केतकीच्या बनी तिथे...
(कृपया येथे ऐका)
१९७०-७५ चा काळ असावा तो. किंवा ७०चं दशक म्हणुया. संध्याकाळी पावणे सात की सात वाजता आकाशवाणी मुंबई 'ब' वर केवळ १५ मिनिटांचाच मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागायचा. त्यात हे गाणं अगदी हटकून ऐकायला मिळायचं. घरोघरी पर्वचा, रामरक्षा, शुभंकरोतिचे संस्कार होते तेव्हा. संध्याकाळचा सात-साडेसातचा सुमार असायचा. घरोघरी आमटीभाताचे कुकर लागलेले असायचे. भाजी असलीच तर सकाळची असायची. सोबत फार फार तर कोशिंबिर. अगदी चैन म्हणजे पापड-कुर्डया..!
'केतकीच्या बनी तिथे..!'
खूप साध्यासुध्या जमान्याची मर्मबंधातली ठेव सांगणारं हे गाणं...!
काय सांगावं सुमनताईंच्या आवाजाबद्दल? अगदी सुरेल, हळवा अन् थेट हृदयाला भिडणारा आवाज आणि गायकी. अशोक पत्की या अत्यंत गुणी माणसाचं संगीत. काय आहे हो या गाण्यात? धांगडधिंगा करणारा रिदम? शंभर वाद्यांचं कडबोळं? गायिकेचा वा संगीतकाराचा एस् एम् एस् चा जोगवा? नाही. यातलं काहीही नाही...! परंतु तरीही हे गाणं खूप मोठं वाटतं, आपलं वाटतं आणि बरंच काही सांगून जातं..!
'गहिवरला मेघ नभि सोडला गं धीर..' ची जी सुरावट आणि गायकी आहे ना, त्याकरता खरंच शब्द नाहीत..! आटोपशीर ठेका, दोन कडव्यातली तबल्याची लग्गी, बासरीचे तुकडे, सुमनताईंची गायकी.. सारंच सात्विक परंतु तेवढंच सुरेख..!
आज 'ऐका दाजिबा', 'गारवा', एस् एम् एस् च्या जीवघेण्या स्पर्धा, शोबाजी, हा आल्बम-तो आल्बम, सारं काही आहे..परंतु 'केतकीच्या बनी तिथे..' चा गोडवा, आपलेपणा कुठेच नाही..!
-- तात्या अभ्यंकर.
![]() |
वाचने
7368
प्रतिक्रिया
19
मिसळपाव

प्रतिक्रिया
लेख आवडला.
तात्याजी मान गये.. गाणे
हे गाणं आवडत नाही असा माणूस
तात्यांनू काय आठवणी काढल्यात! लै भारी
तात्या..
>> सुमनताई म्हणजे
क्या...बात है..
छान
तात्या, नॉस्टालजीक केलेस
अतिसुंदर लेख...
गाणं शिकायला सुरूवात केली
तात्या अरे असं करु नकोस...
काय बोलु? शब्दच नाहीत.
क्या बात है|
नितांत सुंदर गाणं. तात्या,
वा मी आजच सकाळी सगळी सुमन
छान गाणं तसेच अतिशय छान
हेच हेच म्हणेन मीही. मला ना
In reply to छान गाणं तसेच अतिशय छान by ५० फक्त
सर्व प्रतिसादी रसिकवरांचे