Skip to main content

शेवयांचा उपमा

शेवयांचा उपमा

Published on गुरुवार, 20/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्य- २ वाट्या शेवया, १ लहान कांदा, २ हिरव्या मिरच्या,मीठ चवीनुसार, १लहान चमचा साखर २ लवंगा, एक दालचिनीचा तुकडा,काजूचे तुकडे,२ वाट्यांना थोडे कमी गरम पाणी ,लिंबू,नारळ, कोथिंबिर, फोडणीसाठी- तेल,कढिलिंब, जिरं, मोहरी, उडदाची डाळ कृती- शेवया कुस्करा आणि तांबूस भाजून घ्या व एका ताटलीत काढून ठेवा. तेल गरम करुन जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ, लवंगा, दालचिनी अशी खमंग फोडणी करा. नंतर त्यात कांदा तांबूस होईपर्यंत परता.काजूचे तुकडे घालून परता. आता त्यात गरम पाणी घाला.मीठ व साखर घाला व उकळू द्या. चांगली उकळी आली की त्यात भाजलेल्या शेवया घाला. थोडे ओले खोबरे घाला.चांगली वाफ येऊ द्या. खोबरे आणि कोथिंबिरीने सजवा.(फोटोतल्या डिशमध्ये खोबरे आणि कोथिंबिर घातलेले नाहीये..) खाताना लिंबू पिळून खा.

याद्या 9771
प्रतिक्रिया 19

जबर्‍या ! खुप वर्षांपुर्वी खाल्ला होता. आता एकदम आठवण ताजी झाली :) ह्या रविवारी गणेश शेवयांचा उपमा ;)

सुंदर फोटो खुपच छान पा. क्रु.

फोटो छानच आला आहे. हा माझा आवडीचा पदार्थ आहे. आजकाल रव्याच्या उपम्यापेक्षा हाच उपमा आवडतो. प्राजु प्रमाणे मी पण यात मटार, गाजर, मक्याचे दाणॅ शिवाय फ्लॉवरचे तुरेही घालते.

मस्त... :) मला वाटतं बाजारात दोन प्रकारच्या शेवयांची पाकिटे मिळतात, एक न-भाजलेल्या शेवयांचे आणि दुसरे भाजलेले... गाय छाप /हात छाप वगरै असं काहीस नाव अंसतं पाकिटांचे.

प्राजु, शाल्मली.. मला ह्या उपम्यात मटार, मके, फ्लॉवर इ. काही आवडत नाही, नेहमीच्या उपम्यात ते घालते पण ह्यात नाही..:) बाणा, भाजलेल्या एकदम बारीक शेवया खिरीला जास्त वापरल्या जातात, ह्यासाठी न भाजलेल्या, जाड शेवया वापरते. सर्व खवय्यांनो, धन्यवाद. स्वाती

ऑफिसमध्ये फोटो दिसत नाहीत त्याचे फायदे स्वातीताईच्या खादाडीच्या धाग्यावर आले की प्रकर्षाने जाणवतात. मी फोटो पाहिला नाही, माझी जळजळ होणार नाही! :)