मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[नेहमीप्रमाणे ;-)] सोप्पी [पा.क्रु.] टोमॅटोची भाजी

Pearl · · पाककृती
काल रात्री उशीरा घरी आल्यावर, घरी फक्त पोळ्या शिल्लक असल्याने पटकन होणारी कोणती भाजी करावी असा विचार मनात आला. मग टोमॅटोची भाजी केली. तिची पा.क्रु. देत आहे. साहित्यः बारीक चिरलेला लाल टोमॅटो, बा. चि. कांदा, तिखट, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य क्रुती: कढईमध्ये थोडे तेल घेउन ते चांगले तापल्यावर त्यात थोडे मोहरी-जिरे टाकले. तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, घालून त्यावर कांदा चांगला परतला. मग त्यात बा. चि. टोमॅटो घातला. चांगला परतला. मग चवीपुरते तिखट, मीठ आणि थोडी साखर घातली. भाजी चांगली परतली :-) अशी सोप्पी भाजी तयार. [या भाजीत साखर नेहमीपेक्षा थोडी जास्त घालावी. म्हणजे ती अधिक रुचकर होते.]

वाचने 4331 वाचनखूण प्रतिक्रिया 9

कच्ची कैरी Mon, 01/24/2011 - 14:45
अरे वा ही तर एकदम quick n easy रेसेपी आहे मी पण अशीच करते फक्त त्यात थोडा शेंगदण्याचा कूट घालते .

In reply to by पर्नल नेने मराठे

मुलूखावेगळी Tue, 01/25/2011 - 12:29
साखर न घालता गुळ घालावा जास्त खमंग लागते.
+१००
शेंगदाणा कूटही .....नो वे Sad
खाउन बघ आम्बट कमी लागते

Pearl Tue, 01/25/2011 - 14:42
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. शेंगदाणा कूट घालून पाहिले पाहिजे. पर्नल नेने मराठे, सही कोइन्सिडन्स :-) कधीतरी साखर न घालता गुळ घालून करून बघेन.