कलियुग
"कधी आल्या आत्याबाई ममईवरुन?"
"रातीच आले"
"बर्या खुशाल का?"
"हां... तुम्ही खुशाल तं आम्हीबी खुशाल"
"सकाळपसुन बसल्यात इथं वट्ट्यावर... उन्हाला.."
"हां..मोकार कळांगान सुटलय रातपसुन. पार रक्त गोठलय"
"हां ना. पावसाळ्यात ऊन आन हिवाळ्यात पाऊस. कलियुग.. दुसरं काय?"
"ह्म्म्म... "
"ममैला कोनकोने मंग?"
"डाक्तर नवरा बायकु. आन एक पोरगी"
" पोरगी येकुलती येके का?"
"नाही. एक पोरगा हायेना. पुण्यालाय कालेजात"
"पोरगी लहाने का?"
"नाही. मोठीये. लग्न झाल् त तीच"
"मंग?"
"आली परत माहेरी"
"कम्हुन"
"तीचा नवरा गेला. पळुन...."
"अरे पांडुरंगा....दुसरी केली का?"
"नाही. दुसरा केला"
"म्हंजी?"
"आगं, त्यानं एका माणसाबरोबर लगीन केलं"
"खि.. खि.. खि. काssय. म्हंत्या क्काय आत्याबाई....?"
"हां ना. खरच."
"हा हा हा तुम्ही लई नकलीय आत्याबाई"
"आगं गप नाही सांगत"
"ही ही ही. नाही हो आत्याबाई. तुमची आइकण्यात काहीतरी गफ्लत झाली आस् न"
"नाई गं बाय. खरच "
"आन् याच्यासंग लगीन केलं तो?"
"त्याचंबी लगीन झाल् तं. त्याचीबी बायकु बसली घरी आन् हिबी"
"पण आत्याबाई गडीमाणुस गडीमाणसाशी कसं काय लगीन करीन?"
"केलं बाई त्यान्नी. कस काय केल देवालाच माहीत?"
"पण आत्याबाई त्यांचा व्यवहार कस्काय व्हईन"
"................."
याद्या
4701
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
हा हा हा! ज्यांना नवीनच
होतं असं आता!! काय करणार?
लेखकाला "कलीयुग" या
>>दुसरा मुद्दा तितकासा नवीन
In reply to लेखकाला "कलीयुग" या by शुचि
अजूनही (काही) खेड्यापाड्यात
In reply to लेखकाला "कलीयुग" या by शुचि
कथेला दिलेले शीर्षक कथेतील
In reply to लेखकाला "कलीयुग" या by शुचि
अरेच्चा!
In reply to कथेला दिलेले शीर्षक कथेतील by कानडाऊ योगेशु
मस्त ! अवांतर : मोहिनी म्हणजे
In reply to अरेच्चा! by प्रियाली
समुद्र मंथानात अमृत ढापणारी
In reply to मस्त ! अवांतर : मोहिनी म्हणजे by कुळाचा_दीप
शंकराचे तिसरे अपत्य म्हणजे
In reply to अरेच्चा! by प्रियाली
तुमचा प्रतिसाद वाचल्यानंतर
In reply to शंकराचे तिसरे अपत्य म्हणजे by परिकथेतील राजकुमार
किन्नर
किन्नर चा जालावरील उल्लेख
In reply to किन्नर by सुनिलपाटील
हा हा हा
गावातील लोकांची प्रतिक्रिया
कल्युग
In reply to गावातील लोकांची प्रतिक्रिया by शिल्पा ब
@मूक्त - आपला विनोदी लेख वाचून मनोरंजन झाले
हम्म. कलीयुगात वागणे सुधारावे
मस्त!
"पण आत्याबाई त्यांचा व्यवहार
हा हा.. मस्त!!
चान चान