चित्रपटातील रंगसंगती ~~ "अनेक भावनांचे प्रतीक : लाल रंग"
भाग-१
"चित्रपटातील तानापिहिनिपाजा..." या पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्या सर्वांचे (आणि तसेच तो वाचणार्यांचे, व खरडीतून तसे आवर्जुन कळविणार्यांचे) मनःपूर्वक आभार. आज इथे दुसरा भाग प्रकाशित करताना थेट "रंग...त्यांचे संकेत आणि चित्रपटात दिग्दर्शकाने कोणत्या भावनेने त्या रंगाचे केलेले प्रयोजन' यावर भर दिला आहे. विषयाची व्याप्ती मोठी आणि 'कला दिग्दर्शका'च्या नजरेतूनही ती एक महत्वाची बाब असल्याने काहीशी तांत्रिक महत्तेचीही आहे. त्यामुळे एखाद्या रंगासाठीही शेकडो चित्रपटांची उदाहरणे देता येतील, पण तसे केले तर पुढे या लेखासाठी असलेली शब्दमर्यादा प्रमाणाबाहेर वाढेल या भीतीपोटी केवळ पाचसहा चित्रपटच उदाहरणासाठी मी घेत आहे (शिवाय रंगाची उदाहरणे देताना त्या त्या चित्रपटातील त्या रंगाचा वापर केलेले काही फोटोही इथे देणे गरजेचे असल्याने परत "स्पेस" ची अडचण जाणवणारच). 'नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट, फिडलर ऑन रूफ, बर्डस्, थॉमस क्राऊन अफेअर' या गाजलेल्या चित्रपटांचे ऑस्कर विजेते 'प्रॉडक्शन डिझायनर' रॉबर्ट बॉएल यांचे 'चित्रपटातील रंग' यावरील "रंग हे भावनेचे प्रतिक असल्याने पडद्यावरील रंग आहेत उपलब्ध म्हणून तिथे आले आहेत असे न समजता प्रसंग खुलविण्यासाठी त्या रंगाचा वापर का आणि कसा केला आहे याचा विचार केला तर शब्दांपेक्षा त्याचे सामर्थ्य जाणवते."
शाळा असो वा महाविद्यालयीन जीवन, लहान असो वा मोठा, ज्या ज्या वेळी "रंग" विषय नजरेसमोर येतो त्या त्या वेळी अगदी जगाचे व्यासपीठ जरी घेतले तरी सर्वत्र सर्वप्रथम "लाल" रंगाचा प्रामुख्याने विचार येतो. तसे पाहिले तरी रंगचक्रात प्रमुख RGB हेच तीन असून अन्य त्यांच्यापासून तयार होतात असे शास्त्र सांगते. त्यामुळे चित्रपटातील रंगमाहात्म्याची सुरूवातही 'लाल' पासूनच सुरू करणे क्रमप्राप्त आहे. लाल रंग हा भडक मानला/दिसला गेला असला तरी तो प्रेम आणि युद्धाचे प्रतीक आहे. तो जसा क्रौर्य हिंसा दाखवितो त्याचप्रमाणे प्रेमाची आत्यंतिकताही, म्हणूनच तो मदनची आतुरता आणि सैतानाचा पिपासूपणा दोघांसाठी महत्वाचा मानला गेला आहे. लाल रंग शारीरिक स्थितीचे आणि भावनेचे चढते स्पंदन दाखवितो, मग ती भावना संतापाची असेल वा प्रेमातील बेभानता असेल. 'लाल' लपाछपीचा खेळ करत नाही त्यामुळेही तो सर्वत्र थेट आणि उघडपणे पोहोचतो. (लाल आपुलकीचाही असल्याने खुद्द इथे मिसळपाव व्यवस्थापनानेही संस्थळ सजावटीमध्ये अत्यंत चाणाक्षपणे 'लाल' रंगाचा मुक्त वापर केल्याचे आढळते.)
माझ्या दृष्टीने "लाल" चा सर्वार्थाने उपयोग केला गेला तो 'अमेरिकन ब्युटी' या चित्रपटात. मध्यमवयीन पतीपत्नीमधील बेबनाव आणि त्यांची होणारी घुसमट, आपल्या मुलीच्या वर्गातील तिच्याच वयाच्या मैत्रिणीचे नायकाला "लोलिता" सम वाटणारे जबरदस्त शारीरिक आकर्षण, त्याच्या तितक्याच नैराश्येने ग्रासलेल्या मनी संताप वसलेल्या पत्नीचे आहे त्या परिस्थितीत जगण्याचा प्रयत्न....आणि हे त्या दोघांची घुसमट प्रकर्षाने येते चित्रपटात वापरला गेलेला लाल रंग. एक फ्रेम पत्नी सुरीने लाल गुलाब छाटत आहे. तिच्या मनाची घालमेल त्या लाल पाकळयातून उलगडत जाते. तर दुसर्या फ्रेममध्ये नायक (केव्हीन स्पेसी...ज्याला याच चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरचे ऑस्कर मिळाले होते) मुलीच्या मैत्रिणीसमवेत आपण शरीरसुख घेत आहे ही कल्पना नजरेसमोर आणून बेडवर लाल फुलांच्या पाकळ्या विखरत आहे हे दृष्य...टबमधील पाण्यावरही तोच लाल पाकळ्यांचा थर....तर प्रत्यक्ष दोघांची समोरासमोर गाठ पडते त्यावेळी शेजारील टेबलवर संकेत म्हणून पुन्हा लाल फुलांचा बुके ! लाल बंडखोरीचेही प्रतीक असल्याने खुद्द स्पेसीचीच मुलगी आपल्या प्रियकरासमवेत घर सोडून जाते त्यावेळी अंगावर ती जो स्वेटर चढविते तोदेखील लाल रंगाचाच. दिग्दर्शकाने जाणीवपूर्वक या चित्रपटाच्या पोस्टरवर लाल रंगाची जी उधळण केली होती ती याच हेतूसाठी.
दिग्दर्शक लाल रंग शक्तीचे आणि खुनशीपणाचेही प्रतीक दर्शविण्यासाठी वापरतो. "वर्किग गर्ल" या चित्रपटात एकाच ऑफिसमध्ये काम करणार्या दोन स्त्रिया 'तुझ्यापेक्षा मी किती शहाणी आहे..." हे दाखविण्याच्या प्रयत्नात असतात तर यातील कॅथेरिन झालेली सिगोर्नी वीव्हर ("एलियन"वाली) अगदी गिधाडासारखी आपल्या भक्ष्यावर टपून बसलेली दाखविताना तिला सतत लाल रंगाचाच टॉप घातलेला दाखविला आहे.
तर वर म्हटल्याप्रमाणे हा रंग चीड आणि नैराश्येमुळे आलेला पण दाबलेला संताप दाखविण्यासाठीही वापरला जातो. स्टीव्हन स्पिएलबर्गने "शिंडलर्स लिस्ट" या कृष्णधवल चित्रपटात मध्ये नाझी सैनिक क्राकोव्हच्या रस्त्यावरून ज्यू लोकाना (लहानापासून थोरापर्यंत) गुरासारखे हाकलत नेत आहेत असे दाखविताना फक्त एकच छोटी मुलगी लाल कोटात दाखविली आहे, तिला स्वतः ओस्कर शिंडलर बाजूला उभारून पाहताना दिसतो. काही दिवसानंतर शिंडलर आपल्या जर्मन अधिकारी मित्रासमवेत ज्या ठिकाणी नाझी भट्ट्यातून ज्यूंची प्रेते जाळली जात आहेत हे दृष्य पाहतो, त्यावेळी त्या अग्नीकुंडात टाकण्यासाठी काही प्रेत आणली जात आहेत तीत पुन्हा तोच रेड कोट त्याला दिसतो व तो नखशिखांत हादरतो...आणि त्याच क्षणी त्या ज्यू लोकांच्याबद्दल त्याच्या मनात कणव निर्माण होते. फार भावुक वाटते त्या लाल कोटातील त्या मुलीचे शव पाहताना.
बेस्ट आर्ट डायरेक्शनसाठी ऑस्कर मिळालेल्या वॉरेन बेट्टीचा 'डिक ट्रेसी' या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटात पात्रे आणि कथानकातील भडकपणा रोखठोकपणे दर्शविण्यासाठी लाल रंगच प्रामुख्याने वापरला गेल्याचे दिसते. मीटिंगसाठी नियोजीत टेबलच असे काही लालभडक आहे की मीटिंग सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकाला कळून चुकते की कोणते महारथी तिथे हजर असणार आहेत आणि कोणत्या विषयावरीच चर्चा तिथे होऊ घातली आहे.
टेनेसी विल्यम्स या प्रसिद्ध नाटककाराच्या 'कॅट ऑन अ हॉट टिन रूफ' या गाजलेल्या नाटकावर आधारित निघालेल्या चित्रपटात लाल रंगाचा वापर हे त्या नायिकेच्या [सासरच्या इस्टेटीबाबत चाललेला झगडा, दारुड्या नवर्याचा नाकर्तेपणा] मनातील संतापाची घुसमट दाखविण्यासाठी योजिला आहे.
तर गुन्हेगारी जगतातील एक (कु) प्रसिद्ध जोडपे "बॉनी अॅन्ड क्लाईड" या चित्रपटाचे हे लाल आणि काळ्या रंगातील पोस्टरच त्या चित्रपटाचे कथानक स्पष्ट करते.
तिच गोष्ट डेव्हीड लीनच्या जगप्रसिद्ध 'डॉक्टर झिवागो' चित्रपटाच्या पोस्टरची (अर्थात 'डॉ.झिवागो' मध्ये पांढरा आणि काळा रंगही फार मोठी भूमिका बजावतो, त्याविषयी त्या रंगाच्या ओळखीच्यावेळी उल्लेख येईलच.)
जगभर खास पौराणिक कथेच्या आवाक्याने तसेच आपल्या स्पेशल इफेक्ट्समुळे गाजलेला "Crouching Tiger and Hidden Dragon" हा चीनचा चित्रपट. यात लाल रंग येतो प्रेमाच्या प्रतीकासाठी. राजकन्या जेन आणि जंगलात लपून राहिलेला तिचा बंडखोर प्रियकर लो यांच्यातील प्रेम आणि दुरावा तरीही आसक्ती आणि ओढ दर्शविण्यासाठी दोघांनाही लाल रंगाचीच वस्त्रे देणे हे दिग्दर्शकाने लाल रंग हे ओढीचे प्रतीक मानून दिले आहेत हे स्पष्ट आहे.
लाल रंग अर्थातच समाजातील विषमता, घटनेतील उत्सुकता, भविष्याविषयीचे आडाखे, मनातील खळबळीचे अंदाज दर्शविण्यासाठीही विविध चित्रपटातून दाखविला जातो. त्यासाठी रेज, माल्कम एक्स, रेबेल विदाऊट अ कॉज, फिलाल्डेल्फिया, एज ऑफ इनोसंस, रोमिओ अॅण्ड ज्युलिएट ही काही उदाहरणे.
["लाल आख्यान" इथे थांबविणे गरजेचे आहे, कारण हा रंग जगभरातच अशा काही विविध अर्थानी 'लोकप्रिय' आहे की, या रंगाशिवाय जणू काही कोणती फ्रेम पूर्णच होऊ शकत नाही. शिवाय याच्या विविध शेड्सही असल्याने त्यांचा विचार केला तर हा एकच रंग चित्रपट दिग्दर्शक आणि कलादिग्दर्शक "कथेतील आत्यंतिकता" दाखविण्यासाठी प्रामुख्याने का वापरतात हे समजते; म्हणजेच याच रंगावर अनेक लेख होऊ शकतील. पण आत्ता पुढील भागात दोन वेगळ्या रंगांचा विचार करू या.]
(टीप : लेखाच्या स्वरूपाविषयी सूचना अवश्य कराव्यात. पुढील रंगाच्या विवेचनाच्यावेळी त्या उपयोगी पडतील.)
इन्द्रा

वाचने
11277
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
ह्म्म्म चांगले विवरण आहे. पण
In reply to ह्म्म्म चांगले विवरण आहे. पण by नीधप
बदलाची गरज....!!
In reply to बदलाची गरज....!! by इन्द्र्राज पवार
सांवरिया नामक तद्दन फालतु
In reply to सांवरिया नामक तद्दन फालतु by टारझन
सांवरिया आणि निळाई....!
In reply to सांवरिया आणि निळाई....! by इन्द्र्राज पवार
बरोबर
In reply to बरोबर by सहज
रेड शेड्स...!!
छान! वेगवेगळ्या ठिकाणी
मागल्या लेखात डांबिस काका
छान लेखन इंद्रदा. खुप नवनविन
उत्तम.
ये लाल रंग
चांगली माहिती
पवार साहेब.. खूपच सुंदर जमतेय
अभ्यासपूर्ण लेख
सुंदर
In reply to सुंदर by समीरसूर
ब्रॅण्ड रंग....!!
सखोल अभ्यासातुन आलेला एक उत्तम लेख..
रापचिक लेख
येह लाल रंग कब मुझे छोडेगा ;-)
डेव्हिल
वेगळा लेख...
इंद्रा मित्रा
In reply to इंद्रा मित्रा by संदीप चित्रे
संदिपदा शी सहमत.. इंद्रा
In reply to इंद्रा मित्रा by संदीप चित्रे
अभ्यासाची आवड....!!
श्री. ईंद्रा, धन्यवाद एक
सुंदर लेखमाला
In reply to सुंदर लेखमाला by निनाद
अग्नी आणि चिनी परंपरा....!!
भन्साळीला निळ्या रंगाची बाधा
लाल+पांढरा....!
लिहिलंय ते उत्तम आहे पण ....
In reply to लिहिलंय ते उत्तम आहे पण .... by ऋषिकेश
"In India there are no mere
चिनी लाल रंग
थोड रंगाबद्दलच विवरण वाढवा
उदाहरणे मस्त आहेत... पण
वाचतोय...