मन माझं गोगलगाय !
मन माझं गोगलगाय
खुट्टं वाजता शंखात जाय
प्राजक्ताचा दरवळ घेऊन
रांगत पहाटवारा आला
शिंका येतील ! आल्या शिंका !!
नाक हाती शंखात पाय !
मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय
खुणावताना हिरव्या वाटा
मनास दिसतो केवळ काटा
काटा टोचेल ! टोचला काटा !!
मान फिरवून शंखात जाय
मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय
समोर फुटती लाट अनावर
सरसरून ये नभ धरणीवर
थेंब उडतिल ! कपडे भिजतिल
भिजेल डोकं ! भिजतिल पाय !!
मन माझं गोगलगाय । खुट्टं होता शंखात जाय
घुसुन बसावे शंखी आपुल्या
हळु काढावी बाहेर मान
इकडुन तिकडे सरपटताना
टवकारावे दोन्ही कान
विजा नि लाटा, झुळुक नि वाटा
बघुन नाचतो एकच पाय
उपयोग नाय
दुसरा पाय शंखात चिकटुन
पाय नाचरा ओढू जाय
मन माझं गोगलगाय
खुट्टं होता शंखात जाय
सुंदर, खूप आवडली!
मस्त जमलीये कविता..
+ १
अप्रतिम!
आरं तिच्या..
खूपच छान ...
बेष्ट ! आधी वाटले की तू नक्की
आवडली.
फारच छान!
हा हा मस्त!!! बिकांचे रसग्रहण
सुरेख!! खूप अर्थ दडला आहे या
खूप आवडून गेली कविता. छान!
फार सुरेख कविता...
मस्त
कविता म्हणून छान आहे, पण...
प्रभूजी, काय योगायोग आहे बघा!
बिपिनजी खरं आहे तुमचं...
योगप्रभू, जी साधी कविता आहे
फारच छान
वरच्या सर्वांशी सहमत
वरच्या सर्वांशी सहमत
गोंधळणारे .. घाबरणारे ..
छान आहे कविता. एकदम आवडली.
एकदम झकास कविता..
फार छान कविता. आवडली.
छानच कविता! प्रतिसादांमुळे
सुंदर अर्थगर्भ कविता!