवाई होण्यास दिरंगाई होते हे खरेच. पण अमेरिकेत देखील न्यायीक विलंब आहेच की.( आठवा लुइन्स्की केस, वॉटरगेट्,एन्रॉन सारखी प्रकरणे.) ३)भडकलेली महागाई आणि भ्रष्ट्राचार हे नासूर आहेत पण उद्रेक होण्यासाठी ते फारसे कारण ठरू शकत नाही. जनता सोशिक आहेच पण समंजस पण आहे. इथे इश्यू मुस्कटदाबीचा आहे. उद्रेक होण्यासाठी त्याची आवश्यकता असते. ४) भारतीय समाजमन (माईंड सेट ) हे उत्क्रांत वादी (प्रो-इव्होलुशन) आहे. क्रांतीवादी ( प्रो-रिव्होलुशन) नाही. ठेविले अनंते .. अशी वृत्ति. म्हणूनच जनता बापूजींच्या मागे गेली, सावरकरांच्या किंवा नेताजींच्या नाही. (येथे कुणाचाही अधिक्षेप करायचा नाहीये. आम्हाला दोनिही विचारधारा वंदनीय आहेत. भारतामध्ये झालेले सत्तांतर हे दोन्ही विचारसरणी आणि त्यांचे अनुयायी यांच्या केमिकल इफेक्ट मुळे - असे माझे मत आहे.) ५) घराणेशाहीचा मुद्दा गैरलागू आहे कारण साठ वर्षांपैकी २० वर्षे केंद्रीय सत्ता गांधी घराण्यात नाही. राहूल जरी पंतप्रधान झाले तरी रितसर निवडणूका घेउनच होतील यात शंका नाही. कायदेशीरपणे निवडून जर पंतप्रधान झाले तर मतदारंची इच्छा प्रमाण मानलीच पाहीजे. (मोदींवर टीका केल्यामुळे जर गुजरात च्या लोकांचा अपमान होत असेल तर त्या न्यायाने घराणेशाही वर टीका ही तर्कदूष्ट (इल्लॉजिकल) ठरते.) ६) आशेचा किरण आहे तो म्हणजे बिहार आणि गुजरात येथील राजकारणी आणि मतदार. (मोदी क्षणभर मानले - जातीयवादी आहेत - तर त्यानी तो विचार सत्तेसाठी का होइना सोडला आहे हे मान्य करायला हरकत नाही.) चिंता फक्त अर्थिक संकटाची आणि काश्मीरची आहे. क ) पेट्रोल किंमती - सर्वंकष परिणाम (परव्हॅसिव्ह) ख ) मध्य पूर्वेतील एक्सपॅट्रीएट नी गमावलेली नोकरी . ग ) सर्व मध्यपूर्व देशात अनेक भारतीय विषेशतः लेबर कॅटेगरी मधील भारतात परत आले तर इथल्या लोकाची नोकरी धोक्यात कारण पुरवठा वाढेल. ग ) भारत सर्वात जास्त डॉलर्स मध्यपूर्वेतून कमावतो.त्याचा साठा कमी होइल. घ ) काश्मीर मधे मुस्लीम ब्रदरहूड कल्पना पेटली तर आपल्याला काश्मीर वर पाणी सोडावे लागेल. (प्रॅक्टीकली ते आपल्या कडे कुठे आहे ?) सर्व प्रतिसादाबद्दल धन्यवाद. --कापूसकोन्ड्या

In reply to by कापूसकोन्ड्या

काहि मुद्दे पटत नाहित. भारतात विषमता दिवसो दिवस वाढत आहे. नुसते इलेक्शन म्हणजे डेमोक्रसी नाहि. वाढती महागाइ ( इन्फ्लेशन) , बेरोजगारी, आणि आर्थिक विषमता हे संग्रामा साठि पुरक आहेत. भारतात असा संग्राम का होणार नाहि ? का होउ नये ? त्यात काय वाइट आहे ?

मी दोन वेळा इजिप्तला गेलेलो आहे (२००३ साली). कैरो आणि अलेक्झांड्रिया या दोन्ही शहरात मी प्रत्येकी २-३ दिवस राहिलो आहे. या भेटीत पोलाद कारखान्यातल्या मध्यम आणि वरिष्ठ अधिकार्‍यांशी माझा थेट संबंध आला होता तसेच कारखान्यात गेलेलो असताना कामगारही दिसले होते (भाषेच्या अडचणीमुळे आणि अतीशय छोट्या वास्तव्यामुळे बोलणे मात्र झाले नाही). एवढ्या तुटपुंज्या अनुभवावर प्रतिसाद द्यायला जरा अवघड वाटते. पण माझे दोन जवळचे मित्र सुवेझ या शहरात वर्षभर होते. माझा 'आँखों देखा हाल' आणि मित्रांकडूनची २००३ ची ऐकीव माहिती यावरून माझे जे मत झाले ते असे:
  1. एकंदरीत इजिप्शियन लोक 'खाऊन-पिऊन' सुखी आहेत.
  2. इजिप्शियन पुरुष आणि स्त्रिया बर्‍यापैकी देखणे/ण्या आहेत. तसेच मिळून मिसळून वागतात.
  3. आलेला पगार उडवून टाकतात. पैसे शिल्लक टाकायची फारशी संवय नाहीं.
  4. स्त्रियांना नवरे ४ बायका करतात याचे वैषम्य नाहीं अशी कल्पना माझ्या मित्रांची झाली. कधी-कधी हा विषय मुद्दाम उकरून काढला असता "आमची लोकसंख्या वाढविण्यासाठी ती गरजच आहे" असे उत्तर त्यांना मिळाले.
  5. डोक्यावरील केस झाकण्यासाठी वस्त्र वापरण्याची सक्ती नाहीं. माझ्या पाहणीनुसार निम्म्या स्त्रिया असे वस्त्र डोक्यावरून घेतात व निम्म्या घेत नाहींत.
  6. सध्याचा असंतोष अमेरिकेच्या तथाकथित इस्लामविरोधी आणि इस्रायलधार्जिण्या धोरणाचा इतरत्र निषेध झाला आहे तसा इथेही होऊ लागला आहे असे वाटते. त्यात ट्युनीशियातील यशामुळे यांनासुद्धा उठाव केल्यास आपण यशस्वी होण्याची जरा जास्त शक्यता दिसू लागली. आता पाठोपाठ जॉर्डन व येमेन इथेही गडबड सुरू होतांना दिसते. पण या विषयावर मी फारसा बहुवाचित (well-read) नाहीं.
  7. आज इथे चिनी नूतन वर्षानिमित्त्य सुटी होती (National Holiday). त्या दोन मित्रांपैकी एक माझ्या कंपनीत आहे. त्याला विचारून आणखी कांहीं माहिती मिळाल्यास सांगतो.
ही साथ आता युनायटेड अरब एमिरेट्स, सौदी अरेबिया, ओमान, कतार अशा जागीसुद्धा पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अमेरिकन परराष्ट्र धोरणाचा कस लागणार आहे.

सुधिर काळे, तुमची माहिती २००३ ची आणि ती हि ऐकिव आहे. त्या कडे दुर्लक्ष करा. २०११ मधे ट्विटर, फेसबुक मुळे माहिती चे प्रसारण अतिजलद असते. इजिप्त मधे ३० वर्षाखालिल ७०% अरब युवक बेरोजगार आहेत.

In reply to by सुधीर काळे

सुधिर काळे , तुमचे अधिकांश लेखन हे पाकिस्तान विरोधी व "प्रो अमेरीका" वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे. अमेरीका म्हणजे "सर्वकाहि" , जगाचा पोलिस असे युटोपिक विचार आता बदलायला हवे. मिडल इस्ट मधील सर्व संग्राम चिरडुन टाकण्यात अमेरीकेचे स्वार्थ आहे. प्रत्येक देशात एक "डिक्टेटर" नेमुन बाजारपेठ काबिज करणे हे अमेरीकेचे राजकारण आहे. गेल्या महिन्यात सुदान मधे अमेरीकेने धर्मावर आधारीत देशाची फाळणी केली, कारण खनिज साठा काबीज करणे ! तुम्हाला अजुन उदाहरणं हवी आहेत का?

In reply to by वडिल

'वडिलां'ना 'बालके' सुधीरचा शि.सा.न.वि.वि. वाचा आणि विचार करा! जास्त कांहीं लिहीत नाहीं. खालील दुवे उघडून पहा! http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_GDP_(PPP)_per_capita Data refer to the year 2009. World Economic Outlook Database-October 2010, International Monetary Fund. Accessed on December 15, 2010. १) २०१० सालचे दरडोई उत्पन्न (in International Dollars): IMF नुसार/World Bank/CIA World Factbook इजिप्त ६३६७/५६८०/६२०० भारत ३२९०/३२७५/३४०० पाक २७८९/२६२५/२६०० श्रीलंका ५१०३/४७८८/४९०० (मीही चकित झालो) इंडोनेशिया ४३८०/४२०५/४३०० मलेशिया १४६०३/१३९८२/१४७०० सिंगापूर ५७२३८/५०७०५/६२२०० अमेरिका ४७१२३/४६४३६/४७४०० (International $ म्हणजे काय ते माहीत नाहीं!) http://www.indexmundi.com/india/unemployment_rate.html Year Unemployment rate Rank Percent Change Date of Information 2003 12.00 % 84 2001 est. 2004 9.90 % 98 -17.50 % 2003 est. 2005 10.90 % 102 10.10 % 2004 est. 2006 9.50 % 95 -12.84 % 2005 est. 2007 10.30 % 118 8.42 % 2006 est. 2008 9.10 % 114 -11.65 % 2007 est. 2009 8.40 % 114 -7.69 % 2008 est. 2010 9.40 % 109 11.90 % 2009 est. म्हणजे २००३ पेक्षा सध्या बेरोजगारी कमी झाली आहे (१२ टक्क्यावरून ९.४ टक्क्यावर)! http://www.indexmundi.com/egypt/unemployment_rate.html Year Unemployment rate Rank Percent Change Date of Information 2003 8.80 % 110 2002 2004 9.50 % 105 7.95 % 2003 2005 9.20 % 83 -3.16 % 2004 est. 2006 8.90 % 91 -3.26 % 2005 est. 2007 7.80 % 92 -12.36 % 2006 est. 2008 7.20 % 89 -7.69 % 2007 est. 2009 6.80 % 85 -5.56 % 2008 est. 2010 10.70 % 122 57.35 % 2009 est. भारतातल्या बेरोजगारीचे प्रमाण इजिप्तपेक्षा खराब आहे आणि २००३च्या मानाने बिघडलेले आहे, ८.८ टक्क्यावरून १०.७ टक्क्यावर). चूकभूल द्यावी-घ्यावी!

नाही हो ... पाकिस्तानविरोधी असेल पण "प्रो अमेरिका" नसावं .... असं आपलं माझं वैयक्तिक मत आहे .. नाहीतरी पाकिस्तान पुढल्या ५/१० वर्षात अनेक तुकड्यांत विखुरला जाईल आणि अमेरिका एखाद्या प्रगत युरोपियन देशाप्रमाणेच शिल्लक राहील. दोन्ही देशांतील मूठभर दिव्यलक्षणी शहाणे शेवटी आपापल्या देशांची वाट लावणार हे नक्की

In reply to by sagarparadkar

प्रिय सागर-जी, बरेचसे बरोबर. पण एक छोटी सुधारणा! माझे लेखन 'पाकिस्तानविरुद्ध'पेक्षा 'पाकिस्तान सरकारविरुद्ध' असते. वैयक्तिक आयुष्यात माझे कांहीं पाकिस्तानी मित्रही आहेत व त्यांच्याशी माझा ई-मेलद्वारा पत्रव्यवहारही चालू असतो. मला अमेरिकन 'लोक' आवडतात, अमेरिकन 'सरकार' आवडत नाहीं! मी प्रो-अमेरिका तर नाहींच कारण अमेरिका पाकिस्तानला मलिदा चारते याचा मला मनापासून संताप येतो! माझी 'न्यूक्लियर डिसेप्शन'वरील लेखमालिका आमच्या 'वडिलां'नी वाचलेली दिसत नाहीं असे वाटते.

In reply to by सुधीर काळे

जगातल्या कोणत्याही राजकिय किंवा सामाजिक समस्येच्या खोल मुळाशी जाउन शोध घेतलात तर तिथे तुम्हाला अमेरिका सरकार किंवा एखादी अमेरिकन कॉर्पोरेट लॉबी सापडेल.

@माझे लेखन 'पाकिस्तानविरुद्ध'पेक्षा 'पाकिस्तान सरकारविरुद्ध' असते. वैयक्तिक आयुष्यात माझे कांहीं पाकिस्तानी मित्रही आहेत व त्यांच्याशी माझा ई-मेलद्वारा पत्रव्यवहारही चालू असतो. मला अमेरिकन 'लोक' आवडतात, अमेरिकन 'सरकार' आवडत नाहीं!
माझ्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत पाकिस्तानी सरकार व आर्मी व हेर संस्था ह्या सामान्य जनतेला आपल्या ह्या परिस्थितीला भारत व अमेरिका जबाबदार आहेत असा अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष संदेश देतात .त्यामुळे हि लोक भारत द्वेष बाळगून असतात .अश्या लोकांशी नित वागायचे म्हणजे सापाला चुचकारणे होईल .ह्या गेल्या ५ वर्षात त्यांच्यात कट्टर पणा दामदुपटीने वाढल्याचे माझा स्वताचा अनुभव आहे .त्यामुळे ह्यांच्याशी दाखल्या देवा दंडवत हेच योग्य ठरते . बाकी अरब देशांबद्दल बोलायचे झाले तर .ह्या जगताची दोन भागात विभागणी होते . तेल व नैसर्गिक वायुने श्रीमंत देश देश (ज्यात सौदी / कतार/ यु ए इ ) हे येतात . तर गरीब अरब देश (प्रामुख्याने आफ्रिकेतील मोरेको/ त्युनेशिया /) व इजिप्त सिरीया . माझे अबू धाबीत अनेक इजिप्त व सिरीयन व फिलीस्तानी कलीग होते . इजिप्त ह्या देशाविषयी काही ठळक गोष्टी मी येथे मांडतो . अरब जगातील सर्वात पुढारलेला देश (वासरात लंगडी गाय शहाणी ) शिक्षणाचा प्रसार इतर अरब देशांपेक्षा जास्त अरब जगातील एकमेव सिने सृष्टी ह्यांच्याकडे म्हणून ह्यांचे अरबी उच्चार आलं अरब जगतात ओळखले जातात . मुस्लीम ब्रदर हूड हि सर्वात जुनी (अरब जगतातील ) निमसरकारी संघटनेवर ह्या लोकांचा खूप विश्वास आर्थिक विषमता भ्रष्टाचार व अर्वाचीन इतिहास हि भारत व इजिप्तचा ची साम्यस्थळे . येथील जनतेने केलेला उठाव हा उस्फुर्त आहे का ? त्याला परकीय देशांची फूस आहे का? ( मागे बी बी सी वर त्याच्या हेर संस्थेने इराण मधील सत्ता परिवर्तन होण्यास कसा सक्रीय हातभार लावला ह्यावर एक माहिती पट पहिला होता ) बहुतांशी देशातील राजघराणी हि निष्क्रिय ठरली जनतेतील असंतोष व दारिद्र्य मिटवण्यात . हि क्रांती मला इराण च्या क्रांतीची आठवण करून देते .जेथे राजघराणे पद्चुत्त होऊन धर्म सत्ता आली . बाकी हि क्रांती हे सोशल नेटवर्क चा परिपाक वाटत नाही .कारण (वीज व नेट पुरवठा हा इजिप्त मध्ये बे भारोशाचा आहे ) सौदी व इतर पेट्रो ओईल वाल्या देशात असे काही होणे संभव नाही .तेथील जनतेला तेथील राजसत्तेने एवढे लाडावून ठेवले आहे .(आर्थिक मदतीचा महापूर करून पांगळे करून ठेवले आहे ) भौतिक सुख आणि चंगळवाद येथे व्यवस्थित झिरपला आहे (अर्थात पुरुष त्याचा लाभ घेऊ शकतात )

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद जी. मुबारक ना हटवण्यामागे कुठली तरी कॉन्स्पीरसी आहे का ? मुबारक यांच्या कडे ४५ ते ७० बीलीयन डॉलर्स ची संपत्ती आहे. शिवाय अमेरीकेत बेवरली हिल्स सारख्या पॉश भागात भरपुर रिअल इस्टेट आहे अशी आकडेवारी बाहेर आली आहे. त्या बद्दल तुमचे मत काय ? आत्ता आलेल्या माहितीनुसार : मुबारक यांनी सत्ते वरुन हटण्यास नकार दिला आहे. सुपरबॉल ला फक्त ६ तास बाकि असताना ओबामा यांना त्यांचा शब्द राखता येइल असे वाटत नाहि. सुपरबॉल च्या पार्टि ची व्हाइट हाउस मधे तयारी सुरु झाली असताना ओबामा यांना अजुन मुबारक आणि इजिप्ट ची चिंता करायला लागते आहे हि गोष्ट अमेरीकन जनते ला पटत नाहिये.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद, आणखी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते कीं अमेरिका हा देश मित्रराष्ट्र म्हणून विश्वासू कधीच नव्हता. त्यांचे खंदे समर्थक इराणचे शहा जेंव्हा तेहरानमधून बाहेर पडले तेंव्हां ते आधी अमेरिकेत आले पण अमेरिकनांनी त्यांना तिथे मुक्काम करू दिला नाहीं. शेवटी मयूरसिंहासनावर बसणारा हा 'सम्राट' एकाद्या बेवारशासारखा हिंडत राहिला व शेवटी इजिप्तमध्ये त्यांची 'सोय' झाली व तिथेच त्यांचा देहांत झाला. (त्यांचे सुपुत्र मात्र अद्याप अमेरिकेत आहेत.) फिलिपाइन्सचे सर्वेसर्वा मार्कोस यांची परिस्थितीसुद्धा अशीच झाली होती. 'न्यूक्लियर डिसेप्शन'च्या पहिल्या चार-पाच प्रकरणात कुठेतरी "आधी अमेरिकेने आपण एकनिष्ठ राष्ट्र आहोत असे सिद्ध करावे" असे कार्टर यांना आणि अमेरिकेला झियांनी ठणकावून सांगितलेले होते. रेगन आल्यानंतरच झिया त्यांच्याशी बोलायला तयार झाले. इंडोनेशियाचे सुहार्तो कांहींसे 'स्वयंभू' होते व ते आपला देश सोडून गेलेच नाहींत. पण त्यांच्या पडत्या काळात अमेरिकेने त्यांना तशी मदत दिली नाहीं जशी ६६-६७ साली दिली होती. मुशर्रफ यांचीही हालतही शेवटी शेवटी कांहींशी अशीच होऊ लागली होती असा उल्लेखही 'न्यू.डि.'मध्ये शेवटच्या प्रकरणात आहे! त्यामुळे आता होस्नी मुबारक यांना जायला सांगून अमेरिका काय मिळविणार आहे/घालविणार आहे हे सांगणे सध्यातरी कठीणच वाटते. काका अवांतरः मनीला येथे राजवाड्यासमोर हजारो निदर्शक जमलेले असताना लष्कराने आपली शस्त्रे (आता कैरोत इजिप्तच्या सैन्याने केली आहेत तशीच) म्यान केली होती व एका महिलेले त्यातल्या एका सैनिकाला गुलाबाचे फूल दिले होते व ते त्याने गोंधळून स्वीकारलेही होते हे अजूनही लक्षात आहे.

आत्ताच काही सांगणे कठीण आहे . पण एकाच वेळी देशातील जनता रस्त्यावर उतरणे व जोशात आंदोलन करणे हे बॉलीवूड सिनेमासारखे वाटते . ह्या क्रांतीला बाह्य शक्तीची फूस आहे .पण ती शक्ती अमेरिकन पुरस्कृत आहे कि अरब जगतातील काही शक्ती अमेरिके विरुध्ध कट्टर पंथीय सरकार आणतील ह्या बाबत मी सांशक आहे . काही दिवसात चित्र स्पष्ट होईल . नवीन अरब सरकार कट्टर असेल कि उदार मतावादाच्या नावाखाली अमेरिकेचे अघोषित मांडलिकत्व स्वीकारेल ह्या वरून कळून येईन . ओबामा हे प्रकरण फारच सावध रित्या हाताळत आहेत .अमेरिकेची ह्या क्रांतीत दखल अरब जगतात एक ठिणगी उडवून देइल . सध्या तरी तू नळीवर पाकिस्तानी स्वयंघोषित विचारवंत ह्या वृत्ताला कशी प्रसिद्धही देत आहेत ह्यावर लक्ष ठेवून आहे .(ती लोक आपल्या बाळबोध वक्तव्यांनी मनमुराद हसवतात .)

मी दिलेले GDP/PPP आणि Unemployment बद्दल दिलेले आकडे बरोबर असल्यास या बाबतीत इजिप्त एक 'देश' या नात्याने भारतापेक्षा जास्त सुस्थितीत वाटतो. 'मिपा'वरील एका जाणकार सभासदाने मला सांगितले कीं IndexMundi चे आकडे विश्वासार्ह असतात. त्यामुळे उठावामागच्या खर्‍या-खुर्‍या कारणाचा अर्थबोध होत नाहीं. माझ्या इजिप्तमध्ये दोन वर्षे काढलेल्या (सध्या माझ्याबरोबर पुन्हा काम करत असलेल्या) सहकार्‍याने त्याच्या जुन्या इजिप्शियन मित्रांना ई-मेल लिहून या उठावाचे कारण विचारलेले आहे. पण उत्तर नाहीं. कदाचित् राजकारणावर बोलणे टाळत असतील. माझा हा सहकारी त्यांच्या गेली ६-७ वर्षें संपर्कात आहे व संबंध इतके जवळचे आहेत कीं मध्यंतरी माझा सहकारी इजिप्तला गेला असताना त्याचा हा मित्र व त्याची पत्नी अलेक्झांड्रियाहून ४०० किमी येऊन त्याला कैरोत भेटलेही होते. http://www.thejakartapost.com/news/2011/02/05/mideast%E2%80%99s-unrest-eyes-indonesian-muslim.html (किंवा http://tinyurl.com/6gp4xun) या जकार्ता पोस्टमधील लेखातही इजिप्शियन लोकांनी राजकारणावर बोलण्यास नकार दिल्याचा उल्लेख आहे. पण शेवटी इतक्या दूरवरून मिळालेल्या second hand माहितीवर किती अवलंबून रहायचे हा एक प्रश्नच आहे. जर माझ्या सहकार्‍याच्या इजिप्शियन मित्रांनी उत्तर दिले तर मात्र ते first hand समजता येईल. त्यांचे उत्तर मी इथे उद्धृत करेन.

In reply to by कापूसकोन्ड्या

कालच्या जकार्ता पोस्ट मधील या बातमीत 'अहमद एझ' यांचे नांव वाचले. मी इजिप्तला यांच्याच कंपनीत काम करायच्या उद्देशाने दोन वेळा गेलो होतो. हे अहमद एझ मुबारक यांच्या मुलाचे निकटवर्ती असल्याने आधी सरसर वर चढले पण आता गोत्यात आलेले दिसतात. माझा सहकारी यांचीच एक नवी फॅक्टरी उभी करायला सुवेझ येथे होता. पण आता अहमद एझ इतक्या प्रकाशझोतात आलेले वाचल्यावर माझ्या सहकार्‍याचा जुना मित्र त्याच्या प्रश्नाला उत्तर देईल असे वाटत नाहीं! http://www.thejakartapost.com/news/2011/02/08/tycoon-becomes-target-egypt.html

In reply to by सुधीर काळे

माझा सहकारी यांचीच एक नवी फॅक्टरी उभी करायला सुवेझ येथे होता. पण आता अहमद एझ इतक्या प्रकाशझोतात आलेले वाचल्यावर माझ्या सहकार्‍याचा जुना मित्र त्याच्या प्रश्नाला उत्तर देईल असे वाटत नाहीं! काळे काका, नकोते धाडस करू नका अशी विनंती ह्या लोकांशी चार हात दूर असलेलेच बरे.