Skip to main content

प्राप्तीकर वाचवण्यसाठी पैसा कुठे गुतंवावा ?

प्राप्तीकर वाचवण्यसाठी पैसा कुठे गुतंवावा ?

Published on शुक्रवार, 21/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 1657
प्रतिक्रिया 14

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आपण पैसे भरले नसल्याने आपली आउटगोइंग सेवा तुर्तास बंद करण्यात आलेली आहे. कॉल सुरु करण्यासाठी रिचार्ज करा. अवांतर : प्राप्तिकर वाचुन वाचुन किती वाचतो हो ? भरा की .. - हेयरतेल

In reply to by टारझन

अवांतर : प्राप्तिकर वाचुन वाचुन किती वाचतो हो ? भरा की .. तो वाचवण्याच्या नादात सगळे उत्पन्न कुठेतरी गुंतवून ठेवले तर आपल्यालाही त्याचा उपभोग घेता येत नाही. त्यापेक्षा सरळ कर भरावा आणि उरलेला पैसा मनाजोगता खर्च करावा असे माझे मत आहे.

In reply to by आनंद घारे

>>प्राप्तिकर वाचुन वाचुन किती वाचतो हो ? भरा की .. जास्तीत जास्त ३०००० पर्यंत वाचू शकतो. माझ्यामते ही रक्कम छोटी नाही. >>तो वाचवण्याच्या नादात सगळे उत्पन्न कुठेतरी गुंतवून ठेवले तर आपल्यालाही त्याचा उपभोग घेता येत नाही आत्ता नसेल घेता येत उपभोग, पण नंतर घेता येतो. ही रक्कम परत मिळणार असतेच ना काही वर्षांनी. >>त्यापेक्षा सरळ कर भरावा आणि उरलेला पैसा मनाजोगता खर्च करावा असे माझे मत आहे म्हणजे गुंतवणूक करूच नये की काय? मग निवृत्त झाल्यावर काय करायचे हो?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विष्वनाथ जी , कोणी किती टॅक्स वाचवावा / गुंतवणुक करावी हे सांगण्याचा अधिकार मला नाही , मी एक निरिक्षण नोंदवले.

In reply to by टारझन

कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत करु शकता. a1 बाकी आमची प्राप्तीच नाही म्हनुन कराचे कारण नाही. कर नाही तर डर कशाला?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

३०००० रुपये कर वाचवण्यासाठी मला आधी आपले उत्पन्न खूप वाढवून ते उच्च पातळीवर न्यायला हवे.(जे कठीण आहे) समजा ते तितके वाढले तर मग मला ३०००० रुपये ही कदाचित फार मोठी रक्कम वाटणार नाही. मी पाच वर्षांपूर्वी निवृत्त झालो आहे. त्यामुळे आता मला भविष्यकाळापेक्षा वर्तमानकाळ अधिक महत्वाचा वाटणे साहजीक आहे. भविष्यकाळासाठी तरतूद करणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. करात बचत होवो वा न होवो, ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडतांना कर वाचवण्याचा विचार करायला हरकत नाही. पण कर वाचवणे हा मुख्य उद्देश ठेवून बळजबरीने बचत करणे हे स्वतःवर अन्याय करण्यासारखे आहे.

In reply to by आनंद घारे

>>३०००० रुपये कर वाचवण्यासाठी मला आधी आपले उत्पन्न खूप वाढवून ते उच्च पातळीवर न्यायला हवे.(जे कठीण आहे) समजा ते तितके वाढले तर मग मला ३०००० रुपये ही कदाचित फार मोठी रक्कम वाटणार नाही हा मुद्दा बरोबर आहे. मी अजून जुन्या tax slab च्या काळात आहे बहुतेक :-) काही वर्षांपूर्वी पर्यंत २.५ लाखाच्या पुढे ३०% लागत असे. ते आता एकदम १० लाख केले आहे. हे पटकन लक्षात नाही आले. तरीही, एखाद्याचे उत्पन्न ६ लाख असेल तर त्याचे २०००० वाचू शकतात. >>मी पाच वर्षांपूर्वी निवृत्त झालो आहे. त्यामुळे आता मला भविष्यकाळापेक्षा वर्तमानकाळ अधिक महत्वाचा वाटणे साहजीक आहे. बरोबर आहे. पण जे आत्ता तरुण आहेत त्यांनी कमीतकमी आत्ताच्या मौजमजे इतकेच महत्त्व योग्य गुंतवणुकीला दिले पाहिजे (खरे तर जास्त दिले पाहिजे). >>कर वाचवणे हा मुख्य उद्देश ठेवून बळजबरीने बचत करणे हे स्वतःवर अन्याय करण्यासारखे आहे होय. करबचत होते म्हणून अयोग्य ठिकाणी गुंतवणूक करणे ठीक नाही. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर, PF आणि विमा यामुळे जी रक्कम करमुक्त होते ती वगळता उरलेली मी सरळ ELSS मध्ये टाकतो. २००५ ते २००७ या काळात केलेल्या गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळाला आहे. २०१२ साली DTC लागू झाला की ELSS मध्ये गुंतवणूक करता येणार नाही. तेव्हा कदाचित कर भरेन सरळ :-)

या आर्थिक वर्षा मधे ईंफ्रास्ट्र्क्च्र बाँड (मराठी प्रतिशब्द?) मधे गुंतवणुक केल्यास कलम ८० सी खाली रु. २०,००० अधिक वजावट मीळु शकते. सध्या आय.डी. एफ. सी. बाँड बाजारात उपलब्ध आहेत. बाकी प्राप्तीकर वाचवण्या साठी PPF किंवा NSC हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

या आर्थिक वर्षा मधे ईंफ्रास्ट्र्क्च्र बाँड (मराठी प्रतिशब्द?) मधे गुंतवणुक केल्यास कलम ८० सी खाली रु. २०,००० अधिक वजावट मीळु शकते. सध्या आय.डी. एफ. सी. बाँड बाजारात उपलब्ध आहेत.
८० सी नव्हे ८० सी सी एफ :) तसेच हे बॉंड एकूण १० वर्षासाठी असतात पण विकत घेताना ५ किवा ७ वर्षानी बाय-बॅक करता येतात. तसेक व्याज हे दरवर्षी मिळायला पाहिजे के चक्रवाढ हेही ठरवता येत

इथं काही मदत मिळु शकेल, http://rupeshkanabar-personal-finance.blogspot.com/ अर्थात आपापल्या जबाबदारीवर हं !