मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओल्या काजूंची उसळ

यशोधरा · · पाककृती

वाचने 10371 वाचनखूण प्रतिक्रिया 50

In reply to by विंजिनेर

गणपा Fri, 01/28/2011 - 17:15
वा! अस्सल कोकणी पाकृ!
अस्स्च म्हणतो. ओल्या काजुची असो वा फणसाची या भाज्या म्हणजे कोकणच्या खाद्य परंपरेची शान आहे. दुर्दैवाने आज वर नुसत ऐकुनच आहे. :(

In reply to by असुर

यशोधरा Fri, 01/28/2011 - 20:35
बघ म्हंजे झालं रे असुरा :D तो गणप्याला बोलावतोय कारण मग त्यालाच सांगेल हे बनव अन् ते बनव, आणि हे महाशय हादडतील! तुला जमतंय का गणप्याभौ सारखं पाकनिष्पत्ती करायला? आलं का काही ध्यानात?

In reply to by गणपा

यशोधरा Fri, 01/28/2011 - 17:28
अरेरे, येवा, पुणेही आपलाच आसा. फक्त येताना तू जेवढ्या पाकृ टाकल्या आहेत, तेवढ्या सगळ्या बनवून आणणे. :P

In reply to by यशोधरा

स्वाती दिनेश Fri, 01/28/2011 - 19:29
फ्राफु पण आपलाच असा... फक्त ओले काजू इथे मिळत नाहीत,:( तेवढे घेऊन येवा... आणि टिन मधल्या फणसाची भाजी नको असेल तर तो ही घेऊन येवा.. ;) दोन्ही भाज्या करुन मिळतील..( सोबत इतर काही केकृच्या कलाकृती ही मिळतील..) यशो.......... आता इथे कुठे आलेत ग ओले काजू...? आता कधी खायला मिळणार काय माहित..:( टारुच्या भाषेत पाकृ वाचून तोंड लाळावले..:) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

सखी Fri, 01/28/2011 - 20:45
मीही खूप ऐकलं आहे ह्या उसळीबद्दल. पण इथेही ओले काजू इथे मिळत नाहीत :( त्यामुळे यशो पुण्यात आले की मीही तुला नक्की कळवतेच गं - कसे :)

In reply to by स्वाती दिनेश

विजुभाऊ Sat, 01/29/2011 - 11:12
स्वाती तै......... तिकडे येताना नाना काखेत कच्चा फणस आणि काठीला बांधलेल्या गठुड्यात ओले काजू घेउन इमानात मुन्डासे घालून बसलाय . तो फणस शेजारच्या शूमाखर ला टोचतोय हे चित्र डोळ्यापुढे आले. ( "म्हैस "कथा थोडी मॉदीफाईड करून बघा )

In reply to by रेवती

स्वाती दिनेश Fri, 01/28/2011 - 19:32
अगदी खरं ग रेवती...ओल्या काजूच्या उसळीच्या फोटोला इनोची बाटली पुरली नसती... खूप मस्त लागते ही उसळ... ओले खोबरे + कोथिंबिर भरपूर हवे.. आम्ही अळूच्या भाजीत पण ओले काजू घालतो.. झक्कास लागत. काय ग यशो, एका काजूच्या उसळीवरुन तू अजून किती पदार्थांची आठवण करवलीस...:( स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

ज्योति प्रकाश Fri, 01/28/2011 - 21:32
मसाल्याचे वान्गे पण ओले काजू घालून छान लागते.तसेच गोव्यात याच काजुचे म्हवल म्हणून गोड पदार्थ करतात त्याची पाककृती नन्तर टाकेन.

प्राजु Fri, 01/28/2011 - 19:47
यशो.. कोंकणी गो ही पाकृ.!! फोटू नसल्यान... प्रतिक्रिया काय देणार?? या उसळीमध्ये काळे वाटाणे घालतात ना. कारण तशी मी सावंतवाडीला खाल्ली आहे.

In reply to by प्राजु

यशोधरा Fri, 01/28/2011 - 20:39
प्राजू, काळे वाटाण्यांची जागा केळफुलांच्या भाजीत.मी तरी नाही पाहिले काजूच्या उसळीत घातलेले. भाजी वाढवायला घातले असतील कदाचित, वा घालतही असतील हां,मला कल्पना नाही. करु तितके प्रकार गं.

असुर Fri, 01/28/2011 - 20:32
रेवतीतैशी अगदी जोरात सहमत! असली जीवघेणी पाकृ दिल्याबद्दल यशोआत्येचा झाईर णीसेद! :-) आणि फटू न टाकल्याबद्दल हार्दिक्क अभिनंदन!!! वाचलो आत्मिक जळजळीतून!! पोटाच्या जळजळीवर इनो घेता येऊ शकेल एक वेळ, पण आत्मिक जळजळीवर उपाय नाही! =)) =)) यशोआत्या, मी पुण्यास आलो की हा बेत नक्की कर हो! ओल्या काजूची उसळ, ही हा हा हा हा हा हा!!! -- (हावरट) असुर

In reply to by निवेदिता-ताई

मेघवेडा Fri, 01/28/2011 - 21:04
शेवयांची खीर करायची असली आणि शेवया नसल्या तर काय करता? गव्हाची/तांदळाची/कसलीही खीर करता ना? तसंच. मुगाची/मटकीची/वाटाण्याची/कसलीही उसळ करायची! शिंपल!!

पैसा Fri, 01/28/2011 - 20:55
आमच्या बागेत काजू व्हायला अजून २ महिने अवकाश आहे, आणि आता पाकृ देतेस काय?

पिवळा डांबिस Fri, 01/28/2011 - 22:58
चला! पुढल्या खेपेच्या भेटीतला एक वार लागला!!!!:) बाकी फोटो बघायचीसुद्धा जरूरी पडली नाही, यशो! तुझी रेसेपी वाचतांना आजीच्या हातची काजूची उसळ मनःपटलावर उमटली. आणि त्या उसळीबरोबर आजीचीही आठवण दाटून आली....

चित्रा Sat, 01/29/2011 - 02:17
उसळ आवडली. :) आता काजू नाहीत तेव्हा काय भिजत टाकू, असा विचार करते आहे.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Sat, 01/29/2011 - 11:45
अरे तिच्या ब्लॉगची लिंक वर दिल्येय ना, तिथे बघ की!! कमाल आहे बुवा या नव्या मिपाकरांची!!!;) सगळं कसं रेडिमेड इथ्थेच पाहिजे!!!!;) आणि म्हणे आम्ही देवगडकर!!!! साधी काजूची उसळ डोळ्यापुढे येत नाही!!!! तुझे पूर्वज रडत असतील स्वर्गात!!!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

टारझन Sat, 01/29/2011 - 13:01
ह्या दोन पोरांना नको तिथे अवांतरपणा करण्याचा कसला णाद लागलाय अलिकडे ... संपादक मंडळातल्या पोरी खपवुन घेतात म्हणुन काहीही करतात हे :) हॅहॅहॅ

In reply to by पिवळा डांबिस

टारझन Sat, 01/29/2011 - 13:45
णव्हे णव्हे ... वाटाणा नव्हे .. काळा मिरु आहे मी :) एकदा दाताखाली आला की समजतं मी कोण ते .. खि खि खि ... काजु च्या उसळीच्या चर्चे चा मान फक्त विजु आणि प्राजु ह्या मुला-मुली ला आहे .. कारण फक्त हे दोघेच वृत्तात बसतात. बाकी सगळे वालाच्या आणि शेवग्याच्या शेंगा .. -(ओढुन ताणुन वृत्तात बसलेला) टार्जु

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ Sat, 01/29/2011 - 14:24
आणि म्हणे आम्ही देवगडकर!!!! डाम्बीसकाका त्या देवगड वाल्याना फार डिवचू नका चिडलेबिडले तर एकदम रागावून "हापूसच्या ओल्या कोयीचा कुर्मा" असली पाककृती हाणायचे टकुर्‍यात