Skip to main content

माझ देवगड.....हापूस नगरी. (भाग २)

नन्दादीप यांनी या दिवशी प्रकाशित केले.
माझ देवगड... हे सर्व फोटो मी व आमच्या मित्रांनी काढलेले आहेत. स्थळ, वेळ, साधने(फोटो काढण्यासाठी) वेगवेगळी आहेत. जाहीर आभार : मुलुखावेगळी ताई..... १. मणचे धबधबा... २. परत एकदा तांबळडेग...... ३. वालुका शिल्प..बीच फेस्टीवल. ४. वाडे तर.... ५. रांजण खळगे..... ६. दुर्गाधिपति विजयदुर्ग.... ७. विजय दुर्ग चढाई......(फोटोत मी नाहीये.....फोटोग्राफर मी आहे.) धन्यवाद मागील भागातील प्रतिक्रियांबद्दल....
लेखनविषय:
५० फक्त

नंदादीप, या भागातले पण फोटो खुप छान आलेत. १. वाळु शिल्प फेस्टिवल देवगड्ला कधी असतो त्याचि माहिती मिळेल काय ? २. मणचे धबधबा फक्त पावसाळी आहे की वर्षभर असतं पाणि तिथं ? ३. रांजण खळगे जागेचं नाव आहे काय आणि त्याचा रांजणगाव जवळच्या रांजण खळग्यांसारखं काही आहे. ? हर्षद.
15/01/2011 - 14:50 Permalink
नन्दादीप

In reply to by ५० फक्त

>>वाळु शिल्प फेस्टिवल देवगड्ला कधी असतो त्याचि माहिती मिळेल काय ? अस काही नसत...देवगडला बीच फेस्टीवल असत ना तेवा हौशी कलाकार करतात ते. बीच फेस्टीवल च आमंत्रण देईनच मागहून....मी पण मुंबई ला असल्याने पूर्ण वेळ देऊ शकत नाही बीच फेस्टीवल साठी..वाईट वाटत. >>मणचे धबधबा फक्त पावसाळी आहे की वर्षभर असतं पाणि तिथं ? पावसाळी...बाकी वर्षभर बारीक झरा असतो...स्वच्छ पाण्याचा...बाजूला महादेवाचे मंदीर पण आहे. >>रांजण खळगे जागेचं नाव आहे काय आणि त्याचा रांजणगाव जवळच्या रांजण खळग्यांसारखं काही आहे. ? रांजण खळगे म्हन्जे छोट्या खड्ड्यात दगड सापडून समुद्राचे पाणी त्याला गोल गोल फिरवते....त्यामुळे खड्डा मोठा होतो. त्याला रांजण खळगे म्हनतात. फोटोत ते पाण्याखाली गेले आहेत...(भरती मुळे) पुढच्या वेळी सविस्तर फोटो टाकेन....
15/01/2011 - 15:06 Permalink
आत्मशून्य

५. रांजण खळगे..... भारताच्या नकाशातील जम्मू-कश्मीरमधील भारताचा "पाक व्याप्त काश्मीर" हा भूभाग सोडून दीसणार्‍या भागासारखे दीसतेय ते...
15/01/2011 - 22:15 Permalink
रमेश आठवले

हापूसच्या बागेचे एखादे चित्र असते तर !!
16/01/2011 - 11:53 Permalink