Skip to main content

!!!!!!! पहिला नंबर असा हि , तसा ही !!!!!!!

!!!!!!! पहिला नंबर असा हि , तसा ही !!!!!!!

Published on 20/01/2011 - 01:31 प्रकाशित मुखपृष्ठ
काही दिवसांपूर्वीच बातमी वाचली कि कॅट च्या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल ठरले , वाचून खूप आनंद झाला . पिढ्यानपिढ्या नोकरी हेच सर्वस्व मानणारा मराठी समाज आता कात टाकतोय असं वाटू लागलं . पण या बातमीचा आनंद व्यक्त करतो तेवढ्यात आणखी एक बातमी आली कि सलग दहाव्या वर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्यात महाराष्ट्र अव्वल ........ ! नकळत जाणवले कि उंच भरारी मारताना आपण आपली जमीन विसरतोय ! क्षणात मन विषण्ण झालं . ज्या राज्याचा कृषिमंत्री केंद्रात आहे त्याच राज्यावर ही वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय . काही वर्षापूर्वी , बहुतेक लोकसभा निवडणुकी आधी सध्याच्याच सरकारने ७१००० कोटी रुपयांची मदत शेतकर्यासाठी जाहीर केली होती , कुठे गेले ते सगळे पैसे खरच पोचले का ते या वर्गापर्यंत का त्याला पाय फुटले खरच काही समजत नाही .यात कोण दोषी आणि कोण निर्दोष हे नंतर ठरवता येईल पण झालेले नुकसान हे खूप भयंकर आहे . एकीकडे निव्वळ २००० रुपये कर्जासाठी ही आत्महत्या केल्याचे ऐकायला मिळते तेव्हा तिथल्या भीषण दारिद्र्याची जाणीव होते , उगाचच अस्वस्थ वाटते पण केवळ सहानुभूती पेक्षा काही आपण त्यांच्यासाठी करू शकत नाही याची ही जाणीव होते, पण त्याच वेळी हिवरेबाजार सारखे उदाहरण ऐकायला मिळते तेव्हा खूप समाधान वाटते . माझे बाबा सांगायचे जुन्या काळी नोकरी करणारा मास्तर हा कनिष्ठ तर शेती करणारा शेतकरी हा उच्च समजला जाई आज परिस्थिती नेमकी उलटी आहे . पुष्कळ शेती असणारे तरुण देखील आता नोकरी किंवा आणखी रोजगाराकडे वळताना दिसतात ,जर हे असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल कि शेतकी दृष्ट्या सधन अशा आपल्या राज्याला किंबहुना देशालाही शेती उत्पादनांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागेल . शेती या व्यवसायावर आज ही जवळ जवळ निम्मा देश जगतोय , या सगळ्यांना त्यांच्या श्रमाची योग्य किंमत मिळेल का ?

याद्या 3172
प्रतिक्रिया 15

In reply to by पिंगू

खर आहे , पण त्या बरोबरच काही दुसरे मुद्दे देखील लक्षात घ्यायला हवेत , नियोजनबध्द शेती किंवा उपपिके घेण्याच्या पद्धती वगैरे . त्यासाठीच हिवरेबाजार model चा उल्लेख केला होता .

In reply to by jaydip.kulkarni

>>नियोजनबध्द शेती... अरेरे, असल्या समाजवादी थेरांची अजून भलामण चाललेली पाहून अतीव दु:ख झाले. खरे तर मुक्त अर्थव्यवस्थेत जो अयशस्वी होतो तो त्याच्या नालायकपणामुळेच होतो हे ढळढळीत सत्य असताना या नालायकांसाठी अश्रू कशाला ढाळायचे? ते कर्जबाजारी झाले त्यांच्या कर्माने..... त्यांना का म्हणून समाजाने पोसायचे? मुक्त व्यवस्थेत हिवरेबाजार वगैरेची माहिती त्या शेतकर्‍यांना इंटरनेटवरून वगैरे उपलब्धच असते की. नाही त्यांना नव्या युगाचा फायदा करून घेता येत त्याला काय करायचे?

In reply to by नितिन थत्ते

धन्यवाद, मला वाटत आता शेतकर्‍यांनी फक्त स्वतापुरते पिकवावे, जगाचा विचार कशाला करायचा. करु देत Import नाहीतरी मुक्त अर्थव्यवस्था आहे. अहो नितीन साहेब भिक कोनताच शेतकरी मागत नाहि आणि नको पण. शेतकरी (IT wala)

काही दिवसांपूर्वीच बातमी वाचली कि कॅट च्या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल ठरले , वाचून खूप आनंद झाला . पिढ्यानपिढ्या नोकरी हेच सर्वस्व मानणारा मराठी समाज आता कात टाकतोय असं वाटू लागलं ...
... अहो, CAT च्यापरीक्षेनंतर MBA करुन मोठ्या पगारची नोकरीच मिळते....... शेती नाही करत.....

In reply to by असहकार

MBA मध्ये फायनान्स , मार्केटिंग प्रमाणे एखादा शेती विषयक अभ्यासक्रम ठेवायला हवा व या विद्यार्थ्यांना या विषयात एक LIVE प्रोजेक्ट तयार करणे बंधनकारक असायला हवे .

ज्या राज्याचा कृषिमंत्री केंद्रात आहे त्याच राज्यावर ही वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय . काही वर्षापूर्वी , बहुतेक लोकसभा निवडणुकी आधी सध्याच्याच सरकारने ७१००० कोटी रुपयांची मदत शेतकर्यासाठी जाहीर केली होती , कुठे गेले ते सगळे पैसे खरच पोचले का ते या वर्गापर्यंत का त्याला पाय फुटले खरच काही समजत नाही .यात कोण दोषी आणि कोण निर्दोष हे नंतर ठरवता येईल पण झालेले नुकसान हे खूप भयंकर आहे . शब्दा शब्दाशी सहमत... हिंदुस्थानातील राजकारण्यांनी देश विकायला काढला आहे !!! ब्रिटीशांनी बांधलेले पुल अजुन टिकुन असुन,आपल्या लोकांनी बांधलेले पुल पत्त्याच्या बंगल्यासारखे कसे कोसळतात ते कॉमनवेल्थ गेम्सच्या वेळी स्पस्ष्टपणे दिसुन आले. कायद्याच राज्य या हिंदुस्थानात आहे का ? असा प्रश्न अनेक वेळा मनात येतो... :( जिथे तिथे बघावं तर खाबुगिरी करण्यात लोक/ यंत्रणा आणि भ्रष्ट नेता मंडळी गुंतली आहेत.लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त पैसा लोकांना जमवावा वाटतोय !!! आणि त्यासाठी ते कुठल्याही थराला जाउ शकतात हे सुद्धा स्पष्ट दिसुन येत आहे. जय जवान जय किसान या महत्वाच्या घोषणेला सर्वच विसरुन गेले... जे लोक देशाचा पाया आणि ताकद आहेत तेच लोक आता देशोधडीला लागत आहेत !!! किसान मेला आणि जवान ? त्यांच काय ? तुमच्याकडे जर सत्ता असेल तर कुठलेही अनधिकॄत बांधकाम करुन ते नियमीत करता येतं हे आपल्या राजकारण्यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. शेवटी काय ? तर... पैसा देव झाला आहे आपल्या देशात आणि माणुसकी शून्य !!! :(

In reply to by मदनबाण

दुर्दैवाने हे खरे आहे. हीच मंडळी वैयक्तिक स्वार्थ न पाहता आपल्या देशासाठी इतका स्वार्थीपणा करती तर आपण आज कुठच्या कुठे असतो असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. पण त्याच वेळी हे ही लक्षात ठेवले पाहिजे की भ्रष्टाचार हा जगात सौदी अरेबिया, अमेरिका, युरोपीय देश ते भारत सर्वत्र आहे. काही लोक तो बाहेर न येऊ देता दाबतात त्यांना स्वच्छ 'मानले' जाते. ही फिरवा-फिरवी करण्यासाठी निरनिराळ्या यंत्रणा आणि संस्था उभारल्या जातात. पोकळ शास्त्रज्ञांच्या आणि अभ्यासकांच्या पोकळ फौजा उभ्या केल्या जातात. मग बुद्धीभेदातून परत भ्रष्टाचारच साधला जातो. त्यासाठी सरकारी नियम वाकवले जातात. हे जगभर घडते आहे. मग शेती खत उत्पादनातली मॉसेंटो असो वा अजून कोणती खनिज तेलकंपनी, यांनी समाज शिक्षणासाठी दान केलेला पैसा नक्की कुठे गेला हे खोदून पाहिले असता हेच दिसून येते! हरितक्रांतीच्या वेळी असल्याच रासायनिक खत उत्पादक शेती कंपन्यांनी, समाज जागृती आणि शिक्षण यासाठी अचानक मोठा दानधर्म केला होता हे विसरून चालणार नाही. याला उपाय एकच - व्यापारी चातुर्य शेतकर्‍यात रुजले पाहिजे. शेतकरी हा व्यापारी झाला पाहिजे आणि त्यालाही सभ्यता सोडून दंडेली आणि हडेलहप्पी करता आली तर चित्र बदलेल.

>>याला उपाय एकच - व्यापारी चातुर्य शेतकर्‍यात रुजले पाहिजे. शेतकरी हा व्यापारी झाला पाहिजे आणि त्यालाही सभ्यता सोडून दंडेली आणि हडेलहप्पी करता आली तर चित्र बदलेल. सहमत.. आजपर्यंत किती दलाल/ धान्य-शेतीमाल विक्रेत्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आलीय? माझे काही मुद्दे :- १) स्टोरेज सुविधा चांगल्या करायला हव्यात. पुष्कळसा शेतीमाल केवळ ह्याच्या अभावापायी वाया जातो. कित्येकदा शेतकर्‍यांना ह्यामुळेच "डिस्ट्रेस सेल" करावा लागतो. ह्यासाठी शेतकर्‍यांनीच एकत्र येवून काम करायला हवे, आणि ह्यात "सहकाराचे राजकारण" होवू नये ह्याची काळजी घ्यावी. २) पिक-पद्धतीतही बदल करायला हवा. विदर्भात, जिथे कापूस हे मुख्य पिक आहे, तिथे अगदी छोटे छोटे शेतकरीही कपाशीचे पिक घेतांना दिसतात. बेसिकली, धान्य-पिकांच्या बाबतीत मग हा शेतकरी परावलंबी होतो. तसेच कपाशीचे पिक पुर्णतः कापून जमीन मोकळी करायला जानेवारी उजाडतो, म्हणजे दुबार-शेती करणे कठीण. (अर्थात दुबार-पेरणी साठी सिंचन सुविधा पण उपलब्ध करायला हवी. ३) कर्जमाफी जरी मिळाली तरी ती "नी-जर्क" रिअ‍ॅक्शन" आहे. पुढच्या वेळी काय? ह्या करीता बँक कर्ज सुविधा सुलभ आणि लवचिक हवी. (नाकी नऊ आणणारी नको.) ४)शेतकर्‍यांनीही अर्थ-नियोजन शिकायला हवे. आला पैसा की उडव (हे होतं) असं नको. ह्याकरीता त्यांना सोप्या भाषेत प्रशिक्षण दिल्या गेलं पाहीजे. ५) कृषी विज्ञानातील संशोधने जास्तीत जास्त लौकर शेतजमिनीत इंप्लिमेंट होवू शकतील ह्यावर जोर देण्यात यावा.

शेती नाईलाजाने केली जातेय. आजोबांची काही शेतजमीन दोन पिढ्या कोर्टकचेर्‍यांनंतर माझ्या हाती आली. तेव्हा मनापासून, सिरियसली त्यात काही पिकवावे आणि शेती आणि अलाईड उद्योग करावा अशा बेताने जुळणी सुरु केली. पण सुंदर हिरव्या स्वप्नांतून उतरून ग्राउंड लेव्हलला येऊन त्याचे प्राथमिक अर्थशास्त्र समजून घ्यायला लागलो तेव्हा धक्क्यावर धक्के बसत गेले. आहे ती नोकरी शत नव्हे तर हजार पटींनी सुंदर वाटायला लागली. अशा स्थितीत फक्त इतर काही शक्य नाही म्हणून शेती रेटायची असे करणारेच शेती करत राहताहेत / राहतील. त्यातून पुढच्या पिढीला शेतीतून "बाहेर" कसे काढता येईल हेच प्रयत्न शेतकरी करणार आणि एक दिवस सर्व्हिस सेक्टरमधे एक कोटी पर अ‍ॅनमचे पॅकेज घेणार्‍यालाही लाख रुपये किलोला देण्याची तयारी ठेवूनसुद्धा विकत घ्यायला गहू नसेलच. अतिशयोक्ती नाही. उद्या नाही पण "परवा आहे उद्याचनंतर" हेही खरंच.. उपाय आहेत्..पण ते शहरी जीवनाला आत्तापेक्षा भयानक झटका बसल्याशिवाय केले जाणार नाहीत आणि तेव्हा उशीर झाला असेल.

मित्रांनो सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !! महाराष्ट्राच्या बाहेर राहून हि तिथे होणाऱ्या सर्व घटना मग ते आदर्श असो वा लावासा किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न , मन अस्वस्थ करतात , social networking च्या माध्यमातून असे काही करता येईल का , ज्यामुळे ह्या सर्व बाबतीत आपला आवाज आणखी लोकांपर्यंत पोचवता येईल ? विशेषतः शासन व्यवस्थेपर्यंत !!