साहित्य- २ वाट्या शेवया, १ लहान कांदा, २ हिरव्या मिरच्या,मीठ चवीनुसार, १लहान चमचा साखर
२ लवंगा, एक दालचिनीचा तुकडा,काजूचे तुकडे,२ वाट्यांना थोडे कमी गरम पाणी ,लिंबू,नारळ, कोथिंबिर,
फोडणीसाठी- तेल,कढिलिंब, जिरं, मोहरी, उडदाची डाळ
कृती- शेवया कुस्करा आणि तांबूस भाजून घ्या व एका ताटलीत काढून ठेवा. तेल गरम करुन जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ, लवंगा, दालचिनी अशी खमंग फोडणी करा. नंतर त्यात कांदा तांबूस होईपर्यंत परता.काजूचे तुकडे घालून परता. आता त्यात गरम पाणी घाला.मीठ व साखर घाला व उकळू द्या. चांगली उकळी आली की त्यात भाजलेल्या शेवया घाला. थोडे ओले खोबरे घाला.चांगली वाफ येऊ द्या.
खोबरे आणि कोथिंबिरीने सजवा.(फोटोतल्या डिशमध्ये खोबरे आणि कोथिंबिर घातलेले नाहीये..)
खाताना लिंबू पिळून खा.


वाचने
9776
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोंड लाळावले !!!
एम टी आर चा भिकार असतो
अगदी टारझनसारखेच म्हणते. फोटू
शेवयान्चे सगळे प्रकार
१दम छान आहे ही रेसिपी मी
सुंदर फोटो
मस्त.
खुपच छान, अजुन येउद्या
जबर्या ! खुप वर्षांपुर्वी
हा आठवडा शेवयांच्या पाककृतीचा
विकांताला....
खुपच छान
मस्त पाकृ! फोटोही मस्त आलाय!
लहानपणी "घरगूती मॅगी" म्हणून हा प्रकार आइ बनवायची
मस्तच. मला फार्फार आवडतो. मी
मस्त!
मस्त... मला वाटतं बाजारात
धन्यवाद,
ऑफिसमध्ये फोटो दिसत नाहीत