आपण पैसे भरले नसल्याने आपली आउटगोइंग सेवा तुर्तास बंद करण्यात आलेली आहे. कॉल सुरु करण्यासाठी रिचार्ज करा.
अवांतर : प्राप्तिकर वाचुन वाचुन किती वाचतो हो ? भरा की ..
- हेयरतेल
अवांतर : प्राप्तिकर वाचुन वाचुन किती वाचतो हो ? भरा की ..
तो वाचवण्याच्या नादात सगळे उत्पन्न कुठेतरी गुंतवून ठेवले तर आपल्यालाही त्याचा उपभोग घेता येत नाही. त्यापेक्षा सरळ कर भरावा आणि उरलेला पैसा मनाजोगता खर्च करावा असे माझे मत आहे.
>>प्राप्तिकर वाचुन वाचुन किती वाचतो हो ? भरा की ..
जास्तीत जास्त ३०००० पर्यंत वाचू शकतो. माझ्यामते ही रक्कम छोटी नाही.
>>तो वाचवण्याच्या नादात सगळे उत्पन्न कुठेतरी गुंतवून ठेवले तर आपल्यालाही त्याचा उपभोग घेता येत नाही
आत्ता नसेल घेता येत उपभोग, पण नंतर घेता येतो. ही रक्कम परत मिळणार असतेच ना काही वर्षांनी.
>>त्यापेक्षा सरळ कर भरावा आणि उरलेला पैसा मनाजोगता खर्च करावा असे माझे मत आहे
म्हणजे गुंतवणूक करूच नये की काय? मग निवृत्त झाल्यावर काय करायचे हो?
३०००० रुपये कर वाचवण्यासाठी मला आधी आपले उत्पन्न खूप वाढवून ते उच्च पातळीवर न्यायला हवे.(जे कठीण आहे) समजा ते तितके वाढले तर मग मला ३०००० रुपये ही कदाचित फार मोठी रक्कम वाटणार नाही.
मी पाच वर्षांपूर्वी निवृत्त झालो आहे. त्यामुळे आता मला भविष्यकाळापेक्षा वर्तमानकाळ अधिक महत्वाचा वाटणे साहजीक आहे.
भविष्यकाळासाठी तरतूद करणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. करात बचत होवो वा न होवो, ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडतांना कर वाचवण्याचा विचार करायला हरकत नाही. पण कर वाचवणे हा मुख्य उद्देश ठेवून बळजबरीने बचत करणे हे स्वतःवर अन्याय करण्यासारखे आहे.
>>३०००० रुपये कर वाचवण्यासाठी मला आधी आपले उत्पन्न खूप वाढवून ते उच्च पातळीवर न्यायला हवे.(जे कठीण आहे) समजा ते तितके वाढले तर मग मला ३०००० रुपये ही कदाचित फार मोठी रक्कम वाटणार नाही
हा मुद्दा बरोबर आहे. मी अजून जुन्या tax slab च्या काळात आहे बहुतेक :-) काही वर्षांपूर्वी पर्यंत २.५ लाखाच्या पुढे ३०% लागत असे. ते आता एकदम १० लाख केले आहे. हे पटकन लक्षात नाही आले. तरीही, एखाद्याचे उत्पन्न ६ लाख असेल तर त्याचे २०००० वाचू शकतात.
>>मी पाच वर्षांपूर्वी निवृत्त झालो आहे. त्यामुळे आता मला भविष्यकाळापेक्षा वर्तमानकाळ अधिक महत्वाचा वाटणे साहजीक आहे.
बरोबर आहे. पण जे आत्ता तरुण आहेत त्यांनी कमीतकमी आत्ताच्या मौजमजे इतकेच महत्त्व योग्य गुंतवणुकीला दिले पाहिजे (खरे तर जास्त दिले पाहिजे).
>>कर वाचवणे हा मुख्य उद्देश ठेवून बळजबरीने बचत करणे हे स्वतःवर अन्याय करण्यासारखे आहे
होय. करबचत होते म्हणून अयोग्य ठिकाणी गुंतवणूक करणे ठीक नाही. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर, PF आणि विमा यामुळे जी रक्कम करमुक्त होते ती वगळता उरलेली मी सरळ ELSS मध्ये टाकतो. २००५ ते २००७ या काळात केलेल्या गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळाला आहे. २०१२ साली DTC लागू झाला की ELSS मध्ये गुंतवणूक करता येणार नाही. तेव्हा कदाचित कर भरेन सरळ :-)
या आर्थिक वर्षा मधे ईंफ्रास्ट्र्क्च्र बाँड (मराठी प्रतिशब्द?) मधे गुंतवणुक केल्यास कलम ८० सी खाली रु. २०,००० अधिक वजावट मीळु शकते. सध्या आय.डी. एफ. सी. बाँड बाजारात उपलब्ध आहेत.
बाकी प्राप्तीकर वाचवण्या साठी PPF किंवा NSC हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे.
या आर्थिक वर्षा मधे ईंफ्रास्ट्र्क्च्र बाँड (मराठी प्रतिशब्द?) मधे गुंतवणुक केल्यास कलम ८० सी खाली रु. २०,००० अधिक वजावट मीळु शकते. सध्या आय.डी. एफ. सी. बाँड बाजारात उपलब्ध आहेत.
८० सी नव्हे ८० सी सी एफ :)
तसेच हे बॉंड एकूण १० वर्षासाठी असतात पण विकत घेताना ५ किवा ७ वर्षानी बाय-बॅक करता येतात.
तसेक व्याज हे दरवर्षी मिळायला पाहिजे के चक्रवाढ हेही ठरवता येत
कॉलिंग रामदास! कॉलिंग रामदास!
आपण पैसे भरले नसल्याने आपली
In reply to कॉलिंग रामदास! कॉलिंग रामदास! by बिपिन कार्यकर्ते
सहमत
In reply to आपण पैसे भरले नसल्याने आपली by टारझन
>>प्राप्तिकर वाचुन वाचुन किती
In reply to सहमत by आनंद घारे
:)
In reply to >>प्राप्तिकर वाचुन वाचुन किती by विश्वनाथ मेहेंदळे
गरजु मराठि उद्योजकांना किंवा
In reply to :) by टारझन
माझ्यापुरते सांगायचे झाल्यास
In reply to >>प्राप्तिकर वाचुन वाचुन किती by विश्वनाथ मेहेंदळे
>>३०००० रुपये कर वाचवण्यासाठी
In reply to माझ्यापुरते सांगायचे झाल्यास by आनंद घारे
मला PPF सोयीचे वाटते
मंत्री किंवा फिल्मस्टार्सना
In reply to मला PPF सोयीचे वाटते by आत्मशून्य
त्यांना कर वाचवायचे नाही, कर
In reply to मंत्री किंवा फिल्मस्टार्सना by दैत्य
ईंफ्रास्ट्र्क्च्र बाँड
या आर्थिक वर्षा मधे
In reply to ईंफ्रास्ट्र्क्च्र बाँड by ज्ञानोबाचे पैजार
इथं काही मदत मिळु