बायको : नागपुरी तडका
बायको : नागपुरी तडका
थोडीशी पगली, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥१॥
सलवार घाल म्हनलं तं नववारी घालते
कपाळाच्या मंधामंधी गोल कुंकू लावते
टिकल्या-मिकल्या लावाच्या फ़ंदात पडत नाही
गळ्यामंधी गुंजीभर सोनं मिरवत नाही
थोडशी येडपट, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥२॥
सिनेमा पाहू म्हनलं तं भागवतात जाते
माह्यासाठी मुठभर शिरनी घेऊन येते
मास-मच्छी-अंडीले हात लावत नाही
तरी बाप्प्पा तीले काही देव पावत नाही
थोडीशी भोळसट, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥३॥
सार्यायले खाऊ घालून, उरलंसुरलं खाते
कवाकवा पानी पिऊन तशीच झोपी जाते
सडासारवन, धूनंपानी, अभय सारं करते
पहाटपासून रातपावतर मरमर मरते
थोडीशी कष्टीक, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥४॥
गंगाधर मुटे
-------------------------------------------------
शीरनी = प्रसाद, सायको = Psycho
-------------------------------------------------
लेखनविषय:
याद्या
5634
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
सार्यायले खाऊ घालून,
नागपुरी बायको
अय रुपाली....आम्ही सुढ्हा
In reply to नागपुरी बायको by रुपाली प्रा॑जळे
भाग्य!
तडका नेहमीप्रमाणेच खुमासदार.
In reply to भाग्य! by श्रावण मोडक
हे भाग्य कुठून येतं हे सांगा,
In reply to तडका नेहमीप्रमाणेच खुमासदार. by नगरीनिरंजन
छानच
कविता मस्त सार्यायले खाऊ
लय बेस
हे नशीब कुटी भेटते ते
In reply to लय बेस by नीलकांत
धन्यवाद.
अक्षरशः माझ्याच बायकोचे वर्णन
नकुचा .अचरटपणा. सुरुच आहे का
In reply to अक्षरशः माझ्याच बायकोचे वर्णन by नरेशकुमार
अहो पर्नल दिदि, का असे
In reply to नकुचा .अचरटपणा. सुरुच आहे का by पर्नल नेने मराठे
वा माहाराजा
भारतीय स्त्रीचे रूप.
In reply to वा माहाराजा by मोहन
जेथे दुसर्याच्या ताटातील
In reply to भारतीय स्त्रीचे रूप. by गंगाधर मुटे
खरे तर मला मधि पडन्याचे काहि
In reply to वा माहाराजा by मोहन
छान...