✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तारुण्य ..!!

प — प्रकाश१११, गुरुवार, 01/20/2011 - 13:17
तारुण्य किती मस्त असते एक छान कविता असते तारुण्य म्हणजे सळसळनारा कल्लोळ असतो बेदम असा उत्साह असतो मस्तीचा एक डंख असतो डंख मारण्याची डंख घेण्याची हीमत म्हणजे तारुण्याचा कैफ असतो तारुण्याला नसतो भविष्यकाळ नसतो भूतकाळ त्याला असतो फक्त वर्तमानकाळ भूतकाळाने तो नाही मन रिझवत तो जगत असतो आजची स्वप्ने आणि ठाऊक असतात उद्याची बहाणे तारुण्य पाखराच्या मस्तिसारखे असते फुलपाखरासारखे झुलत असते काय करू नि काय नको त्यांचे मस्त एक गाणे असते तारुण्यात असते आभाळावर मुठ उगारण्याची हिम्मत कोठल्यातरी ध्यासाने त्यांचे मन जाते झिंगत काविता सुद्धा जमून जातात अस्सल मस्त टिकून राहतात जन्मभर सुद्धा आयुष्यभर तिची मस्त संगत तारुण्य म्हणजे बंदुकीची गोळी तारुण्य म्हणजे सिव्हाची आरोळी तारुण्य म्हणजे भर दुपारचा सूर्य रात्रीचा फुललेला पिवळा पिवळा चंद्र तारुण्य म्हणजे छान जमून गेलेली फक्कड लावणी एखादा छानसा फड एखादी गाण्याची मैफल जी आणते चव बेचव आयुष्याला ....!!

प्रतिक्रिया द्या
2654 वाचन

💬 प्रतिसाद (5)

अप्रतिम

गणेशा
गुरुवार, 01/20/2011 - 13:44 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

प्रकाश१११काकांच्या

टारझन
गुरुवार, 01/20/2011 - 13:49 नवीन
प्रकाश१११काकांच्या भुतकाळातली कविता दिसत्ये :) आमच्या वेळी जरा वेगळंच आहे
  • Log in or register to post comments

छान कविता. आज सकाळी सकाळी

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/20/2011 - 14:03 नवीन
छान कविता. आज सकाळी सकाळी रोजच्यासारखी तुमची एक नविन कविता आली असेल ह्या अपेक्षेन खुप अधिरतेने मिपावर लॉग इन केले होते पण निराशाच झाली.
  • Log in or register to post comments

वा मस्त लय भारि!

पियुशा
गुरुवार, 01/20/2011 - 16:46 नवीन
वा मस्त लय भारि!
  • Log in or register to post comments

मस्तय....

डावखुरा
गुरुवार, 01/20/2011 - 17:44 नवीन
मस्तय....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा