करायला गेलो एक आणि..
आमचा विकांत हा नेहमी स्पेशल असतो (कसला डोंबलाचा स्पेशल काय माहीत ? पण आपल ते स्पेशल आण दुसर्याच ते ... असो असे म्हणायची पध्दत आहे )
तर, या शुक्रवारी, मी सुरुवात केली तीच मुळात रात्री नउ वाजता (तेच ते आयटी वाल्यांच सुप्रसिध्द कारण ).
घरी भाजी नव्हती आणि भाज्यांची दुकाने बंद !! जाताना आमच नेहमीच राशनवालं खोपड उघड दिसलं आणि त्यात दोन ढब्बु मिरच्या दिसल्या .म्हटल शेंगदाण्याचा कुट घालुन ढब्बु मिरची अगदीच काही वाइट लागत नाही. पण विकांत म्हणजे स्पेश्शलच पाहिजे . आणि घरी आल्यावर मी जे काही केले ते कागदावर उतरवत आहे. या भाजीला काय नाव द्यावे मला माहीत नाही, पण जे काही झाल होत ते चटकदार आणि झणझणीत होते.तसाही आमचा ओढा जरा चमचमीत खाण्याकडे जास्तच आहे.
१) बेसनपीठ घेतल.
खमंग भाजुन घेतल, गठुळ्या होउ दिल्या नाहीत.
२) मग ढब्बु मिरची चा, देठ काढुन त्याला असा काप मारला.
३) भाजलेल्या पिठात मीठ, लाल मिरची पुड आणि धनिया पुड घालुन एकत्र केली.
४ )चमचा वापरून हे मिश्रण ढब्बु मिरचीत घातल.
५ )त्यानंतर कढईत जिरे- मोहरी लाल मिरची पुड , हळद ,तेल याची फोड॑णी द्या , थोडे पाणी टाकल. पाण्याला उकळी आल्यावर ही ढब्बु मिरची त्यात सोडली , चांगली हलवुन घेतली एक उकळी आल्यावर माझ्या लक्षात आल की आतील बेसन शिजणार कसे मग जाउन त्याला एक मधुन काप मारला. जे काही झाले ते असे होते.
६) आणि हे फायनल !!
७ ) या जेवायला !!

याद्या
7671
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
आय शपथ लय भारि बनविल ! आलेच
सुहाश्या गणपाला सोलिड टफ फाईट
एक टीप देते (आग्रह नाहि सहज)
मस्त
अरे वा मस्त डिश आहे पन हे कूट
लेट फ्रायडे नाइट इफेक्ट
कसला डोंबलाचा स्पेशल काय
हा प्रतिसादातिल काही वाक्ये
In reply to कसला डोंबलाचा स्पेशल काय by टारझन
झकास रे ! पाकृ दिसतीये
लेख खुपच मोठ्ठा आहे, वाचुन
सुहास अभिनंदन, तुझ्या
अरे वा छान पाकृ बनलेय. सुहास
पोटावर (तु़झ्याच) अत्याचार
आमच्या पलि़कडच्या गल्लीतली
In reply to पोटावर (तु़झ्याच) अत्याचार by अवलिया
टॉम्या पासुन सावधान
In reply to आमच्या पलि़कडच्या गल्लीतली by नरेशकुमार
अशीच
आवडले
छान...
सुहास--
पुतण्याची गोष्ट सोडून बाकि
In reply to सुहास-- by निवेदिता-ताई
मस्त
धन्य हो सुहास राव!! मेन
मस्त...चवदार दिसतेय
'काप मारला' हे वाक्य मनाला
मस्त