काल रात्री उशीरा घरी आल्यावर, घरी फक्त पोळ्या शिल्लक असल्याने पटकन होणारी कोणती भाजी करावी असा विचार मनात आला. मग टोमॅटोची भाजी केली. तिची पा.क्रु. देत आहे.
साहित्यः बारीक चिरलेला लाल टोमॅटो, बा. चि. कांदा, तिखट, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य
क्रुती: कढईमध्ये थोडे तेल घेउन ते चांगले तापल्यावर त्यात थोडे मोहरी-जिरे टाकले. तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, घालून त्यावर कांदा चांगला परतला. मग त्यात बा. चि. टोमॅटो घातला. चांगला परतला. मग चवीपुरते तिखट, मीठ आणि थोडी साखर घातली. भाजी चांगली परतली :-) अशी सोप्पी भाजी तयार. [या भाजीत साखर नेहमीपेक्षा थोडी जास्त घालावी. म्हणजे ती अधिक रुचकर होते.]
वाचन संख्या
4331
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो न देउ शकल्याने in advance क्षमस्व.
अरे वा !!!!
चटकदार भाजी..
मस्त माझी आवडती भाजी आहे.
पुढच्या वेळी
मी अशीच करते............साखर
मी ही काल हिच भाजी केली होती
साखर न घालता गुळ घालावा जास्त
In reply to मी ही काल हिच भाजी केली होती by पर्नल नेने मराठे
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.