काही काळापूर्वी बिल्डिंगमधे घडलेल्या घटनेवरून प्रश्न पडला.
-सध्या ऑलरेडी स्वयंपाक आणि / किंवा इतर कामे करत असलेल्या बाईला / नोकराला असं समजलं तर काढून टाकाल..?
-नवीन नोकर ठेवताना ही पार्श्वभूमी माहीत झाली तर नोकरीवर घेणार नाही..?
हे दोन्ही वरच्या एका प्रश्नात अंतर्भूत आहेत. मोठा प्रश्न लिहिता येत नाही म्हणून प्रतिक्रिया.
धन्यवाद - गवि.
स्वयम्पाकासाठी सुद्धा ठेवेन. कारण एच. आय. वी. स्पर्शाने पसरत नाही. दुसरे त्याचा मुख्य प्रसार होतो तो रक्त वा तत्सम सम्पर्कामुळे. स्वयम्पाक करणार्या व्यक्तिमुळे सम्पर्क होण्यची शक्यता फारच कमी.तसेच बर्याच वेळा एच. आय. वी. चे कोण्तेही लक्शण बाहेरुन दिसत नाही. अशावेळी तुम्हल कसे कळणार की या व्यक्तिल सन्सर्ग झाला आहे की नाही?एच्.आय. वी पेक्शाही सन्सर्गजनक टी.बी. सार्खे आजार आहेत जे कुपोशणामुळे या वर्गात दिसुन येतात तसेच हेपाटयटीस बी. देखिल अश्रू ,घाम यातुन पसरु शकतात. त्यन्च्य बाबत जास्त जागरूकता हवी आहे.
टी.बी. सार्खे आजार आहेत जे कुपोशणामुळे या वर्गात दिसुन येतात तसेच हेपाटयटीस बी. देखिल अश्रू ,घाम यातुन पसरु शकतात. त्यन्च्य बाबत जास्त जागरूकता हवी आहे.
सहमत.
मत देताना होय ऐवजी चुकून नाही नोंदवले गेले आहे. शक्य असल्यास बदल करण्यात यावा. स्वयम्पाक करताना हात कापणे इ. होऊ शकते आणि करणारर्या व्यक्तीच्या ते कधीकधी लक्षात येत नाही. पण पोळ्या, आमटी, भात यांसारख्या गोष्टी करताना संसर्गाची शक्यता वाटत नाही. झाडणे, बागकाम, इतर वरकाम यांना तर काहीच हरकत नाही.
'नाही' ला मत दिलेले आहे.
( हे मत केवळ आनी केवळ आरोग्याशी निगडित असलेल्या कामांसाठीच व्यक्त केलेले आहे. )
त्यानां इतर ठिकानी कामावर ठेवान्यात काहीच हरकत नाही (उलट आनंद होइल).
जसे सोसायटी वाचमन, ईलेक्ट्रीक वर्कमन. बागकाम माळी. हल्ली सोसायट्यांमध्ये भरपुर काम करनारे हवे असतात, ज्यांचा आपल्या आरोग्याशी प्रत्यक्ष संबंध येत नाही.
त्यांचे पुर्नवसान महत्वाचे पण त्यासाठी आपले आरोग्य धोक्यात घालने शहानपणाचे नाही.
हो ला मत दिले आहे.
जोपर्यंत त्यांच्या व आपल्या बॉडी फ्लुइड्सचा संबंध येत नाही तोपर्यंत काहीच हरकत नाही.
अवांतरः
डेंटिस्ट दात कोरायला जे ड्रिल वापरतात त्याची ड्रिलबिट प्रत्येक वेळी ऑटोक्लेव्ह मधून काढलेलीच वापरतात का? तसेच रूट कॅनॉल करताना जे रीमर (तारसदृश वस्तू जी दातातल्या मुळातील भोकात घालतात) वापरतात ते प्रत्येकवेळी ऑटोक्लेव्ह करून घेतात का?
तुमच्या डेन्टीस्ट बद्दलच्या दोन्हि प्रश्नन्चे ऊत्तर हो आहे.दोन्हि ओटोक्लेव केले जातात्.तसेच वापर चलु अस्तानादेखील मधल्या वेळात ते तीव्र जन्तुनशकान्मध्ये ठेवलेले असतात्.त्यामध्ये एच्.आय. वी. हेपाटायटीस बी आदी सर्व जन्तु मरतात! ह्या गोश्टी आपण आप्ल्या डेन्टीस्ट्नना विचारुन घेउ शकता. चान्गली जन्तुनाशक व्यवस्था असणे ही त्या डॉक्टर्ने अभीमानाने दाखवण्याची गोश्ट आहे.
डेंटिस्ट दात कोरायला जे ड्रिल वापरतात त्याची ड्रिलबिट प्रत्येक वेळी ऑटोक्लेव्ह मधून काढलेलीच वापरतात का? तसेच रूट कॅनॉल करताना जे रीमर (तारसदृश वस्तू जी दातातल्या मुळातील भोकात घालतात) वापरतात ते प्रत्येकवेळी ऑटोक्लेव्ह करून घेतात का?
दोन्हीही प्रश्नांची उत्तरे होय अशी आहेत...
उपचार चालू असल्यादरम्यानाही ते तीव्र जंतुनाशकात ठेवले जातात...
मागे एकदा फेसबुक व्हिडिओमधे रोडवर ८० रुपयात दात काढुन , उपचार करणारा डेण्टिष्ट पाहिला होता. तो जेवढी हायजेनिक काळजी घेतो , तेवढा अजुन कोणता डेण्टिस्ट घेत असेल असे वाटत नाही. अफलातुन होता तो. आपण तर बाबा त्याच्या कडुनंच दातांवर इलाज करुन घेणार :)
हो किंवा नाही हे आताच ठरवू शकत नाही म्हणून इतरला मत दिले.
सर्वप्रथम येथे गरज कुणाची आहे हे कळले नाही. गरज माझी आहे कारण मला कामासाठी व्यक्ती हवी की गरज एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीची आहे कारण तिला कामाची गरज आहे? का एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला नोकरी देणे ही माझी गरज आहे? तूर्तास, गरज दोघांची आहे असे मानू पण माझी गरज आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीची गरज वेगवेगळी असू शकते हे ही लक्षात घेण्याजोगे आहे.
माझी गरज -
स्वयंपाकासाठी व्यक्ती हवी.
ती व्यक्ती निरोगी हवी. (याचा एचआयव्ही पॉझिटिव्ह असण्याशी संबंध नाही)
ती व्यक्ती स्वच्छ हवी.
तिने खाडे करून चालणार नाही.
बाकी पगाराबाबत वगैरे येथे देत नाही. एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणजे रोगांनी बाधीत असे नाही परंतु सदर व्यक्ती ठीकठाक असून निराश झाली असेल किंवा सतत दु:खी राहत असेल, आपल्या वंचनेत मग्न असेल तर अशा व्यक्तीला माझ्या डोळ्यासमोर ठेवणे आणि सहन करणे माझ्या मनाला/ कुटुंबाला परवडेल असे नाही. असे काही असेल तर मी बहुधा अशा व्यक्तीला नोकरी देणार नाही.
आणखी एक, माझ्याकडे काम करणार्या कुणाचीही तुम्ही एचआयव्ही बाधीत आहात की नाही अशी चौकशी मी स्वतःहून केलेली नाही आणि करणार नाही.
माझी मुख्य गरज जर समाज प्रबोधन करणे, एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीची मदत करणे वगैरे असेल तर नक्कीच मी त्या व्यक्तीला नोकरी देण्याचा विचार करेन.
नाही ला मत दिले आहे. स्वयंपाक करतेवेळी कापले जाणे, किसताना जखमा होणे हे बरेचदा घडते. त्यामुळे थेट रक्ताशी संबंध येण्याची शक्यता असल्याने मी ह्या व्यक्तीस बहुदा स्वयंपाकास ठेवणार नाही. मात्र इतर कामाची गरज असल्यास (जसे केर काढणे, धुणी घुणे, गाड्या धुणे वगैरेसाठी हरकत नसेल).
स्वयंपाक करतेवेळी कापले जाणे, किसताना जखमा होणे हे बरेचदा घडते. त्यामुळे थेट रक्ताशी संबंध येण्याची शक्यता असल्याने मी ह्या व्यक्तीस बहुदा स्वयंपाकास ठेवणार नाही.
=)) =)) =)) =)) अपुरी माहिती , इतकेच म्हणेन :)
१. जरी समजा , ब्लिड होऊन रक्ताचा अण्णाशी संबंध आला , तर एच आय व्ही माणसाच्या शरिरा बाहेर जास्त वेळ जिवंत राहु शकत नाही.
२. जरी समजा , क्रमांक १ फोल ठरला , आणि एचआयव्ही युक्त भोजन घेतले, तर व्हायरस हा अन्ननलिकेमार्फत पोटात जातो , जिथे अतिशय स्ट्राँग अॅसिड्स असतात , तिथे हा व्हायरस जिवंत राहु शकत नाही.
३. वाचलेल्या माहितीच्या आधारे एचाअयव्ही फक्त ब्लड टु ब्लड किंवा जनायटल मेडीयम मधुन ट्रांस्मिट होउ शकतो.
तेंव्हा किमान ऋषिकेष दादांनी एचायव्ही ग्रस्त महाराज न ठेवण्याची कारणे अपुर्या माहितीच्या सदरात मोडतात.
आमचीही माहिती अपुर्ण असेल तेंव्हा जाणकार प्रकाश टाकतीलंच :)
बाकी आमचा वायफळ पैसे वाया घालवण्यावर जोर असल्याने कोणी निरोगी, स्वच्छ, किंवा उच्चभ्रु सुद्धा स्वैपाकाला / घरकामाला ठेवणार नाही , काय ? :)
= टारझन
एच.आय.व्ही.चा विषाणू मानवी शरीराबाहेर फार काळ जिवंत राहू शकत नाही. अन्न शिजवण्याने (विशेषतः भारतीय पध्दतीचे शिजवणे) तो मरतो. त्यामुळे स्वयंपाक्याचे रक्त सांडलेले सॅलड त्याने चिरल्यावर काही मिनिटांत खाणे वगैरे गोष्टी टाळल्या तर यात काहीच धोका नाही.
"होय"
हॉटेलात* स्वयंपाकी एचआयव्ही पॉझिटिव्ह असला किंवा नसला म्हणून काही फरक पडत नाही.
(घरी स्वयंपाकी ठेवायची शक्यता जवळजवळ शून्य असल्याकारणाने असा वेगळा विचार केला.)
कुठल्याही स्वयंपाक्याने स्वच्छता राखण्याबद्दल काटेकोर असावे. एचआयव्ही नव्हे, तर अन्य रोगांचा प्रसार अन्नातून होऊ शकतो. स्वयंपाकी हात धूण्याच्या बाबतीत चुकार असल्याचे कळले, तर तशा कुठल्याही हॉटेलात जेवावेसे वाटणार नाही.
(*हॉटेल = खानावळ, वस्तीचे ठिकाण नव्हे)
एका एच आय व्ही बाधित मित्राला आमच्या समोर मरताना पाहिलेले आहे. ह्यात माणुस पटकन मरत नाही .. खुप अशक्त होतो .. रोगप्रतिकारशक्तीच नसल्याने कायम रोगाची लागण होत रहाते.
त्यामुळे अशा लोकान्बद्दल मला सहानुभुती आहे. त्यांना नोकरीला नाही ठेउ शकनार
फक्त जर ती व्यक्ती To die for! असेच अन्न बनवु शकत असेल तरच! :P
नाही. स्वयंपाक घरात नाही ठेवणार असे वाटते. स्वयंपाकघरा पेक्षा बाहेरचे काम देणे पसंत करेन.
माझ्या मित्राला व त्याच्यापासुन त्याच्या पत्नीला एडस झाला आहे. त्याच्याशी बोलत बसताना,त्याच्या घरी चहा पिताना किंवा त्याच्याशी हस्तांदोलन करताना कधी विचार करत नाही.
थोडे अधिक.
स्वयम्पाकासाठी सुद्धा ठेवेन.
In reply to थोडे अधिक. by गवि
सहमत
In reply to स्वयम्पाकासाठी सुद्धा ठेवेन. by अजया
इतर
'नाही' ला मत दिलेले आहे. ( हे
सहमत
In reply to 'नाही' ला मत दिलेले आहे. ( हे by नरेशकुमार
हो ला मत दिले आहे. जोपर्यंत
तुमच्या डेन्टीस्ट बद्दलच्या
In reply to हो ला मत दिले आहे. जोपर्यंत by नितिन थत्ते
डेंटिस्ट दात कोरायला जे ड्रिल
In reply to हो ला मत दिले आहे. जोपर्यंत by नितिन थत्ते
:)
In reply to डेंटिस्ट दात कोरायला जे ड्रिल by भडकमकर मास्तर
मागे एकदा फेसबुक व्हिडिओमधे
In reply to :) by नितिन थत्ते
इतरला मत दिले
- स्वयंपाकासाठी व्यक्ती हवी.
- ती व्यक्ती निरोगी हवी. (याचा एचआयव्ही पॉझिटिव्ह असण्याशी संबंध नाही)
- ती व्यक्ती स्वच्छ हवी.
- तिने खाडे करून चालणार नाही.
बाकी पगाराबाबत वगैरे येथे देत नाही. एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणजे रोगांनी बाधीत असे नाही परंतु सदर व्यक्ती ठीकठाक असून निराश झाली असेल किंवा सतत दु:खी राहत असेल, आपल्या वंचनेत मग्न असेल तर अशा व्यक्तीला माझ्या डोळ्यासमोर ठेवणे आणि सहन करणे माझ्या मनाला/ कुटुंबाला परवडेल असे नाही. असे काही असेल तर मी बहुधा अशा व्यक्तीला नोकरी देणार नाही. आणखी एक, माझ्याकडे काम करणार्या कुणाचीही तुम्ही एचआयव्ही बाधीत आहात की नाही अशी चौकशी मी स्वतःहून केलेली नाही आणि करणार नाही. माझी मुख्य गरज जर समाज प्रबोधन करणे, एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीची मदत करणे वगैरे असेल तर नक्कीच मी त्या व्यक्तीला नोकरी देण्याचा विचार करेन.नाही
+१
In reply to नाही by ऋषिकेश
स्वयंपाक करतेवेळी कापले जाणे,
In reply to +१ by गणपा
आपण सुधा सहमत....
In reply to नाही by ऋषिकेश
संसर्ग
एच.आय.व्ही.चा विषाणू मानवी
In reply to संसर्ग by चिंतातुर जंतू
मानवी शरीराबाहेर
In reply to एच.आय.व्ही.चा विषाणू मानवी by गणपा
हो - हॉटेलात
एका एच आय व्ही बाधित मित्राला
In reply to हो - हॉटेलात by धनंजय
हो
ओ सहजकाका एक काहीतरी उत्तर
In reply to हो by सहज
नाही.
जर त्याची व माझ्या घरच्याची हरकत नसेल तर ठीक आहे