Skip to main content

त्री स्तरीय

प्रकाशित मुखपृष्ठ
धकधकत्या र्‍हदयाने किंवा धपापत्या उराने त्या बालेने प्रवेश केला. तारुण्याच्या तृष्णेने तरारलेल्या नजरेने सभोवतालच्या तरुणांनी तीला तस्मात तिष्ठयामी म्हणत तेरा तोफांची सलामी द्यावी त्या प्रमाणे नजरेनेच तहे दिलसे तृप्तीची पावती दिली. तिच्या एका नजरेने तरून जावे तरुतल निवास करण्याची त्यांची तयारी होती. लाखो दिलांच्या पायघड्यांवरून ती नाजूक पदन्यास करीत त्या आसनावर स्थापन झाली. ज्याला ती धुडकावेल त्यालासुद्धा ती त्याच्याशी बोलली याचे समाधान लाभायचे . तीच्या तीव्र स्वरात देखील त्याला तेजस्वी पंचमाचा भास व्हायचा त्या मदालसेच्या मैत्रीसाठी हपापलेले ते तरून तीचा शब्द हुकूम म्हणून झेलायला तयार होते. मंद मंद पदन्यास टाकत ती त्या गवतावरून चालत गेली तेंव्हा कित्येक तरुणांच्या अंगावर शहार्‍याची तृणपाती शहारली. तीला त्याची पर्वाच नव्हती. तिरक्या नजरेने तीने ते सारे न्याहाळले. मदांध मनाच्या मानकर्‍याना ती इकडेच येईल याची खात्री होती. ती आपल्याशी निदान तिरकस का होईन बोलेल याची आशा होती. त्रैलोक्यात चर्चा होईल त्रीभुवन गाजवेल असे सौंदर्य आपल्या कडे आहे याची तीला जाणीव होती. त्रैलोक्यातील त्रिपुर सुंदरी होऊ शकेल अशी गात्रे असलेल्या त्या गीर्वाण सुंदरीला याची जाणीव होती . तारुण्यसुलभ चंचल स्वभावाला तीच्या तीक्ष्ण बुद्धीने योग्य मुरड घातली होती. तृषार्ताची तहान भागवताना त्याच्याकडून काही अपेक्षा करायची नाही त्याच वेळेस त्याला उपकृत करायचे हा धडा तीने नाकारायचे ठरवले होते. तीच्या तीव्र बुद्धीला जे उमगत होते ते काही वेगळेच होते. महामंत्री तीव्रमती तीन दिवसांपासून काही वेगळेच घडवत होते. घडवंचीला चंचीत कोंडण्याचा त्यांचा डाव तीला उलथवून लावायचा होता. तेरड्याला त्रिविष्टपात पोहोचवायचे त्रांगडे सोडवायचे होते ( क्रमशः)

याद्या 3732
प्रतिक्रिया 30

लेखनप्रकार

>>( क्रमशः) संपादक मंडळाला विनंती : ईवलुश्या लेखानंतर "( क्रमशः)" टाकल्यास त्या लेखावर प्रकाश न टाकता दोन भाग जोडून एकदम प्रकाश टाकावा. विजूभौ टुमचा टिव्र णिषेढ.....एवढुस लिहून ( क्रमशः) टाकल्याबद्दल....

शुद्धलेखनावर मेहेनत घेणे आवश्यक. लंगोटीभर लेख पाहून मौज वाटली. कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. (लंगोटीभर लिहुन पानभर प्रतिक्रिया हवी काय?)

In reply to by अवलिया

लंगोटीभर लेख पाहून मौज वाटली असो. कुणाची लंगोटी किती मोठी आहे याचे त्रैराषीक कशाला मांडताय नाना ? त्रागा करणे बरे नव्हे त्याने त्रासच होतो.

In reply to by विजुभाऊ

प्रतिक्रिया देत बसण्यापेक्षा पूढचा भाग लिहायचा होता. अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

In reply to by अवलिया

श्री राजकुमार , श्री नाना , आपली करामत पाहिली. अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले. - एकनाथ कांबळे

शप्पथ सांगतो ... (आंतरजालीय) आयुष्यात पहिल्यांदाच एखादा लेख 'अजिबात न कळल्याची' घटना आज घडली, ज्याम ज्याम फ्रस्ट्रेशन आले आहे. असो, प्रयत्न चालु आहेत, पुढच्या भागात लिंक लागु शकेल. - ( एकेकाळचा सर्वज्ञ ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

=)) =)) =)) =)) =)) अर्थात कोणाला काय कळावं हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही. मी माझं एक निरिक्षण नोंदवलं :) - (चोता दोन चा फॅन) टारझन

In reply to by टारझन

श्री. छोटा डॉन, श्री. टारझन, श्री. अवलिया, गेल्या काही दिवसात काही जुन्या सदस्यांनी असेच लंगोटी धागे काढले आणि त्यांना जुने आणि नवे सभासद त्यांच्या स्टाईलमध्ये "उत्तम लज्जारक्षण" करत आहेत. त्यात काही नवल नाही. तुम्ही मात्र संघ बदललेला पाहून मौज वाटली. कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

चुकुन त्री-स्तरिय च्या ऐवजी 'स्त्री-स्तरीय' असे वाचले ;)

In reply to by अन्या दातार

आपली करामत पाहिली. अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले. अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

खत्तरनाक प्रतिसाद बिका , जियो ... अए असुरा , तुला काम्पिटिशन आली रे .. :) अर्थात असुराने कोणाला कॉम्पिटिशन द्यावी हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी माझे एक निरिक्षण नोंदवले.

In reply to by टारझन

आपली करामत पाहिली. अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले. अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

अहमदाबादेत थंडी खुप वाढलेली दिसतेय.

विजुभौ, हि काय सस्पेन्स स्टोरी आहे का? आनि एवढेसेच लिहिलेत? जास्त लिहा ना जरा घडवंचीला चंचीत कोंडण्याचा त्यांचा डाव तीला उलथवून लावायचा होता. तेरड्याला त्रिविष्टपात पोहोचवायचे त्रांगडे सोडवायचे होते >>>> घडवंची,त्रिविष्टपात हे काय त्रान्गडे आहे सान्गाल का? म्हन्जे पुढील भाग कळेल

In reply to by विजुभाऊ

स्टूल सादृष वस्तु
आणि स्टुल म्हणजे ते डॉक्टर लोकं स्टुल सॅम्पल पॅथॉलॉजी लॅब मधुन टेस्ट करुन घ्यायला लावतात तेच काय?

In reply to by टारझन

तरीच परवा पराकडे कूणीतरी स्टुल मागितलं तर त्याने माझे स्टुल बुटके आहे आणी सध्या बिका बसला आहे त्यावर, तुम्ही समोरुन घ्या त्यांचे उंच आहे अस्से काहिस्से सांगित्तले

In reply to by अवलिया

बहुदा उंची तुम्ही स्टुल कसा ठेवता त्यावर अवलंबुन असावी :) कुतुबमिनार सारखा स्टुल असेल तर तो उंचंच असेल :) मात्र पेंटॅगॉन सारखा असेल तर बुटका असेल :)

In reply to by अवलिया

आपली करामत पाहिली. अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले. अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

In reply to by विजुभाऊ

घडवंची = बैठक , स्टूल सादृष वस्तु >>>मग घडवंचीला चंचीत कोंडण्याचा त्यांचा डाव तीला उलथवून लावायचा होता. >>> म्हन्जे काय? तेरड्याला त्रिविष्टपात पोहोचवायचे त्रांगडे सोडवायचे होते >>>त्रिविष्टपात म्हन्जे कसला पात हे पन सान्गा

असे गूढ प्रवचन दिलेत तर आसारामबापूंची जागा तुम्हालाच.