✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इंद्रराज पवारांचे अभिनंदन

प
प्रचेतस यांनी
Sat, 01/15/2011 - 10:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11033 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

वाचन आणि अभ्यास....!!

इन्द्र्राज पवार
Sun, 01/16/2011 - 22:13 नवीन
"....तुमचा अभ्यास पाहून मी तर थक्कच झालो. ..." ~ सुधीर जी, या भावनेबद्दल आभारी आहे. पण खरं सांगायचे झाले तर मी 'बर्‍यापैकी वाचन केले आहे' असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. 'अभ्यास' म्हणावा अशी दिशा मात्र जरूर देईन. सध्या तर त्या बकरीसारखे झाले आहे जी मागचा पुढचा विचार न करता दिसेल त्या शेतात शिरून तिथला हिरवागार चारा खात मोकाट हिंडते. माझ्या वाचनाची जातकुळी याच पठडीतील आहे. आज मी 'सभासदाची बखर' वाचली असेल तर उद्या चेतन भगतच्या बाकड्यावर बसलेला असेन. मागील आठवड्यात विवेकानंदांची पत्रे वाचत असतानाच कपाटात त्यांच्याच दुसर्‍या पुस्तकाच्या पाठीला पाठ लावून हिचकॉक बसले होते, तेही खुणावत होतेच. असे सारे आहे वाचन.....रंगीत रिळाप्रमाणे. धन्यवाद इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

अभिनंदन इंद्राज पवार! आज जर

आमोद शिंदे
Mon, 01/17/2011 - 01:59 नवीन
अभिनंदन इंद्राज पवार! आज जर सर्किट आपल्यात असते तर त्यांनी पवार आणि गवि ह्यांना मिपाची नवी फाइंड म्हणून गौरवले असते.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 01/17/2011 - 05:13 नवीन
इंद्रा, तुझे अभिनंदन. यापुढेही तुझ्याकडून माहितीपूर्ण लिखाण वाचायला मिळेलच याची खात्री आहेच.
  • Log in or register to post comments

अभिनंदन सामन्याच्या उपक्रमाचे

निनाद मुक्काम …
Mon, 01/17/2011 - 05:58 नवीन
अभिनंदन सामन्याच्या उपक्रमाचे देखील अभिनंदन
  • Log in or register to post comments

ही बातमी आताच वाचली. बातमी

ऋषिकेश
Mon, 01/17/2011 - 22:38 नवीन
ही बातमी आताच वाचली. बातमी पोहोचवल्याबद्दल वल्ली यांचे आभार इंद्रराज यांचे मनापासून अभिनंदन आणि उत्तमोत्तम वाचनासाठी अनेक शुभेच्छा ( वाचन यासाठी की त्याचमुळे आम्हाला असे लेखन आपसूकच वाचायला मिळेल :) )
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

नंदन
Tue, 01/18/2011 - 02:58 नवीन
इंद्रा, स्वातीताई आणि परा ह्यांचे हार्दिक अभिनंदन. ह्या सगळ्यामागे रामदासांची योजकाची भूमिका महत्त्वाची वाटते. अलीकडेच मराठीत ताजं, तरूण लेखन का येत नाही ह्या स्वरूपाची अलीकडेच चर्चा झाली होती. नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्याचं काम पूर्वी मासिकं किंवा अनियतकालिकं काही प्रमाणावर बजावत असत. आता त्यातली बरीचशी अस्तंगत झाली आहेत. वर अनेकांनी लिहिल्याप्रमाणे संकेतस्थळांवर वाचनीय असं काही लिहिणारे लोक आहेत. आंतरजालाच्या मुक्तपणामुळे आणि सर्वव्यापीपणामुळे अर्थातच भविष्यात अशांच्या संख्येत भरच पडेल. असं असलं तरी मराठीचा वाचकवर्ग हा प्रामुख्याने आंतरजालाबाहेरचाच आहे. (काही वर्षांनी/दशकांनी हे चित्र बदलू शकेल, हा भाग अलाहिदा.) अशा वेळी, रामदासांसारख्या साक्षेपी व्यक्तीने ह्या नवीन लेखनस्रोताची (पक्षी: आंतरजालीय लेखक) आणि पारंपरिक वाचकवर्गाची सांगड घातली तर हा एकमेव नसला तरी परिणामकारक उपाय ठरू शकेल. (संपादकपद स्वीकारताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला होताच)
  • Log in or register to post comments

अभिनंदन...

ज्ञानराम
Tue, 01/18/2011 - 10:23 नवीन
अभिनंदन...
  • Log in or register to post comments

उद्याचे व्यासपीठ....!!

इन्द्र्राज पवार
Tue, 01/18/2011 - 10:44 नवीन
"....ह्या सगळ्यामागे रामदासांची योजकाची भूमिका महत्त्वाची वाटते...." ~ हे १००% सत्य आहे कारण सामना च्या "फुलोरा" विभागाच्या संपादकांनीही माझ्याशी बोलताना श्री.रामदास यांच्या नावाचा आदरपूर्वक उल्लेख केला होता. विषयांतील नावीन्य आणि ताजेपणा आजच्या गतीमान जगात फार ठळक झाले असून 'सत्यकथा', 'युगवाणी', 'अभिरुची', 'हंस' आदीसारख्या नवोदितांच्या हक्काच्या व्यासपीठांचा अस्तंगत झाल्याने तसेच 'कॉलेज मॅगेझिन्स' मधीलही आकर्षण (आणि खुद्द अशा मॅगेझिन्सची गरजही...) ओसरल्याने त्याना आंतरजालीय वावरातूनच आपली अभिव्यक्ती सादर करावी लागेल. येत्या पाचसहा वर्षात अशा प्रकारच्या विस्तृत लिखाणाला खूप वाव मिळणार अशीच चिन्हे असल्याने विविध विषयावर औचित्यपूर्ण लिखाण करू इच्छिणार्‍यांनी या संधीकडे उमेदीने पाहावे असे सद्यस्थिती म्हणत आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

फारएन्ड
Tue, 01/18/2011 - 10:36 नवीन
अभिनंदन इंद्रराज!
  • Log in or register to post comments

अभिनंदन इन्द्राजी

गणेशा
Tue, 01/18/2011 - 19:19 नवीन
अभिनंदन इन्द्राजी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा