कलम, आज उनकी जय बोल - रामधारी सिंह दिनकर
जालावर भटकत असताना अतिशय गेय अशी एक कविता माझ्या वाचनात आली. वीररसाने ओथम्बलेली ही रचना हिंदीतील नामवंत कवी "रामधारी सिंह दिनकर" यांची असून खाली उधृत केलेली आहे.
अनाम ,नामवंत, अमर, लहान, थोर अशा स्वातंत्र्यवीरांना ही कविता अर्पण केलेली आहे.
पहीले कडवे चटका लावणारे आहे आणि ते वाचत असताना भगतसिंग, राजगुरु, चाफेकर बंधूंची आठवण झाल्याखेरीज रहात नाही.
"जो चढ़ गये पुण्यवेदी पर
लिए बिना गर्दन का मोल।" हे वाचतानाच काळजात चर्र होते.
दुसर्या कडव्यातील रुपक अप्रतिमच आहे. स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक हे जणू प्रचंड वादळातदेखील आत्मबळावर जळत राहीलेले, प्रकाश देत राहीलेले असंख्य लहान लहान दीपच आहेत असे रूपक कवीने वापरले आहे. एका शब्दाचीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता कर्तव्यपूर्ती करता करता, वादळाचा सामना करत जे विझून गेले आज त्यांचा जयजयकार करू यात अशा आशयाची ही कविता आपल्याला आवडेल याची मला खात्री आहे.
कलम, आज उनकी जय बोल - रामधारी सिंह दिनकर
जला अस्थियां बारी-बारी
चिटकाई जिनमें चिंगारी,
जो चढ़ गये पुण्यवेदी पर
लिए बिना गर्दन का मोल।
कलम, आज उनकी जय बोल
जो अगणित लघु दीप हमारे
तूफानों में एक किनारे,
जल-जलाकर बुझ गए किसी दिन
मांगा नहीं स्नेह मुंह खोल।
कलम, आज उनकी जय बोल
पीकर जिनकी लाल शिखाएं
उगल रही सौ लपट दिशाएं,
जिनके सिंहनाद से सहमी
धरती रही अभी तक डोल।
कलम, आज उनकी जय बोल
अंधा चकाचौंध का मारा
क्या जाने इतिहास बेचारा,
साखी हैं उनकी महिमा के
सूर्य चन्द्र भूगोल खगोल।
कलम, आज उनकी जय बोल
याद्या
2261
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
वा!
सुंदर कविता आहे
चकाचौंध
सदर कविता जर शांततामय
+१
In reply to सदर कविता जर शांततामय by llपुण्याचे पेशवेll
सुरेख कविता शुचि, इथे
हेच
In reply to सुरेख कविता शुचि, इथे by यशोधरा
शुची - हे खूप मस्त शोधून