'पाकनिष्ठ' कांदा, लुडबूडतो कशाला?
भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला
उध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला
कांदा पुसे रडूनी, कांद्यास अक्कलेच्या
तो ’पाकनिष्ठ’ कांदा, लुडबूडतो कशाला?
चेचून वेदनांना, पायात गाडले; पण
स्वप्नात भूत त्यांचे, रेंगाळती उशाला
दचकून जाग येते, निद्रा लयास जाते
ते घाव प्राक्तनाचे, छळती क्षणाक्षणाला
सोडून भूतळाला, ती दैत्य जात गेली
देऊन दान वृत्ती, या सभ्य माणसाला
ना झाकते कधी ती, वस्त्रात अंग सारे
मिळणार भाव कैसा, शेतीत कापसाला?
समजून घे "अभय" तू नाहीत भ्याड सारे
निपजेल शूर येथे, विश्वास दे उद्याला
गंगाधर मुटे
...............................................
वाचने
2843
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख !!! समजून घे "अभय" तू
छान फार्मात आहात .सुरेख
असेच म्हणतो.
In reply to छान फार्मात आहात .सुरेख by प्रकाश१११
:-)
वाचला.
In reply to :-) by सहज
पूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे.
In reply to वाचला. by गंगाधर मुटे
हॅ हॅ हॅ
In reply to पूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे. by अवलिया
अजुन थोडीशी भर...
In reply to हॅ हॅ हॅ by सहज
लेख वाचला.
In reply to :-) by सहज
आवडली.
भाजून पीक सारे, पाऊस तृप्त
भाजून
भाजून पीक सारे, पाऊस तृप्त
होय.
In reply to भाजून पीक सारे, पाऊस तृप्त by यशोधरा
खणखणीत आहे. भाजून पीक सारे,