Skip to main content

आमच्या घरातून दिसणारा सिंहगड... छायाचित्रे...

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 06/06/2008 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिंहगडापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर राहतो... नेहमीच दिसत नाही सिंहगड घरातून.... ती मागची डोंगराची रांग बर्‍याचदा ढगाच्या पडद्या आड असते... पण कधीतरी दिसतो.... पाऊस पडून गेल्यावर अधिक छान वाटतो...... सिंहगड ओळखायची सोपी खूण म्हणजे टीव्ही टॉवर...त्या नारळाच्या झाडाच्या वरतीच डाव्या बाजूला पार्किंगच्या वरच्या कड्याच्या दोन पायर्‍या आणि त्याच्यावर तो टीव्हीचा टॉवर... गडाच्या मध्यभागी सुद्धा अजून एक टॉवर आहे....हे दोन्ही टॉवर या फोटोत दिसत आहेत...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9565
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

छान निसर्ग आहे हो तुमच्या घराजवळ्...मस्त आलेत फोटो...

हा गडावर जाताना खडकवासल्याच्या पुढून काढलेला... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हा मोटारीच्या रस्त्याने वर जाताना .... भरून आलेलं आभाळ... ते दोन टॉवर... आणि बारकाईने पाहिलं तर खच्चून गर्दी दिसतेय रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची....... __________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

बारकाईने पाहिलं तर खच्चून गर्दी दिसतेय रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची ती घोरपड कुठे दिसत नाही हो...

छान फोटो आले आहेत. किती छान वाटत असेल ना तुम्हाला घरातुन हे दृश्य पाहताना.

सिंहगडदर्शन आवडले. कॅमेर्‍यापुढच्या दृष्यांमधून कॅमेर्‍यामागचा माणूसही दिसतो म्हणतात तो असा. :-)

छान फोटो काढले आहेत... आणि मजा आहे तुमची... सकाळी उठलं की सिंहगडाचं दर्शन... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

फोटो मस्तच. रोज सकाळी दर्शन म्हणजे खरोखरीच मजा आहे :) -- ध्रुव

फोटो आवडले.. सिंहगडचे अनेक ट्रेक,त्यातल्या गमती ,ती कांदाभजी ,दही ..सगळे आठवले. स्वाती

पावसाळ्यात गडावर गेलच पाहिजे अस वाटत आधीचे अनुभव आठवुन. पण गर्दीचा विचार करुन गप्प बसाव लागत. ह्या पावसाळ्यात जावच एकदा. :) छान फोटो आहेत. अवांतर : पहिल्या फोटोतील ढग फार छान आले आहेत. :) अतिअवांतर : मी त्या ढगात कुठे विजुभाउ दिसतात का ते बघत होतो. ;) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

तुम्ही सिंहगडला जाताना काढलेले फोटो जास्टी छान आहेत.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

हळूहळू झूमइन करत गेलेले सिंहगडाचे चित्रण आवडले! :) चतुरंग