Skip to main content

उभ्या उभ्या विनोदः कॅन्सास सिटी आणि आल्बनी (न्यू यॉर्क)

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 13/01/2011 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर ! येत्या शनिवारी (दि. १५ जानेवारी २०११) संध्याकाळी आम्ही 'उभ्या उभ्या विनोद' (अर्थात मराठीत 'स्टँड अप कॉमेडी'!) 'कॅन्सास सिटी - कॅन्सास' इथे सादर करत आहोत. त्याचप्रमाणे शनिवार (दि. ५ फेब्रुवारी २०११) ह्या दिवशी आम्ही 'आल्बनी - न्यू यॉर्क' इथे हा कार्यक्रम सादर करणार आहोत. कॅन्सास सिटी आणि आसपासचा भाग तसेच आल्बनी आणि आसपासचा भाग इथे राहणारे कुणी मिपाकर असतील आणि ते कार्यक्रमाला येणार असतील तर भेटायला नक्की आवडेल. कार्यक्रमाची वेळ इ. अधिक माहितीसाठी कृपया त्या भागातील मराठी मंडळांना संपर्क साधावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6045
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

कार्यक्रमास शुभेच्छा. माझी सिडनीत एक महत्वाची मिटींग आहे , त्यामुळे हे एकदोन महिने मी वेलिंग्टन - सिडनी दौर्‍यांवर असेन . चित्रे साहेब कार्यक्रमाची रेकॉर्डींग फ्लॉपी वर सेव्ह करुन क्रुरियर करा :) बेस्ट लक . - बीजी पांडे (लापतागंज)

In reply to by टारझन

ऑस्ट्रेलियात पूर आल्याचे समजते. पोहोण्याचे कपडे घेऊन जावेत, हा सल्ला! आणि हो, तिथे भारतीयांवर हल्ले होतात असे ऐकून आहे! बाकी उभ्या कट्ट्यास शुभेच्छा!

In reply to by सुनील

आणि हो, तिथे भारतीयांवर हल्ले होतात असे ऐकून आहे! ते रस्त्यावर चालताना होतात. रस्त्यावर पोहोताना होत नाहीत

In reply to by टारझन

अरे वा!!! तुम्ही पण परदेशात जाताय...आजकाल अशा जाहिरातींचं काँट्रॅक्ट घेतात असे काहीसे ऐकून आहे त्या सुविधेचा लाभ घेता आला असता...

In reply to by शिल्पा ब

परदेशात एका पायावर जायला तयार आहे. पण बायको मुली तयार नाहीत त्यांना हितंच आवडते. काय करणार? त्यामुळे बसलोय इथेच... :( तरीही वेळ आली तर येण्या आधी जाहिरातींचं काँट्रॅक्टचे टेंडर काढूच! तुम्ही आधीच विषय काढलेला आहे त्यामुळे प्रायोरिटी देऊच ;)

In reply to by निनाद

तो विषय शिल्पा ने काढलेला नाही. एखादा भाडोत्री गुर्जी बिर्जी बघायचा. तो मस्त लेखातुन पब्लिकसिटी करुन देतो. :) मिपालिक्स वाचत नाय काय तुम्ही ? चुकीच्या ठिकाणी चुकीची जाहीरात कराल तर फसाल :) - ( कन्सल्टंट ) टारेश पर्यायसुचवी

In reply to by टारझन

ते गुर्जी आणि मोठी मोठी विक्षिप्त मान्स! आपलं काम छोटं आपान संक्षिप्त मान्स! आपल्याला परवाडनार का भौ?

In reply to by निनाद

ते गुर्जी आणि मोठी मोठी विक्षिप्त मान्स! आपलं काम छोटं आपान संक्षिप्त मान्स!
"दुसर्‍याचं ते मोठं , आणि स्वतःचं ते छोटं " ह्या वैफल्यग्रस्त विचारसरणी ला माझ्या मानसोपचारतज्ञ डॉक्टर मित्राच्या मते इन्फेरियॉरिटी काँप्लेक्स असे म्हणतात. जालावर वावरताना आपलंच मोठं आणि आहे त्यापेक्षा २ इंच जास्त दाखवायचे असते हा बेसिक नियम लक्षात ठेवावा. हाच सल्ला ह्याच शब्दांत मिपा ज्येष्ठांकडुन ऐकला होता. जनकल्याणार्थ इथे देत आहे ;) - (जनहितचिंतक) जिहाद

In reply to by टारझन

सल्ल्य्या बत्तल धणुर्वात! जे नाही ते ऐनवेळेला दाखवायला जमले पाहिजे ना गुर्जी? जे आहे आणि जसं आहे ते संक्षिप्तच बरं आहे. आपण तेव्ह्ढ्यातच आनंदी आहोत.

In reply to by टारझन

त्यापेक्षा २ इंच जास्त दाखवायचे असते
हे काय टारु भौ, फकस्त २ इन्च. आजकाल ८-१० इन्चाचा जमाना आहे.

In reply to by निनाद

तुम्हाला उद्देशुन नाही लिहिलं पण आता विषय काढला आहेच तर , ते जर्मनीवाले म्हणजे जर्मन बायको, सासु सासरे, बाटलीतलं पाणी पित घरातुन दिसणारा डोंगर पहाणारे निनाद वेगळे का तुम्हीच आय डी बददला?

In reply to by शिल्पा ब

फाइव्ह स्टारवाले निनाद साहेब वेगळे हो! मी आपला चित्रपट ओळखवाला निनाद (बिल्ला नं. येगळा हाये आम्चा!)

In reply to by निनाद

हे मात्र खरे उच्च रहाणी व साधी विचारसरणी असे आमचे जीवनविषयक सूत्र आहे . बाकी उपक्रम चांगला आहे . तू नळी वर यायची . वाट पाहत आहे .ह्यात विनोदाचा दर्जा किती चांगला वाईट ह्यांचे मूल्यमापन करण्यापेक्षा परदेशातील आपले बांधव नवीन संस्कृती आत्मसात करताना दैनंदिन आयुष्यातील अनुभव मार्मिक रित्या व्यक्त करतात .तेव्हा तेथील त्यांच्या भाव विश्वाचे दर्शन घडते . सर्वात महत्वाचे म्हणजे मनातील भावना ओठावर येतात . त्याला दाद मिळते तेव्हा होणारा आनंद हि खरी कमाई

कार्यक्रमास शुभेच्छा. कार्यक्रमाची लिंक असेलकृपया द्या, त्याभागातील काही मित्रांना पाठवु शकेन.

दोन्ही कार्यक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा, संदीप!

५ फेब्रुवारीला आल्बनीला...

उभ्या उभ्या शुभेच्छा! नंतर लिंक द्या...

हार्दिक शुभेच्छा लिंक असल्यास जरुर द्या. उभ्या उभ्या हसुन घेऊ.

ब्बॉर! अजून एकदोन विनोद सांगितले असते उभ्या उभ्या तर आम्हीपण हसलो असतो उभ्याउभ्या. असो. उसातले लोक हसावेत अशी शुभेच्छा.

संदीप, शुभेच्छा! नंतर अनुभव लिही!

कार्यक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा :) शक्य झाल्यास परत आल्यावर तू-नळी वर व्हिडो चढवा.

कार्यक्रमाची लिंक द्या हो. बरीच नवी मंडळी आहेत त्यांना लाभ घेता येईल. कार्यक्रमास शुभेच्छा.

संदीप....तुझ्या आणि तुझ्या ग्रुपच्या सर्व सदस्यांसाठी दोन्ही कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या संपन्न व्हावेत यासाठी हार्दिक शुभेच्छा !! दोन्ही कार्यक्रमांचे इथे मिपावर 'रीपोर्टिंग' [लेख रूपात] अवश्य करावे. इन्द्रा

जो तो फक्त फु़कट व्हिडो बघायला मागतो... :( संदीपः पुण्या मुंबईत पण कार्यक्रम आहे का? मी येईन बघायला.

बाकी सर्व ठीक आहे हो (म्हणजे तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा, वगैरे वगैरे), फक्त ते 'स्टँड-अप कॉमेडी'ला तेवढे 'उभ्या उभ्या विनोदा'ऐवजी दुसरे काहीतरी म्हणता येईल का, प्लीज? नाही म्हणजे, मग प्रतिसादांतूनसुद्धा प्रत्येकजण मग उगाचच काही ना काहीतरी 'उभ्या उभ्या अमूकअमूक', 'उभ्या उभ्या तमूकतमूक' वगैरे म्हणू लागतो. म्हणजे एरवी तशी हरकत नाही, पण मग उगाचच आळंदीच्या वाटेवरच्या विस्मरणात गेलेल्या संत-संतीण जोडप्याची राहूनराहून आठवण येऊ लागते. बाकी चालू द्या.

In reply to by पंगा

बाकी सर्व ठीक आहे हो (म्हणजे तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा, वगैरे वगैरे), फक्त ते 'स्टँड-अप कॉमेडी'ला तेवढे 'उभ्या उभ्या विनोदा'ऐवजी दुसरे काहीतरी म्हणता येईल का, प्लीज?>> याच्याशी सहमत. उभ्या उभ्या विनोद हे नावच फार भयानक आहे. उद्या 'रॅपिड फायर राऊंड' ला "कचाकच प्रश्न" असं नाव दिलं नाही म्हणजे झालं.

In reply to by पंगा

हॅहॅहॅ बसल्या बसल्या केलेला विनोद आवडला. उभ्या उभ्या विनोदाला वाचून मलाही आळंदीच्या शेतातले गहू आठवले. कार्यक्रमाला शुभेच्छा.

कार्यक्रमासाठी शुभेच्छा! स्वाती

तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा!!! १५ लाच परदेशात (दुबैला) आलो त्यामुळे त्यादिवशीचा कार्यक्रम हुकला. आता शनिवार (दि. ५ फेब्रुवारी २०११) कसे जमवता येईल ते बघतो.