उडान
णमस्कार्स ,
संबंधितांना टिप : हा लेख उडवायचा असल्यास किमान एकदा सुचित करावे . कारण कळल्यास आजन्म ऋणी राहु.
मस्तकलंदर या मुलीने ह्या विषयावर लिहायला प्रवृत्त केल्याने तिचे औपचारिक आभार.
डिस्क्लेमर : ह्या प्रकाराला चित्रपट परिक्षण म्हणता येणार नाही. नव्हे तो आमचा प्रांत ( शिवाय जात / धर्म ) नव्हे.
काल रात्री जरा फावला वेळ मिळाला. सहज मुव्हीज चं फोल्डर ब्राऊझ करत होतो. सगळे छाणछाण चित्रपट पाहुन झाले होते. " १२७ आवर्स " हा चित्रपट पहाणार होतो .. पण त्याच्या शेजारीच मला "उडान" दिसला. परवाच एका फिल्म अॅवॉर्ड कार्यक्रमात ह्या चित्रपटातल्या नायकाला बेस्ट डेब्यु का काही तरी असा अॅवॉर्ड मिळाला होता. म्हणुन सहज क्लिक केलं..
चित्रपटाविषयी कोणतीही पुर्वकल्पना नव्हती. पण सुरुवातीलाच मंजोत सिंग ची एंट्री पाहुन थोडा इंट्रेस्ट आला. आणि हा हा म्हणता चित्रपट पुर्ण संपवला. चित्रपट संपल्यावर गळा दाटुन आलेला. डोळे ओले होते ,आणि मेंदु ला मुंग्या आलेल्या होत्या. अनपेक्षित रित्या एका अतिषय सुंदर असा चित्रपट पाहिला होता.
चित्रपटाची सुरुवात होते ती शिमल्यातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणार्या बिशप कॉटन स्कुल मधे. चित्रपटाचा नायक "रोहन" आणि त्याचे चार मित्र ( विक्रम, बिनॉय आणि मनिंदर) रात्री हॉस्टेलच्या भिंतींवरुन उडी मारुन शहरात जातात ते प्रौढ चित्रपट पहायला. चित्रपट सुरुही होतो , तोच एकाला थेटराच्या मागच्या सिट वर एक बुड्ढा आणि एक व्यावसायिक स्त्री व्यवहार करण्यात मश्गुल् दिसतात. त्यांचा तो व्यवहार आपसुक तो दुसर्या मित्रांना सांगतो . अपेक्षेप्रमाणे ते कमेंट पास करतात. तो बुढौ नेमका त्यांचा हॉस्टेलप्रमुख निघतो. पोरं पळुन जातात पण वाटेत एकाचा पाय मुरगळतो आणि हॉस्टेलप्रमुख त्यांच्या आधी हॉस्टेल मधे पोहोचतो आणि मग प्रकरण उघडकीस येतं. अपेक्षेप्रमाणे सर्वांना स्कुल मधुन काढुन टाकण्यात येतं . मनिंदर ने शाळेतल्या उनाड पोराची भुमिका मस्त केली आहे.
रोहन हा कविता करतो , कथाही लिहीतो . त्याला पुढे लेखक व्हायचं असतं.
रोहन आपल्या घरी "जमशेदपुर" ला निघुन येतो. रोहन चा पप्पा म्हणजे "क्यो की सांस भी ... " मधल्या तुलची चा तिसरा मिहीर विराणी अर्थात रॉनित रॉय असतो. रोहन ने आपल्या बापाला गेली ८ वर्षे पाहिलेलंच नसतं. रोहनची आई गेल्यावर त्याची हॉस्टेलला रवानगी झालेली असते. बाप एकही शब्द न बोलता त्याला कार मधे बसवतो , घरी गेल्यावरही शब्द न बोलता घरात निघुन जातो. रोहन स्वतः त्याची ट्रंक घेउन वर त्याच्या जुण्या रुम मधे जातो तेंव्हा त्याच्या रुम वर एका ६ वर्षाच्या मुलाने कब्जा केलेला असतो. तो आपला सावत्र भाऊ आहे आणि त्याचीही आई गेली आहे , हे त्याला तेंव्हा समजते. "अर्जुन" त्याचं नाव. रोहन अर्थातंच त्याला झिडकारतो . त्याचं सगळं सामान काढुन स्वतःचं सामान लावतो.
संपुर्ण चित्रपटात अर्जुन कडुनही अतिशय उत्तम अभिनय करवुन घेतला आहे.
रोहनचा पप्पा , रोहन आणि अर्जुन ला घेऊन त्याच्या भावाकडे डिनर ला जातात. हा भाऊ म्हणजे राखी का स्वयंवर मधला ढेप्या अँकर. तिथे रोहन ला त्याची इच्छा न विचारता इंजिनियरिंग शिकायला जाण्याचा आदेश होतो. रोहन तो झिडकारतो , आर्ट्स लिटरेचर करुन लेखक होण्याची इच्छा जाहिर करतो. तेंव्हा पप्पा त्याला खुप काही ऐकवतो. रोहन उलट बोलल्यावर त्याच्यावर हात पण उगारतो. अंकल रोहनच्या बाजुने असतो. बापाचे क्रुर नियम, पोरांना अजिबात समजुन न घेणं , त्यांना स्वतःच्या ढाच्यात मोल्ड करणं, ह्या गोष्टींत पोरांची होणारी कुचंबना अप्रतिम रित्या हाताळली आहे.
रोनित रॉय ला बहुतेक पोरांनी आपल्याला बाबा /डॅड म्हणनं पसंत नसावं .. त्यामुळे पोरांनी आपल्या सिनियर्स ला जसे सर म्हणतो तसं "सर" म्हणावं हा त्याचा आग्रह असतो.
रोहन ह्या वातावरणाला कंटाळुन निराष होतो. त्याचा बाप त्याला कॉलेजा आधी त्याच्या फॅक्टरीत कामं करायला लावतो.
रात्री बापाची गाडी घेऊन गुपचुप दारु प्यायला जाणे , सिगारेटी फुंकणे, बापाच्या पाकिटातनं पैसे चोरणे सगळं रोहन करतो. अर्जुन खुप लाघवी आहे. त्याची ही आई गेल्यामुळे तो एकटाच पडलेला आहे. सर चा त्याला कायमंच धाक आहे. आणि रोहन आल्यामुळे तो रोहन शी सलगी करु पहातो पण रोहन त्याला अॅक्सेप्ट करत नाही.
एकदा अर्जुन ची शाळेतुन कंप्लेंट येते , आणि नेमक्या त्याच वेळी रॉनित ला शाळेत यावं लागल्यामुळे त्याचा काँट्रॅक्ट जातो. तो अर्जुन ला घरी इतका मारतो की त्याला हॉस्पिटल मधे दाखल करावे लागते. रोहन ला जेंव्हा कळलं की आपल्या बापाने अर्जुनला एवढ्या बेरेहमीने मारलंय .. तेंव्हा त्याला खुप वाईट वाटतं. हॉस्पिटल मधुन आल्यावर रोहन आणि अर्जुन जवळ येतात. रोहन इंजिनियरिंग ला फेल झाल्याने रोनित त्याचं शिक्षण बंद करुन फॅक्टरीत फुल टाईम कामाला लावण्याचा निर्णय घेतो. तसं च छोट्या अर्जुनला ही हॉस्टेल ला पाठवण्याचा क्रुर निर्णय घेतो. शिवाय तिसरं लग्न करणार असल्याचंही सांगतो . त्याचा भाऊ त्याला समजवायचा प्रयत्न करतो पण रॉनित त्यालाही अपमान करुन घराबाहेर काढुन देतो.
तिकडे रोहन चे स्कुलमेट्स मुंबै ला मस्त ऐश करत असतात. एका मित्राच्या पप्पांनी रेस्टॉरंट काढुन दिलेलं असतं तिथे तिघे ही मौजमजा करत असतात. त्यांच्याशी रोहन जेंव्हाही फोन वर बोलतो तेंव्हा कष्टी होतो.
पण बापाच्या ह्या क्रुरतेला कंटाळुन रोहन शेवटी मुंबै ला जाण्याचं ठरवतो. अर्जुन ची रवानगी हॉस्टेलला ठरलेली असते जो चित्रपटात मला सगळ्यात टची क्षण वाटला.
शेवटी काय होतं ? रोनित आपल्या मुलांना समजुन घेतो ? तिसर्या लग्नाचा निर्णय कँसल करतो ? की रोहन मुंबै ला निघुन जातो ? की बापाच्या फॅक्टरीत काम करुन आपलं लेखक व्हायचं स्वप्न मोडुन काढतो ? लहानग्या अर्जुनला हॉस्टेलच्या जंगलात सोडण्यात येतं ?
शेवट काय होतो ते पहायचा असेल तर चित्रपट पहा. जर आवडला नाही तर माझ्याकडुन १०० रुपै फुकट घेऊन जा.
चित्रपटात खुप छोट्या छोट्या गोष्टी प्रभावी पणे दाखवल्या आहेत. दिग्दर्शकाचं काम अफलातुन आहे. पण बाप रॉनित रॉय , मोठा रोहन आणि छोटा अर्जुन सगळ्यांनीच तेवढ्याच उत्कृष्ठ अभिनयाने चित्रपटाला न्याय दिलेला आह.
हिंदी चित्रपट ( मग ते अॅक्शन असो वा ड्रामा , थ्रिलर असो वा सायफाय ) मी नेहमी कॉमेडी मुव्ही म्हणुनच पहातो. आणि त्यातल्या भंकसपणावर मनमुराद हसतो. पण उडान ने आमच्या ह्या विचारसरणीलाच छेद दिला. डोळे पाणावले.

वाचने
7000
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही जणांच्या विनंतीवरुन
चांगले परीक्षण. आपल्या
सुंदर परिक्षण टारबा. हा
छान सांगितले आहे .. धन्यवाद
र्टारु चे डोळे पानावाले हे
छान लिहलेस..!
मी सुढ्ढा पाहीण म्हणातेय !!!
उतरवुन घेतल्या आहे. लवकरच
चित्रपट
सगळी ष्टोरी !
मस्त ...
+१
In reply to मस्त ... by छोटा डॉन
छान परिक्षण मी हा चित्रपट
छान परिक्षण....
डिसग्रेसफुल
हो...
In reply to डिसग्रेसफुल by स्वैर परी
अरे व्वा. लेख येऊन तेरा
चित्रपट ओळख आवडली. अवांतरः
आहेच मुळी एक नंबर
चित्रपट परीक्षण आवडले. जरुर
बर
त्याअगोदर
In reply to बर by सहज
नक्कीच बघेन..
नाव
नाव वाचल्यावर वाटले, 'लेख
In reply to नाव by कवितानागेश
सहमत आहे. टारुचा आदर्श घेऊन
In reply to नाव वाचल्यावर वाटले, 'लेख by टारझन
अवांतर : कांदे सध्या स्वस्त
In reply to सहमत आहे. टारुचा आदर्श घेऊन by अवलिया
सुंदर चित्रपट परिक्षण .
१०० रुपडे तयार
ओळख
२दा
ओळख वाचली नाही
छान
सुरवात वाचली. लेखाची लांबी
अनेक दिवसांनी आलेला एक चांगला