✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

थेंब टपोरे

अ — अविनाश ओगले, Sun, 06/08/2008 - 12:08

प्रतिक्रिया द्या
3534 वाचन

💬 प्रतिसाद (10)
व
विवेक काजरेकर Sun, 06/08/2008 - 13:35 नवीन

छान आहे अष्टाक्षरी पण .....

पहिल्या दोन कडव्यातला "गं" हा शब्द जरा भरीचा वाटतोय. तो टाळता आला असता तर बरं झालं असतं. बाकी सुंदर
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Sun, 06/08/2008 - 16:26 नवीन

चांगली

रचना हीही... विवेक यांच्याशी असहमत. गं नसेल तर वाचताना पंचाईत होतेय.
  • Log in or register to post comments
व
विवेक काजरेकर Sun, 06/08/2008 - 17:02 नवीन

नारदाचार्य

माझ्या मताशी सहमत न होण्याचं कारण माझ्या त्रोटक प्रतिसादातून निर्माण झालेल्या गैरसमजामुळे असेल त्याबद्दल प्रथम क्षमा मागतो. मी जेंव्हा "गं" हा शब्द भरीचा वाटतोय असं मत दिलं त्या वेळी तो काढून टाकून ही कविता जशीच्या तशी वाचून पहावी असं मला सुचवायचं नव्हतं. (कारण तसं केलं तर ८ अक्षरातलं एक अक्षर कमी होऊन लयीत वाचायला बाधा येणारंच). तिथे पर्यायी शब्दयोजना पाहिजे असं मला म्हणायचं होतं "भरीचा" हा शब्द मी जो शब्द अनावश्यक आहे, ज्याने अर्थात काही भर पडत नाही, किंवा जो कधीकधी केवळ मीटर सांभाळण्यासाठी घातला जातो अशा अर्थाने वापरला होता. यावर ओगले साहेबांचं मत ऐकायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नारदाचार्य
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/08/2008 - 21:30 नवीन

खी खी खी :)

यावर ओगले साहेबांचं मत ऐकायला आवडेल आता कवी महोदय थेट भेटतील पुढील कवितेच्या वेळेस. :) आम्हालाही त्या 'ग' ची अडचणच वाटली. पण मात्रा बित्रांचा तोल ढळू नये म्हणुन कवींनी तसे केले असेल असे वाटते. अर्थात आपण जाणकार आहात तालासुरांची आपणास एक पारखी नजर आहे. आपल्या मताशी आम्ही सहमत आहोतच,पण कवी पेक्षा एक वाचक म्हणून आम्हाला 'ग' ची बाधा मात्र नक्कीच झाली. ;) ( ह. घ्या कवी साहेब ) -दिलीप बिरुटे (लेखन टाकून पसार होणा-या लेखकांची वाट पाहणारा एक वाचक आणि चातक )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक काजरेकर
अ
अरुण मनोहर Sun, 06/08/2008 - 18:41 नवीन

तरीही छंदात आहे

कविता आवडली. "गं" काढून वाचून पाहिली. मला वाटते, "गं" काढलेलाही चालेल. तालात अडचण येत नाही. कारण असे की--- मातीच्या अंगावर लक्ष रोमांच फुलती आणि फुलांच्या पाकळ्यात मोती टपोरे झुलती ह्यामधे, जोडाक्षरे (मातीच्या , फुलांच्या ) असल्याने आठ अक्षरांचा आभास होतो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 22:49 नवीन

वा!

वा ओगले साहेब! सुंदर कविता! वाचून प्रसन्न वाटलं! :) आपला, (थेंबाथेंबातला) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 06/08/2008 - 22:59 नवीन

प्रसन्न+कलाटणी

पहिल्या तीन कडव्यांतून प्रसन्न निसर्गचित्र रंगवणार्‍या कवितेस शेवटच्या कडव्यात मिळालेली कलाटणी आवडून गेली. (प्रसन्न)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/09/2008 - 02:57 नवीन

सुंदर!

चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Wed, 06/11/2008 - 20:12 नवीन

'ग' बद्दल...

'ग' बद्दल छान चर्चा! ग ग ग ग ग ग.... असो. हे सारे कवितेबद्दलचे तुम्हा मंडळींचे प्रेम आणि जाणकारी व्यक्त करणारे आहे. कविता खूप जुनी. 'कवितेचा छंद आहे, पण कवितेच्या छंदांचा अभ्यास नाही' अशा काळातली. अष्टाक्षरी वगैरे शब्दही माहित नसल्याच्या काळातली. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा वाचली. तुझ्या स्मृती जागतात डोळा डोळ्यास लागेना या ओळींशी 'ग' संबंध असावा असे आज जाणवते. तेव्हा मात्र सहजच लिहून गेलो. बिरूटे साहेब, लेखन टाकून पसार वगैरे झालो नाही. इथंच आहे. पण मराठी भाषा, कविता, कवितेचं व्याकरण या विषयावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. वाणिज्य पदवीधर आणि बँकेतील नोकरी. काय बोलणार? तुमच्या चर्चेतूनच काहीतरी शिकत राहतो. सर्वाना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/11/2008 - 23:02 नवीन

आमचाही अधिकार नाही

बिरूटे साहेब, लेखन टाकून पसार वगैरे झालो नाही. इथंच आहे. पण मराठी भाषा, कविता, कवितेचं व्याकरण या विषयावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. आम्हालाही तो अधिकार नाही. पण, आपल्या कवितेवर चर्चा चाललेली आहे तर, आपण त्यावर बोलावे अशी एक ढोबळ अपेक्षेने आम्ही तसे लिहिले. रागावला असाल तर क्षमा असावी. कविता,कवीतेच्या व्याकरणाचा आम्हाला अभ्यास असता तर आम्हीही आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रभर काव्यरसिकांना आमच्या कविता ऐकवल्या असत्या !!! :) 'ग' च्या खुलाशाबद्दल आभारी आहे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश ओगले

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा