!!!!!!! पहिला नंबर असा हि , तसा ही !!!!!!!
काही दिवसांपूर्वीच बातमी वाचली कि कॅट च्या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल ठरले , वाचून खूप आनंद झाला . पिढ्यानपिढ्या नोकरी हेच सर्वस्व मानणारा मराठी समाज आता कात टाकतोय असं वाटू लागलं . पण या बातमीचा आनंद व्यक्त करतो तेवढ्यात आणखी एक बातमी आली कि सलग दहाव्या वर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्यात महाराष्ट्र अव्वल ........ !
नकळत जाणवले कि उंच भरारी मारताना आपण आपली जमीन विसरतोय !
क्षणात मन विषण्ण झालं . ज्या राज्याचा कृषिमंत्री केंद्रात आहे त्याच राज्यावर ही वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय . काही वर्षापूर्वी , बहुतेक लोकसभा निवडणुकी आधी सध्याच्याच सरकारने ७१००० कोटी रुपयांची मदत शेतकर्यासाठी जाहीर केली होती , कुठे गेले ते सगळे पैसे खरच पोचले का ते या वर्गापर्यंत का त्याला पाय फुटले खरच काही समजत नाही .यात कोण दोषी आणि कोण निर्दोष हे नंतर ठरवता येईल पण झालेले नुकसान हे खूप भयंकर आहे .
एकीकडे निव्वळ २००० रुपये कर्जासाठी ही आत्महत्या केल्याचे ऐकायला मिळते तेव्हा तिथल्या भीषण दारिद्र्याची जाणीव होते , उगाचच अस्वस्थ वाटते पण केवळ सहानुभूती पेक्षा काही आपण त्यांच्यासाठी करू शकत नाही याची ही जाणीव होते, पण त्याच वेळी हिवरेबाजार सारखे उदाहरण ऐकायला मिळते तेव्हा खूप समाधान वाटते .
माझे बाबा सांगायचे जुन्या काळी नोकरी करणारा मास्तर हा कनिष्ठ तर शेती करणारा शेतकरी हा उच्च समजला जाई आज परिस्थिती नेमकी उलटी आहे . पुष्कळ शेती असणारे तरुण देखील आता नोकरी किंवा आणखी रोजगाराकडे वळताना दिसतात ,जर हे असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल कि शेतकी दृष्ट्या सधन अशा आपल्या राज्याला किंबहुना देशालाही शेती उत्पादनांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागेल .
शेती या व्यवसायावर आज ही जवळ जवळ निम्मा देश जगतोय , या सगळ्यांना त्यांच्या श्रमाची योग्य किंमत मिळेल का ?
याद्या
3172
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
ही शोकांतिकेची वेळ नालायक
खर आहे , पण त्या बरोबरच काही
In reply to ही शोकांतिकेची वेळ नालायक by पिंगू
कसले नियोजन ?
In reply to खर आहे , पण त्या बरोबरच काही by jaydip.kulkarni
तशाही भारतात निरपराधांच्या
In reply to कसले नियोजन ? by नितिन थत्ते
????????????????
In reply to कसले नियोजन ? by नितिन थत्ते
शोकांतिका आहे खरी
शेती
MBA मध्ये फायनान्स ,
In reply to शेती by असहकार
ज्या राज्याचा कृषिमंत्री
:(
In reply to ज्या राज्याचा कृषिमंत्री by मदनबाण
बरोबर..
शेती नाईलाजाने केली
सहमत
In reply to शेती नाईलाजाने केली by गवि
प्रतिक्रियांसाठी धन्यवाद
.