पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या गुण सूत्रामूळे आईकडून येते असे नवे संशोधन सांगते. स्त्री मध्ये दोन एक्स असतात. म्हणजे स्त्री बुद्धिमत्तेची डबल वाहक झाली. असे असूनही, म्हणजे डबल बुद्धिमत्ता असूनही ती पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी ठरली. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे वचन इथे खोटे ठरले. हे एक नवे कोडे मला पडले आहे. कुणी तज्ञ खुलासा करतील काय?
वाचने
5372
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुन्हा तुम्ही का? बारं...
पुन्हा तुम्ही का? बारं...
साधी गोष्ट आहे, स्त्रिया प्रेम करतात अन त्यासाठी काय वाटेल ती किंमत द्यायला तयार असतात...पण त्याचा परिणाम आपण पाहतोच आहे...म्हणून आता पुन्हा असल्या प्रकारातून मुक्त व्हायचा प्रयत्न चालू झाला आहे.
स्त्रिया प्रेम करतात अन
In reply to पुन्हा तुम्ही का? बारं... by शिल्पा ब
म्हणजे डोके गहाण ठेऊन प्रेम करतात असं सूचवायचं आहे का तुम्हाला?
हो...अन तोच मुर्खपणा अंगाशी
In reply to स्त्रिया प्रेम करतात अन by युयुत्सु
हो...अन तोच मुर्खपणा अंगाशी आला दुसरे काय!! बाकी पुरुष कॅलक्युलेटेड प्रेम करतात हे तुम्ही मान्य केले हे काही कमी नाही...
" अखिल अंतरजालिय म्हैला
" अखिल अंतरजालिय म्हैला मुक्ती मोर्चा " चे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक :)
-( डबल एक्स प्रेमी) टारझन
कोण्या आघाव ने गुगल वर "डबल एक्स" सर्च केले असता वेगळे रिझल्ट हाती लागले असता टारझन जबाबदार नाही.
अरे व्वा युयुत्सु काकांचा
अरे व्वा युयुत्सु काकांचा स्वत्:ची काहीच कॉमेन्ट नसणारा हा आणखी एक एकोळी धागा. ( और ये लगा शिक्षर ...)
अर्र थोडी सुधारणा या वेळी रेफरन्स ची लिंक धरून तब्बल चार ओळी झाल्यात की.
युयुत्सु काका हल्ली निसर्गाची कोडी सोडवायला लागलेत.
ज्या दिवशी पुरुषाच्या जन्मा मागील कार्यकारण भावाचे कोडे उलगडेल त्या दिवशी तुमचे कोडे उलगडेल
मधे पुरुषांच्या मेंदूचा साईझ
मधे पुरुषांच्या मेंदूचा साईझ मोठा म्हणून तो अधिक बुद्धिमान असेही एक संशोधन येऊन वावटळ करुन गेलं होतं.
आता हे जीन्सच्या अनुषंगाने आलेलं दिसतंय.
जास्त एक्स म्हणजे जास्त बुद्धी असं आहे का?
पण सध्या वादापुरतं असं आहे हे मानू.
म्हणजे जनरली सर्व स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त बुद्धिमान अतएव युक्तिवान असे मानू. आणि पुरुष जास्त शक्तिमान आणि थोडे कमी युक्तिवान मानू.
आता.. "शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ"
हे तेव्हाच खरं असतं जेव्हा शक्तीवाला बैलबुद्धीचा आणि युक्तीवाला तैलबुद्धीचा असतो.
जेव्हा दोघांच्या बुद्धीत थोडासाच (संशोधन करुन शोधण्याइतका सूक्ष्म) फरक असेल तर शक्तीच श्रेष्ठ ठरते.
हे उघड आहे की अधिकच्या शक्तीच्या जोरावर पुरुषाने स्त्रीला व्यवस्थेत आपल्या इच्छे आणि सोयीनुसार वाकवलं.
इथे मर्जिनल अधिक बुद्धिमत्तेचा उपयोग होता असं वाटत नाही. जोपर्यंत स्त्रीकडे शक्ती (नव्या संदर्भात पैसा वगैरे) येत नाही तोपर्यंत काही स्वातंत्र्य वगैरेची अपेक्षा अनैसर्गिक आहे.
शक्ती असूनही ज्या स्त्रिया पारतंत्र्य मान्य करतात त्यांच्या युक्तीक्षमतेविषयी जबरदस्त शंका येते.
कोडे सोडविन्यात
कोडे सोडविन्यात अयशस्वी....
अॅक्चुली कोडे सोडविण्याचा विचार केलाच नाही. (तसे मला विचारच करता येत नाही म्हनाना.)
अधांतर : दोन एक्स चे कोडे इतके अवघड आहे तर तीन एक्स चे कोडे कित्ती कित्ती अवघड असेल.
पीजे
आदम : देवबाप्पा, तू हव्वाला इतकी सुंदर का बनवली?
देवबाप्पा : तुझे तिच्यावर प्रेम जडावे म्हणून.
आदम : पण मग तिला इतकी मूर्ख का बनवली?
देवबाप्पा : तिचे तुझ्यावर प्रेम जडावे म्हणून.
- - -
श्रेय- (आणि शिव्या-) अव्हेर : हा पीजे मी आजच "प्रेरी होम कंपॅनियन" या रेडियो कार्यक्रमात ऐकला.
(विषय दिलेला नाही)
In reply to पीजे by धनंजय
:-)
(युयुत्सुंच्या धाग्यावर प्रतिसाद दिल्याशिवाय रहावत नाही, पण लिहावं काय ते ही कळत नाही!)
*१००
In reply to (विषय दिलेला नाही) by ३_१४ विक्षिप्त अदिती
.
अरेव्वा.......... कुठेतरी
अरेव्वा.......... कुठेतरी तुम्ही निशःब्द झालात हे वाचुन डोळे जलजीवा झाले
जेव्हा दोघांच्या बुद्धीत
स्त्रीयांचे मेंदूपण पुरुषांच्या मेंदू पेक्षा जास्त जोड्ण्यानी जोडले गेलेले असतात, असे वाचले आहे.
अरेच्चा!
या विधानात पुरुषाकडे बुद्धिमत्ता असते हे गृहित धरले आहे. :( हे योग्य नाही. पुरुष या प्राण्याकडे बुद्धिमत्ता नसल्याने त्याच्या दुप्पट नसलेली बुद्धिमत्ता स्त्रियांकडे असते असा कुणी प्रतिवाद केला तर?
पुरुष या प्राण्याकडे
In reply to अरेच्चा! by प्रियाली
कृपया या विधानाला शास्त्रीय आधार द्यावा
मी प्रश्न विचारला आहे
In reply to पुरुष या प्राण्याकडे by युयुत्सु
मी असा कुणी प्रतिवाद केला तर असा प्रश्न विचारला आहे, विधान केलेले नाही.
बुद्धिमत्ता आहे असे विधान आपण केलेले असल्याने आपणच शास्त्रीय आधार द्यावेत. ;)
फक्त AXE factor
In reply to अरेच्चा! by प्रियाली
पुरषांकडे फक्त AXE factor असतो की काय अन बाकी बुध्दिमत्तेचे X कमी असते ;-) ??
अग प्रियालीताई पुरुष या प्राण्याकडे बुद्धिमत्ता कमी असते, नसते असे नाही
पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या
पण स्त्रीची बुद्धीमत्ता देखील 'एक्स' वरच अवलंबुन असते कशावरुन ?
पण स्त्रीची बुद्धीमत्ता देखील 'एक्स' वरच अवलंबुन असते कशावरुन ?
In reply to पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या by परिकथेतील राजकुमार
मी दिलेला संदर्भ बारकाईने वाचा म्हणजे कळेल
ते मराठीत कुठे वाचायला मिळेल
In reply to पण स्त्रीची बुद्धीमत्ता देखील 'एक्स' वरच अवलंबुन असते कशावरुन ? by युयुत्सु
ते मराठीत कुठे वाचायला मिळेल ?
आमचे इंग्रजी ज्ञान म्हणजे भयाण ह्या प्रकारात मोडते.
अति तेथे माती
>>असे असूनही, म्हणजे डबल बुद्धिमत्ता असूनही ती पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी ठरली.
अति तेथे माती, दुसरं काही नाही.
&*(*&^
!@%$^*(())_+_+
पण आता नाही
स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त बुद्धीवान्,दयाळु,मायाळु व सहनशील आहे म्हणुनच मुल जन्माला घालण्यासारखे सर्वात कठीण काम निसर्गाने (देवाने )स्त्रीवर सोपविले आहे .आणी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही उक्ती चुक ठरललेली नाही म्हणुनच तर स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाबरोबर किंवा त्यांच्याहुन पुढे आहे ,स्त्री पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी पड्ली होती पण आता नाही .
स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त
In reply to पण आता नाही by कच्ची कैरी
सहमत आहे. स्त्रीयांची सहनशिलता पुरुषांपेक्षा कैक पटीने जास्त आहे.
दोन पावलं पुढं जाउन मी तर म्हणेन , स्त्रीयांनी पुरुषांना कधीच ओव्हरटेक केलंय , आणि आता तर स्त्री-पुरुषाची काँपिटिशनंच नाही.
अतिशय महत्वाचे आणि सत्य विधान. पण अंतरजालिय महिला मुक्ती मोर्चा ला अजुन ह्या सत्याची उकल झालेली नाही. ;)
तोल गेला असता
बहुदा एका x ने स्त्रीचा तोल गेला असता म्हणुन २ x दिले असावेत. उजवा x आणि डावा x.
असे असूनही, म्हणजे डबल
असे असूनही, म्हणजे डबल बुद्धिमत्ता असूनही ती पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी ठरली.
कलियुग बाबा!!! दुसरं काय!!! :-P
हस्तिदंती मनोर्यातील संशोधन.
लहानपणी आई तुडवायची , आता बायको बुकलते.
युक्ती तर सोडाच पण शक्तीच्या बाबतीत ही स्त्रीच श्रेष्ठ आहे.
मुलगी नाही का तुम्हाला?
In reply to हस्तिदंती मनोर्यातील संशोधन. by अडगळ
;)
नसल्यास लवकरच लेक होवो असा आशीर्वाद!
काय ग!
In reply to मुलगी नाही का तुम्हाला? by प्रियाली
त्यांच्या म्हातारपणाची सोय काय याचा आताच विचार करून ठेवतेस काय?
बडवणे
In reply to काय ग! by पैसा
अगदी असेच नाही पण जवळपास... तुडवणे आणि बुकलणे झाले, बडवणे राहून गेले असे वाटले एवढेच. ;)
मला एक कळत नाही, पुरुष जर
मला एक कळत नाही, पुरुष जर बुद्धिमान असता तर त्याने स्वतःप्रधान असलेल्या संस्कृतीत लग्न नावाची संस्था आणलीच कशाला? नक्कीच कुठल्यातरी हुशार बाईचे कारस्थान असेल. ;-)
अरेच्चा!
हा धागा दोन ठिकाणी का दिसतोय? (Node 16431, 16432)
डब्बल
In reply to अरेच्चा! by पैसा
डब्बल धागे ;) मला वाटलं की बायकांकडे एक्स-एक्स अशी डब्बल गुणसुत्रे असतात त्यामुळे त्या असली डब्बल कामे करत असाव्या.
अरेच्चा! इथे तर युयुत्सु डब्बल धाग्यांचे चालक झाले.
डब्बल कलियुग बाई!!
In reply to डब्बल by प्रियाली
डब्बल कलियुग बाई!! ;)
खरे तर तज्ञांकडूनच खूलासा अपेक्षीत आहे पण असे वाटते की
पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या गुण सूत्रामूळे आईकडून येते असे नवे संशोधन सांगते. स्त्री मध्ये दोन एक्स असतात. म्हणजे स्त्री बुद्धिमत्तेची डबल वाहक झाली.
"अती तेथे माती", कीव्हां "विष ही विषको मारता है"... या न्यायाने डबल वाहक असून सूध्दा परीणामकारक Result येत नसावेत.
कंटाळा
या धाग्याचा विषयच काय , या धाग्याकर्त्याचे नाव पाहूनच हा धागा उघडावा वाटेना. असे डझनावारी धागे न उघडताच गेले. हा धागा उघडल्यावर , त्यातला प्रस्ताव वाचल्यावर हा कशाकरता उघडला याचा पश्चात्ताप होतो आहे.
धागाकर्ते , आम्हाला हे वाचताना इतका कंटाळा येतो. तुम्हाला इतक्या वेळा तेच ते लिहायचा कंटाळा कसा हो येत नाही ?
+१
In reply to कंटाळा by मुक्तसुनीत
उत्तमकुमारचे (तेच ते) गाणे रिपीड मोड मधे चालू आहे असे वाटते.