Skip to main content

हिरा हरपला - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे देहावसान!

लेखक अनिता यांनी सोमवार, 24/01/2011 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
निशब्द ..... ** आपल्या सर्वांचे लाडके मा. पं. भीमसेन जोशी यांचे निधन झाल्याची बातमी आताच याहु वर वाचली. त्यांना दिलेल्या "भारतरत्न" ह्यापुरस्काराने त्या पुरस्काराचीच शोभा वाढली. त्यांच्या बहुढंगी गायनामुळे आणि भारदस्त आवाजामुळे ते चिरकाल आपल्या स्मरणात राहतील. अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली. - हंस http://www.misalpav.com/node/16435 ** आवाहन! मित्रहो, इथे संगिताचे शौकिन आणि जाणकार खूपच आहे. तेव्हा या धाग्यावर पंडितजींना श्रद्धांजली वाहताना तुम्हाला आवडलेले त्यांचे गायन / गाणे इत्यादि आणि त्याबद्दल चार शब्द येऊ द्या. या निमित्ताने त्यांच्या गायनाद्वारे त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. - मिसळपाव संपादक मंडळ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18663
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल... जो भजे हरि को सदा वो ही परम पद पायेगा!!!! आज सुर ताल स्तब्द झाले ! शैलेश पाठ्क

पं भीमसेन जोशी यांना विनम्र श्रद्धांजली. माझे आवडते गाणे- रम्य ही स्वर्गाहूनी लंका हिच्या किर्तीचा सागर लहरी, नादविती डंका सुवर्णकमला परी ही नगरी फुलून दरवळे निळ्या सागरी त्या कमलावर चंद्र निजकरे, किरतो अभिषेका लक्ष्मी लंका दोघी भगिनी उभय उपजल्या या जलधितूनी या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का ?

शास्त्रीय संगीतातील ओ की ठो कळत नसला तरी या माणसाने गायलेले अभंग ऐकून अंगावर रोमांच उभे राहत असत. "काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल" अशीच साक्षात अवस्था होत असे. असा गानसम्राट पुन्हा होणे नाही......

ज्यांच्या पायाशी बसुन गाणं ऐकावं, ज्यांनी कसं गावं सांगावं, ज्यांनी कान पकडुन गायनाचे धडे द्यावेत आणि पाठीवर आशिर्वादाचा हात असावा असा हात गेला...घरातील वडिल माणुस गेलं. भट म्हणतो तसं "आजकाल मनाचा दगड व्हायला वेळ लागत नाही, पण तो तसा होऊ नये हे भान त्या धीरगंभीर षड्जानं सतत दिलं."...असा षडज आता कोण शिकवणार आणि आता तर तो फक्त सिडीजवरच ऐकावा लागणार....ती संगीताप्रती असलेली निस्सीम भक्ती कुठं शोधणार आणि कशी...परमेश्वराचं आभारच मानायला हवं की त्यानी अण्णांना आपल्यात आणुन आयुष्याला संगीत दिलं... आयुष्यातल्या कठीण प्रसंगात मन आक्रंदुन जात असतान अण्णांचा धीरगंभीर आवाजानं जो धीर दिला त्याची परतफेड कशी करणार? त्यांनी परत यावं आमच्यात आणि परत आमची दुनीया भारून टाकावी अशी त्यांना प्रार्थना ...त्या अज्ञात शक्तीला आवाहन की त्यांनी आमच्या अण्णांना अढळ स्थान द्यावं...

भावपूर्ण श्रध्दांजली...... त्यांचे शास्त्रीय गायन आणि मराठी- कन्नड - हिंदी अभंग सदैव लक्षात राहील.

भावपूर्ण श्रध्दांजली...... त्यांचे शास्त्रीय गायन आणि मराठी- कन्नड - हिंदी अभंग सदैव लक्षात राहील.

विनम्र श्रद्धांजली !! [त्यांचं शरीर गेलंय परंतू आवाज मात्र अमर आहे, तो असाच अवती भोवती फिरत राहणार. सकाळी सुर्योदयापासून ते संध्याकाळच्या दिवे लागणी पर्यंत कानात पडत राहणार आणि पंडितजींचा विसर पडणार नाही, पडू देणार नाही]

...