एकटेपण...!
माणसाला सगळ्यात जास्त भिती कशाची वाटत असेल …..मरणाची ?? अं हं……चुकलात…. !! अहो… एकटेपणाची. बाकी कुठल्याही संकटाला तो तोंड देऊ शकतो पण एकटं राहण्याची वेळ आली तर मात्र तो ढेपाळतो. किंबहुना ह्या गोष्टीचा तो विचार करणंही टाळतो.
कधी कधी गोंधळ, गर्दीचा इतका वैताग येतो की असं वाटतं दूर दूर पर्यंत कोणीच दिसायला नको, जवळ असायला नको. एकांत हवा. पण एकांत आणि एकटेपणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकांत सुद्धा काही वेळापुरताच हवासा वाटतो. नंतर त्या एकांताचं रुपांतर एकटेपणात होतं आणि मग तो नकोसा होतो. लहानपणी तर आपल्याला कायम कोणीतरी सोबत खेळायला हवं असतं शिवाय आई, बाबा सुद्धा हवे असतात. तरुणपणी आपला चॉईस बदलतो पण सोबत लागतेच. म्हातारपणी तर सोबत गरजच बनते. उतारवयातल्या एकटेपणाला घाबरुनच तर आपण तरुणपणात लग्न, संसार, मुलं, बाळं ह्यात स्वत:ला अडकवून घेतो. सोबत नेहमीच एक सुरक्षिततेची भावना देते…. मग ती कोणत्याही वयात असो.
कुठल्याही आनंदाच्या क्षणी किंवा कुठल्याही दु:खाच्या क्षणी आपण एकटं राहणं टाळतोच. आनंदाच्या परमशिखरावर असतांना सुद्धा तो आनंद उपभोगायला आपल्याला कोणीतरी सोबत हवं असतंच. एकटं आनंदी कसं राहू शकणार ? लॉटरीचं तिकीट लागलं….. खूप पैसे मिळाले…. पण पुढे काय ? त्या पैशाचं सुख कुणाच्या तरी सोबतीनंच लाभेल ना…!! मग ती सोबत कुणाचीही असो. कधी कधी सगे, सोयरे नसले तर माणसं चक्क कुत्री, मांजरी पाळतात. त्यांच्या सोबत आपला आनंद वाटतात. पण एकटेपण टाळतात.
दु:खातही रडायला कुणाचा तरी खांदा लागतोच. खचलेल्या मनाला उभारी द्यायला कुणीतरी लागतंच. आपल्यासाठी कुणीतरी रडणारं असावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि तसं माणूस मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर झटतो. आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच जातो हे जरी अंतिम सत्य असलं तरी जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपण कायम सोबतीसाठी धडपड करतो. त्याच धडपडीत आयुष्य संपतं. संसार, संसार म्हणजे तरी काय असतं ? आपण आपल्या लोकांचं विश्व तयार करतो आणि त्यांना आनंद, समाधान देण्यासाठी कष्ट करतो. कुठलंही काम करतांना सुद्धा शेवटी काम झाल्यानंतर कुणीतरी ते बघून पसंतीची पावती देणं हे ही तितकंच आवश्यक असतं. त्यासाठी ही कुणीतरी लागतंच. शारिरीक भुकेसारखी मानसिक भूक पण असतेच आणि ती भूक भागवायला कोणीतरी सोबत लागतेच. एकटेपण खायला उठतं. त्या पायी वेड लागायची पाळी सुद्धा येते. आपण कितीतरी सेलीब्रेटीजची उदाहरणं बघतो. सेलीब्रेटीज कशाला सामान्य माणूसही माणसांचा भुकेला असतो. “माणसात असणं” हेच मुळी नॉर्मल माणसाचं लक्षण मानल्या जातं.
एकला चोलो रे……. हे म्हणायला ठीक आहे. पण आचरणात आणायला तितकंच कठीण आहे. एकटेपणावर उपाय शोधण्याचे आपले सतत प्रयत्न सुरु असतात. पण एका ठराविक वेळेनंतर त्यावर कुणाची तरी सोबत हा्च एकमेव उपाय असतो. एकटं असतांना आपण नेटवर जरी असलो तरी तिथेही आपण माणसंच शोधत असतो. माणूसपण शोधत असतो. माणूस म्हटलं की त्यात कळप आलाच. जनावरंच फक्त एकटी राहू शकतात. एकटेपण म्हणजे भयाण रात्र, एकटेपण म्हणजे रखरखीत वाळवंट ! असं एकटेपण जगात कुणाच्याही वाट्याला न येवो !
याद्या
7617
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
खरच आहे जयवी.मी आत्ता अशाच
भाग्यश्रीताई हा काळ एकाकी
In reply to खरच आहे जयवी.मी आत्ता अशाच by भाग्यश्री कुलकर्णी
भाग्यश्री, काळ हेच औषध आहे.
In reply to खरच आहे जयवी.मी आत्ता अशाच by भाग्यश्री कुलकर्णी
माणसाला सगळ्यात जास्त भिती
In reply to भाग्यश्री, काळ हेच औषध आहे. by रेवती
ह्म्म... म्हणुनच तरुण वयात
सहमत आहे!
In reply to ह्म्म... म्हणुनच तरुण वयात by पर्नल नेने मराठे
प्रत्येक शब्दाशी सहमत...!!!
In reply to सहमत आहे! by स्वैर परी
लेख सुंदर आहे. विषयाशी थोडी
हे खरे आहे, एकटेपणाचे अॅडीक्शन येऊ शकते.
In reply to लेख सुंदर आहे. विषयाशी थोडी by गवि
गवि, आत्मशुन्य यांच्याशी
In reply to हे खरे आहे, एकटेपणाचे अॅडीक्शन येऊ शकते. by आत्मशून्य
+१
In reply to लेख सुंदर आहे. विषयाशी थोडी by गवि
लेख आवडला , पण ...
सहमत!!!
In reply to लेख आवडला , पण ... by मनीषा
उगाच
.
अरे मुलांनो, एकटेपण म्हणजे
.
In reply to अरे मुलांनो, एकटेपण म्हणजे by जयवी
"नो मॅन इज अॅन आयलँड!"
In reply to . by आदिजोशी
मला वाटतं... ज्याला मनुष्य
In reply to "नो मॅन इज अॅन आयलँड!" by मेघवेडा
आजीबाइ आणी मेघवेडा साहेब ,मला वाटतेय एकटेपणा आणी स्वातंत्र्य
In reply to अरे मुलांनो, एकटेपण म्हणजे by जयवी
सात वर्षं एकटा खोली घेऊन
लेख छान लिहिलाय. कधी कधी नको
Being alone is good for Spiritual Development
ह्म्म्म्म्म्म !!
In reply to Being alone is good for Spiritual Development by वाहीदा
जरा उलगडून सांगाल का तुम्हाला
In reply to ह्म्म्म्म्म्म !! by अर्धवटराव
मी कुठे दावा केलाय ??
In reply to जरा उलगडून सांगाल का तुम्हाला by शिल्पा ब
लेख आवडला. एकटेपणा हा जर
मलाही एकटेपणा नाही आवडत. "मला
<<<'एकांतवासाची शिक्षा' हाही
In reply to मलाही एकटेपणा नाही आवडत. "मला by रेवती
'एकांतवासाची शिक्षा' हाही एक
In reply to मलाही एकटेपणा नाही आवडत. "मला by रेवती
एकांतवासाची शिक्षा' हाही एक
In reply to 'एकांतवासाची शिक्षा' हाही एक by प्राजु
एकटेपणा मानण्यात.
When you need some one
बर्याचदा असं अनुभवास येतं
In reply to When you need some one by पर्नल नेने मराठे
मी या नियमाला अपवाद
In reply to When you need some one by पर्नल नेने मराठे
आपण असं म्हटलं तर जास्त योग्य
जनावरंच फक्त एकटी राहू
एकटेपण स्वखुशीने स्विकारलं तर
कधिकधि बायको शनिवरी तिच्या
ह्म्म... एकटेपणा लयं वाईट्ट