लेखकगंगाधर मुटेयांनी बुधवार, 26/01/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
नेते नरमले
मोठे गरजले
छोटे बरसले
रेती वाहतच
गोटे अडकले
मते पाहताच
नेते नरमले
ललना पाहून
कपडे शरमले
चकवेही आज
रस्ता भटकले
शिपाई मजेत
कैदी सटकले
बिल्डर म्हणताच
मंत्री दचकले
काजवे रात्री
अभय चकाकले
गंगाधर मुटे
=============
प्रतिक्रिया
??????????
मस्तच गंगाधरपंत
मते पाहताच नेते नरमले ललना
मस्त!