Skip to main content

मॅट पेंटिंग

लेखक स्पा यांनी बुधवार, 19/01/2011 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाला "animation " शिकताना 'matt painting ' नावच प्रकार शिकवलेला होता. baryach इंग्लिश si - fi चित्रपटात असे प्रकार... चलत चित्रणा द्वारे जिवंत केले जातात मागे येऊन गेलेला "३००" हा चित्रपट संपूर्ण पण matt painting चा वापर करून बनवलेला होता मी पण एक प्रयत्न केलेला होता एक झलक पेश करतोय अनेक इमेजेस एकत्र केल्या जातात.. जर animation असले तर अनेक फुटेजेस मग फोतोशोप किंवा आफ्टर इफेक्ट्स चा वापर करून हवं ते output तयार केलं जातं शेवटच्या फोटोत वर घेतलेल्या प्रत्येक इमेज चा वापर झालेला आहे अश्या इमेज background ला वापरल्या जातात. बाकी माहिती दिली असती , पण ती खूप technical आहे
लेखनविषय:

वाचने 10306
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

झकास! सिनेमात दाखवात ते हे असं करतात हे माहीत नव्हतं. आणखी एक दोन output दाखवली असती तर मजा आली असती. पण हे animation प्रकरण बाकी एकदम interesting दिसतंय.

स्पा - मला ह्यातील फारसे कळत नाही . पण जे आहे ते भन्नाट आहे एवढे मात्र कळते .तो ताजमहाल ,[एक एक बघून लिहितोय बाबा ..] तो मस्त धबधबा, अमेरिकेतील स्वातंत्र्य देवीचा पुतळा मोठ मोठे टोवर.समोर भन्नाट समुद्र [?] शेवटच्या फोटोत केलेला सगळ्या इमेजचा वापर. भन्नाट रे बाबा . माझ्यातर्फे मनापासून शुभेच्छा, !!

डोक्यात काही पक्की आयडिया नसते.. पण साधारण सेट आम्ही डीसाइन करून घेतो... मग हळू हळू लेयर वर काम करायला सुरुवात करतो

धाग्यातले शेवटले चित्र पाहून सिनेमात दाखवतात तसा पाऊस, पूर आल्यासारखा वाटतोय. अगदी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळाही वाहून चाललय असं वाटतय.

पहीला फोटो तर अप्रतीम स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा वाहून चाललाय असंच वाटतय. दूसरा फोटोही झकास, पण त्यात होगवर्टस चा परस्पेक्टीव आणी येणार्‍या बोटीचे प्रपोर्शन थोडे गंडलय अस वाटतय. बाकी जाणकार अधीक प्रकाश टाकतीलच.

अशी विविध चित्रे एकत्र करून त्यातून एखादे सुसंगत चित्र बनवले तर ते मॅट पेंटिंग आणि काहीतरी असंबद्ध बनवले तर ते कोलाज! दिसतय बाकी छान!

In reply to by सुनील

अशी विविध चित्रे एकत्र करून त्यातून एखादे सुसंगत चित्र बनवले तर ते मॅट पेंटिंग
वरचे कुठले चित्र 'सुसंगत' वाटले तुम्हाला?

मस्त रे स्पावड्या. मागे भटोबांनी जिंप वापरून असाच प्रयोग केला होता, त्याची आठवण झाली.

In reply to by नंदन

मला ही भटोबांच्या चित्राची आठवण झाली. स्पाशेठ जसे आपले गणपाजी स्टेप बाय स्टेप पाकृ देतात तशी एक कलाकुसर दाखवाच आता. हौशी फोटोशॉपवाल्यांना मॅट पेंटींग शिकवा.

In reply to by सहज

धन्यवाद सहज , हे माझे जुने प्रोजेक्ट आहेत. जेव्हापासून 3D मध्ये घुसलो,फोटोशॉप खूप मागे पडलंय. पण यानिमित्ताने परत सुरुवात करेन :) खूप धमाल आहे यात , वेळ जाम लागतो पण जेव्हा काम पूर्ण होत, ते समाधान काही वेगळंच असत :)

In reply to by स्पा

जेव्हापासून 3D मध्ये घुसलो.....
2D चित्रांत 3D म्हणजे नक्की काय करता ते जरा विशद कराल का? धन्यवाद.

In reply to by प्रदीप

2d म्हणजे 2 dimensions , ज्यात आपल्याला दोनच axis म्हणजे अक्ष दिसतात . x आणि y पण 3d मध्ये तुम्हाला अजून एक axis मिळतो z उदाहरण: एखादं object हवं तसं ३६० डिग्री मध्ये फिरवून बघू शकता 2d मध्ये ते करता येत नाही... 2d मध्ये एखाद object ३६० डिग्री कोनात फिरवायचा असेल तर तशी तशी हजारो चित्र काढावी लागतात आणि मग ती २४ फ्रेम पर सेकंद या वेगाने फिरवावी लागतात 3d मध्ये कॅमेरा ठेवून तो गोल फिरवला कि काम झालं 3d मध्ये आपण अफाट काम करू शकतो, 2d च्या कामामध्ये limitations येतात 2d आणि 3d दोघांचेही फायदे आहेत तसे तोटेही . 2d मध्ये आधी अशी स्केचेस काढावी लागतात 3d मध्ये अशीच स्केचेस काढून ती 3d सोफ्टवेर मध्ये आणावी लागतात , आणि त्याच मोडेल बनवावं लागतं

In reply to by स्पा

2d मध्ये एखाद object ३६० डिग्री कोनात फिरवायचा असेल तर तशी तशी हजारो चित्र काढावी लागतात आणि मग ती २४ फ्रेम पर सेकंद या वेगाने फिरवावी लागतात 3d मध्ये कॅमेरा ठेवून तो गोल फिरवला कि काम झालं 3d मध्ये आपण अफाट काम करू शकतो, 2d च्या कामामध्ये limitations येतात
तुमच्या ह्या सविस्तर उत्तराने गोंधळ उडला आहे, पहा! * २D मध्ये अनेक चित्रे काढावी लागतात आणि मग ती २४ फ्रेम पर सेकंद ह्या वेगाने फिरवावी लागतात * ३D मध्ये कॅमेरा (गोल) फिरवला की काम झाले ह्या सर्वात तुम्ही अवकाशातील दोन परिमाणांव्यतिरीक्त काल हे तिसरे परिमाण आणले आहे. लेखात तुम्ही अ‍ॅनिमेशन, आफ्टर ईफेक्ट्सचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर फोटो शॉपचाही! वास्तविक २D ला अवकाशातील दोन परिमाणे असतात, 3D ला तीन. ही तिन्ही परिणामे अवकाशातील आहेत. ह्यात कालाचा संबंध अजिबात नाही. तुम्ही जी चित्रे २D मध्ये काढली आहेत, त्यात ३D (दोन परिणामाच्या अवकाशातून तिसरे अवकाशी परिमाण कसे दर्शवता), हा मुळात प्रश्नाचा रोख होता. 'आता 3D मध्ये घुसलोय', म्हणजे आता तुम्ही ३D अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात काम करताय, असे तुम्हाला अभिप्रेत असावे बहुधा. (अ‍ॅनिमेशन करण्यासाठी अवकाशातील तिसर्‍या परिणामाची आवश्यकता आहेच असे नाही. दोन परिणामातही अ‍ॅनिमेशन असू शकते).

In reply to by sneharani

मस्तच ! प्रयोग छान जमला आहे. स्वगत : स्पावड्याचा 'क्रिकेट वर्ल्ड कप सदरासाठी' चांगल उपयोग होईल ना ? ;) असो, व्यनी करतो. - छोटा डॉन

एकदम मस्तच! सिनेमात दाखवतात तो हा प्रकार असतो हे माहिती नव्हतं. ऑफिसमधला ग्राफिक्स डिझायनरला हे असंच मिक्सींग २D चित्रांसाठी करताना पाहिलंय. मला हे २D/३D चं काम फारच इंटरेस्टींग वाटतं. अवांतर : मॅट पेंटींगशी संबंधीत नाही पण सुरेख व्हिज्युअल एफेक्ट्स् असलेला एक व्हिडीओ आजच पाहिला.

छानच रे स्पा. थोडे सविस्तर लिहिले असतेस तर अजुन मजा आली असती आणि थोडी ज्ञानात भर पण पडली असती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा भाउ, कोनते software आहे हे ? जमल्यास लिंक द्या ना ? मुलांना खुप आवडेल. freeware आहे का ?

स्पावड्याशेठ जरा आणखी माहितीपुर्ण लेखमालिका लिहिता येईल ह्या विषयावर.. जरा तरी मनावर घ्या.. - पिंगू

स्पा, अतिशय धन्यवाद एका नव्या व थोड्याश्या ट्रेड सिक्रेट विषयाला हात घातल्या बद्दल. तुझा हात खुप छान आहे, आणि हे जर जुनं असेल तर नवीन किती सुंदर असेल याचा विचार करतोय. पण हे असं बारीक काम करुन डोळ्यांना खुप त्रास होत असेल ना ? काळजी घे बाबा डोळ्यांची. हर्षद.

एकदम फक्कड!! थोडी टेक्निकल माहिती आणि चित्रं टाकावीत असे वाटले.....

नायगाराच्या धबधब्यात कोसळणारी स्वातंत्र्य देवता आणि भला मोठा चांदोबा साक्षीला ताज महालावर... मलातरी शरदिनीताईंची आठवण आलई..