✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्त्रीमुक्ती - विस्कळीत विचार

च
चित्रा यांनी
Mon, 01/10/2011 - 22:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29801 वाचन

💬 प्रतिसाद (161)

प्रतिक्रिया

स्वातंत्र्याची व्याख्या आवडली.

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 01/10/2011 - 22:43 नवीन
लेख आवडला आणि स्वातंत्र्याची व्याख्याही! चित्राताई, जी कथा एकत्र कुटुंबात रहाणार्‍या तुझ्या आईची होती ती विभक्त कुटुंबात रहाणार्‍या माझ्याही आईची होती. माझा फ्शेजारचं कुटुंब सोहोनींचं, काका बाबांचे शाळेतले मित्र आणि काकू आईची शाळेतली मैत्रीण. काका आणि बाबा अनेकदा फक्त गप्पा मारत एकत्र दिसायचे पण काकू आणि आईला एकत्र बसून गप्पा मारताना मी कधीच पाहिलं नाही. आईच्या काहीतरी शिवण आणि काकूच्या हातात तिचं निवडायचं धान्य अशाच प्रकारच्या नेपथ्यात गप्पा झालेल्या मी पाहिलेल्या आहेत. "शेजारच्या फ्लॅटमधे रहाणार्‍या मैत्रिणीलाही निवांतपणे भेटता येऊ नये", असं आयुष्य मला नको असं मी अगदी लहानपणापासून स्वतःला समजावत आले. अवतरणातले शब्द खूप उशीरा सुचले आणि समजले असतील; पण अशाच प्रकारचा विचार करायला बाबांनी मला उद्युक्त केलं याबद्दल मी बाबांची अतिशय ऋणी आहे.
  • Log in or register to post comments

लेखातील विचारांना सहमती आहे

रेवती
Mon, 01/10/2011 - 23:35 नवीन
लेखातील विचारांना सहमती आहे हे सांगावे सुद्धा लागू नये इतका मुद्देसूद आणि वैचारिक लेख लिहिल्याबद्दल चित्राताईचे अभिनंदन! मीही एकत्र कुटुंबात वाढलेली असल्याने सगळे काही जणू डोळ्यासमोर घडत होते. तरीही एका विशिष्ट पातळीवर त्या स्त्रिया समान होत्या. जातीधर्मांच्या चौकटी आपोआप गळून पडल्या कारण त्या स्त्रिया सुख दु:खाच्या धाग्याने बांधल्या होत्या किंवा आजही आहेत. आईला कधीही तिच्या बाईपणाची चौकट मान्य नव्हती पण त्या काळी इलाज नव्हता. "हे असं आयुष्य तुम्ही जगु नका." असं सारखं सांगत रहायची पण 'कसं जगा' हे तिलाही माहित नसल्याने मलाही उशिरानेच समजलं. जेंव्हा समजलं त्यावेळी मते खूप टोकदार झाली होती. अजूनही साध्यासुध्या जुन्या पद्धतीने वागणार्‍या आणि माझ्यामते 'सहन' करणार्‍या मुलींचे आणि माझे एक मिनिटापेक्षा जास्त जमत नाही. यातही (प्रामुख्याने उच्चशिक्षित) मुली स्वत:च स्वत:च्या वेळेवरचा अधिकार अमान्य करताना पाहिल्या कि संताप येतो. दुसरी बाजू अशी आहे कि आपली कर्तव्ये नीट समजली कि अधिकाराची समज आपोआप येत जात असावी. मला अजूनही एखाद्या सखीशी दहा पंधरा मिनिटे गप्पा माराव्याश्या वाटतात. तसे करणे जमत नाही हे खरे!
  • Log in or register to post comments

एक चाक !!

अर्धवटराव
Mon, 01/10/2011 - 23:35 नवीन
संसाराचा गाडा स्त्री-पुरुष या दोन्ही चाकांवर चालतो म्हणतात. पण अ‍ॅट लीस्ट आपल्या भारतीय समाजात "स्त्री" चाकावर सोशीकपणाचा भार जास्त देण्यात आला आहे. आजच्या आधुनीक काळात समाजाने (यात स्त्री-पुरुष दोघेही आलेत) स्त्रीयांची हि घुसमट समजुन घेउन त्यावर योग्य तो प्रॅक्टीकल उपचार केला तर(च ?) आपली कुटुंब व्यवस्था अधीक बळकट आणि आनंददायी बनेल... (कौटुंबीक) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

....स्त्रीयांची हि घुसमट

अनामिक
Mon, 01/10/2011 - 23:59 नवीन
....स्त्रीयांची हि घुसमट समजुन घेउन त्यावर योग्य तो प्रॅक्टीकल उपचार केला तर(च ?).... माझा ह्या समाजाने ह्या शब्दावरच आक्षेप आहे. आपण समाजाने, सरकारने असे शब्द वापरुन आपल्यावरची जबाबदारी सोयीस्करपणे टाळतो (अर्धवट, कृ. व्यक्तिशः घेऊ नका). वर चित्राताई म्हणते त्याप्रमाणे प्रत्येकालाच येणार्‍या प्रत्येक क्षण कसा जगायचा त्याचं स्वातंत्र्य असायला हवं. स्त्री सुशिक्षीत असो की अशिक्षीत, तिच्याकडून कायमच भरपूर अपेक्षा केल्या गेल्या आहेत. तुला जे करायचं ते कर, पण नवर्‍याची, घराची जबाबदारी सांभाळून! म्हणजे काय की एकीकडे स्वातंत्र्य द्यायचं, पण ते करताना तिच्या आधीच्या जबाबदार्‍यांमधे काहीच सूट नाही. मग स्त्रीने तारे वरची कसरत करत नेहमीचं रडगाणं गात रहायचं. सरकारने/समाजाने आरक्षण देऊन, वेगवेगळ्या सुविधा निर्माण करुन खूप काही उपयोग होईल असं वाटत नाही. सुरवात ही घरी व्हायला हवी. घरातली स्त्री गृहिणी का असेना, तिने काय करावं, कसं वागावं, कसं जगावं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य जरी तिला मिळालं तरी खूप बदल होईल. चित्राताईची स्वातंत्र्याची व्याख्या चपखल आहे आणि आवडली सुद्धा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

समाज !!

अर्धवटराव
Tue, 01/11/2011 - 00:42 नवीन
अनामिक, तुमचा आक्षेप समजतोय. म्हणुनच मी मुद्दाम 'भारतीय समाज' शब्द वापरला. मुळात स्त्रीयांवर ही वेळ का आली? स्त्रीला तिचे क्षण तिच्या इच्छेने जगण्यावर बंधने कशी आणि कोणि टाकली? प्रत्येकाने त्याचा/तिचा वेळ कसा घालवायचा हे ठरवताना त्या व्यक्तीला समाजानेच किती व्यक्तीगत स्वातंत्र्य दिलय ? समाजाने, सरकारने स्त्रीस्वातंत्र्यावर कायदे करण्याचा वा आरक्षण देण्याचा मुद्दा नाहिये. तर समाज म्हणा, कुटुंब म्हणा, आपली चौकट विस्तारायला तयार आहे का हा प्रश्न आहे. नाहि तर एखाद्-दुसरी स्त्री, जी आपले स्वातंत्र्य जपण्याची हिम्मत दाखवु शकेल, तीच फक्त स्वातंत्र्य उपभोगु शकेल... ते हि हजार कटकटींना तोंड देत देत... अर्धवटराव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

नोकरी

अन्या दातार
Tue, 01/11/2011 - 19:22 नवीन
नोकरी करताना मला आलेला एक अनुभव मी सांगतो. मित्राच्या लग्नासाठी मी बाहेरगावी गेलो होतो. माझा जॉब पर्चेसचा असल्याने सप्लायर्सशी फॉलो-अप घेणे हे माझे काम होते. पण मी कायदेशीर रजा घेऊन बाहेर गेलो तेंव्हासुद्धा मला माझा जॉब (अर्थातच माझ्या स्वतःच्या फोनवरुन) करावाच लागला. मग आता मला सांगा; मी कायदेशीररित्या रजा घेऊन बाहेर माझे स्वातंत्र्य उपभोगत असूनही मला कामातून अंग बाजूला करता आले का? माझी जबाबदारी संपली का? तात्पर्यः नोकरीत कुणाचीही (रिस्पेक्टीव्ह) जबाबदारी कुठल्याही सबबीखाली संपत नाही. याचप्रकारे, जेंव्हा कुटुंबात घरची आणि बाहेरची अशी कामाची विभागणी असेल तर स्त्रीची (नवरा बाहेर काम करतो हे गृहित धरले आहे) जबाबदारी कशी संपते? जेंव्हा आजारपण/बाळंतपण/माहेरपण अशा वेळेस नवरा घेईलच का नाही सांभाळुन? जेंव्हा बायकोसुद्धा बाहेर जॉब करत असेल तर मात्र नवरा-बायकोने काही जबाबदार्‍या वाटून घेतल्या पाहिजेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

अहो पण तुम्हाला त्या गोष्टीचा

पक्या
Wed, 01/12/2011 - 06:31 नवीन
अहो पण तुम्हाला त्या गोष्टीचा पगार मिळतो की. बाई नोकरि करीत नसली आणि घराची जबाबदारी तिच्यावर असली तरी त्यातून कधीतरी सुट्टी मिळते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

पगार हा एक प्रकारचा बेनेफिट आहे

आजानुकर्ण
Wed, 01/12/2011 - 18:05 नवीन
पगार हा एक प्रकारचा बेनेफिट आहे. तशाच प्रकारचा बेनेफिट स्त्रियांना सुरक्षितता, घरबसल्या आरामदायी जीवन, दगदगीच्या प्रवासापासून सुटका, कार्यालयीन कामाच्या ताणतणावांपासून मुक्तता अशा स्वरुपात मिळतोच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

घी देखा....

नितिन थत्ते
Wed, 01/12/2011 - 21:45 नवीन
स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांतून एकाची निवड करायची वेळ येते तेव्हा बरेच लोक सुरक्षितता निवडतात आणि स्वातंत्र्य सोडून देतात. पण स्वातंत्र्य गेले की सुरक्षितता जातेच* हे बर्‍याच उशीरा लक्षात येते. *सुरक्षितता जातेच कारण ती आता स्वातंत्र्य ज्याच्याकडे सरेंडर केले त्याच्या मर्जीवर अवलंबून असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

म्युच्युअली एक्सक्लुझिव

आजानुकर्ण
गुरुवार, 01/13/2011 - 11:59 नवीन
स्वातंत्र्य आणि सुरक्षितता या गोष्टी म्युच्युअली एक्सक्लुझिव असाव्यात असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

तेच तर...तसं वाटत नाही. पण

नितिन थत्ते
गुरुवार, 01/13/2011 - 13:15 नवीन
तेच तर...तसं वाटत नाही. पण असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

म्युच्युअली एक्सक्लुझिव

आजानुकर्ण
गुरुवार, 01/13/2011 - 11:59 नवीन
स्वातंत्र्य आणि सुरक्षितता या गोष्टी म्युच्युअली एक्सक्लुझिव असाव्यात असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

मोकळेपणाने सांगितलेले अनुभव

धनंजय
Mon, 01/10/2011 - 23:49 नवीन
चित्रा यांनी मोकळेपणाने सांगितलेले अनुभव मोलाचे आहेत. नेमकी कुठल्या विचारांना चालना मिळते आहे, ते चक्र अजून चालूच आहे. त्याबद्दल विस्कळित विचार - स्वातंत्र्याची व्याख्या जशी केलेली आहे, ती पटण्यासारखीच आहे - "आयुष्यात मिळालेल्या क्षणोक्षण काळात काय करावे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असावे. असे बहुतेक क्षण स्वत:च्या मनाविरुद्ध काढणे याचा अर्थ जवळजवळ संपूर्ण आयुष्य मनासारखे न जगता येणे." लेखिकेला पूर्ण जाणीव आहे, की समाजात परस्पर-आश्रित म्हणून जगायचे, म्हणजे प्रत्येकाला काही क्षण पर(स्पर)-तंत्राच्या कंटाळवाण्या कार्यात घालवावे लागतातच, उर्वरित क्षणच तितके स्व-तंत्र वागण्यासाठी मिळतात. स्त्रीमुक्ती (किंवा कुठल्याही समूहाची मुक्ती) व्हायची गरज आहे, हा विचार केव्हा येतो? स्त्रियांना (किंवा त्या कुठल्याही समूहातल्या व्यक्तींना) जितक्या मोठ्या प्रमाणात काळ नकोशा किंवा कंटाळवाण्या पर(स्पर)-तंत्राच्या कार्यात घालवावा लागतो, तितका पुरुषांना (किंवा त्या समूहावेगळ्या बहुसंख्य व्यक्तींना) घालवावा लागत नाही, त्यांना स्वतंत्र वेळ अधिक मिळतो. समाजात उपलब्ध असलेला मर्यादित स्वतंत्र वेळ लोकांनी अधिक समसमान वाटून घ्यावा हेच न्यायाचे आहे ना? असा प्रश्न लेखिका विचारत आहेत असे वाटते. आणि न्यायाचे आहे, हे मी मान्य करतो. - - - (दोन बारीक तपशिलाबाबत स्पष्टीकरण : १. मराठी कथालेखकांनी आजूबाजूच्या विसंगतीकडे दुर्लक्ष न करता त्याबद्दल लिहीत जावे, पण लेखन कंटाळवाणे असू नये ही काळजी घ्यावी, असा काही शेवटच्या परिच्छेदाचा मथितार्थ आहे काय? २. घरकामाचा वाटप हा दुय्यम आहे, कारण समसमान मिळकत, शिक्षण आणि स्वतंत्र वेळेचे मोल मनात रुजल्यावर या गोष्टी आपोआप येतात, असा मथितार्थ आहे काय? असे मथितार्थ असल्यास ते पटण्यासारखेच आहेत.)
  • Log in or register to post comments

अजून स्पष्ट करते

चित्रा
Tue, 01/11/2011 - 00:16 नवीन
समाजात उपलब्ध असलेला मर्यादित स्वतंत्र वेळ लोकांनी अधिक समसमान वाटून घ्यावा हेच न्यायाचे आहे ना? माझे मत एवढेच आहे, की स्वातंत्र्य म्हणजे मला माझा वेळ कसा घालवायचा आहे त्याची निवड करता यावी. ती मूल्ये समाजात रुजावीत. मूल्ये कशी रुजणार? तर या विषयांवरील लेखन होत रहावे. केवळ काही लेखक लेखिका कंटाळवाणे, रटाळ, लिहीत राहतात म्हणून हे विषय महत्त्वाचे नाहीत, अशी भावना मनात रुजू नये. मराठी कथालेखकांनी आजूबाजूच्या विसंगतीकडे दुर्लक्ष न करता त्याबद्दल लिहीत जावे, पण लेखन कंटाळवाणे असू नये ही काळजी घ्यावी, असा काही शेवटच्या परिच्छेदाचा मथितार्थ आहे काय? नाही. अनेक लेखकांचे या विषयावरचे लेखन कंटाळवाणे आहे असे (खरे जरी) वाटत असले तरी त्यावर केवळ लक्ष केंद्रित करून या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये, कारण रटाळ, कंटाळवाणे लेखन मासिका पाक्षिकांमध्ये वाचायला लागणे हे जेवढे अन्याय झाल्यासारखे वाटू शकते त्यापेक्षा समाजात घडत असलेला व्यक्तींवरील अन्याय हा शेकडो पटींनी अधिक जाचक आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे मासिका-पुस्तकांवरील लेखनामुळे टीका करून या विषयाचे ट्रिवियलाजेशन करू नये. घरकामाचा वाटप हा दुय्यम आहे, कारण समसमान मिळकत, शिक्षण आणि स्वतंत्र वेळेचे मोल मनात रुजल्यावर या गोष्टी आपोआप येतात, असा मथितार्थ आहे काय? होय, असाच अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

लेख आवडला. संयत वाटला.

शुचि
Tue, 01/11/2011 - 00:30 नवीन
या विषयावर माझा स्वतःचा खूप मानसिक गोंधळ आहे हे मी कबूल करते. बरेचदा नवर्‍यापेक्षा घरातील सासरकडचा स्त्रीवर्ग हाच मला शतॄ वाटल्याकारणाने मी नवर्‍याच्या कलाने घेणे पसंद करते. मग तू म्हणतोस ना हे कर, ते कर तर जरूर करेन. मात्र अमकं करू नकोस ला मला समर्पक कारण दे एवढीच मी अपेक्षा त्याच्याकडून ठेवते. शेवटी कुठेतरी तडजोड ही करावीच लागते. सगळीकडेच आपलं ते खरं करणं म्हणजे स्वातंत्र्य आहे का? नवर्‍याने पैसेही कमवायचे, बाहेर स्पर्धेला तोंड द्यायचे आणि २ घास आरामाची अपेक्षाही करायची नाही हा कुठला न्याय? आजही बायका कमावत्या असल्या तरी घर चालवायचा ओनस पुरुषावरच असतो. तो बदलला आहे का? आजही स्त्री कमी कमावणार्‍या, बुटक्या, वयाने लहान पुरषाशी लग्न का करत नाही? लग्न करताना मात्र आपल्यापेक्षा जास्त शिकलेला, जास्त कमावणारा नवरा का हवा असतो? _______________________________________________ लेख आवडला. संयत वाटला.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चित्रा
Tue, 01/11/2011 - 01:19 नवीन
धन्यवाद, सर्वच प्रतिसादकांचे. >>लग्न करताना मात्र आपल्यापेक्षा जास्त शिकलेला, जास्त कमावणारा नवरा का हवा असतो? मुद्दाम ठरवून आपल्यापेक्षा कमी शिकलेला, कमी कमावणारा नवरा हा कोणाला हवा असेल? जर शिकणे आणि कमावणे या समाजात राहण्याच्या दृष्टीने मोलाच्या गोष्टी धरल्या, तर जास्त शिकलेला आणि कमावणारा नवरा हवा असणे समजू शकते. >>आजही स्त्री कमी कमावणार्‍या, बुटक्या, वयाने लहान पुरषाशी लग्न का करत नाही? पसंद अपनी, अपनी. माझ्या ओळखीत उंच बायको आणि बुटका नवरा आहेत. लग्न ठरवून झाले असताना, वयानेही लहान मुलगा आनंदाने, हौशीने केल्याचे उदाहरण घरात आहे. अर्थात कमी कमावणारा नाही. पण चांगले कमावणे ह्यात वाईट काय आहे? >>नवर्‍याने पैसेही कमवायचे, बाहेर स्पर्धेला तोंड द्यायचे आणि २ घास आरामाची अपेक्षाही करायची नाही हा कुठला न्याय? आजही बायका कमावत्या असल्या तरी घर चालवायचा ओनस पुरुषावरच असतो. तो बदलला आहे का? नाही. लेखात मी आमच्या घरच्या पुरुषांबद्दलही एक वाक्य लिहीले आहे. अधिक लिहीले तर बरेच मोठे होईल. तेही अतिशय परिश्रम करणारे आहेत/होते, एवढेच म्हणते. बरीच घरे अशी असावीत. पण बायकांसाठी मात्र वर्षानुवर्षे ठराविक कामे करीत राहणे, स्वतःचे पैसे हाती नसणे, नवर्‍यावर सर्व गोष्टींसाठी अवलंबून असणे, किंवा कामाचे स्वरूप ठरवता किंवा बदलता न येणे, अशी काहीतरी अवघड समाजव्यवस्था होती/अजूनही आहे. आता त्यात असा फरक आहे की हल्ली बर्‍याच मध्यमवर्गीय स्त्रियांना बाहेरची कामे करून घरातलीही कामे करावी लागतात. त्यातून काहीतरी सुटका करून घेण्याच्या प्रयत्न केला तर शेजारीपाजारी, नातेवाईक बोलतात. मुंबईच्या मध्य रेल्वेने प्रवास करणार्‍या बायका भाजी निवडत घरी जात असत हे मी पाहिले आहे. पुरुषांना भाजी निवडण्याची गरज वाटत नाही. त्यांच्या काळज्या वेगळ्या आहेत. म्हणावे तर बायकांना त्याही म्हणजे पैशाच्या, कामाच्या इथल्या प्रमोशनच्या, मॅनेजमेंटच्या काळज्या आहेत. घरगुती काळज्यांची विभागणी झाली, पण श्रमांची विभागणी म्हणावी तशी झाली नाही, असे दिसते. असे श्रम कमी करायला जावे तर चेष्टा होते. किंवा अशा या वागण्यातील विसंगती/दुटप्पीपणा दाखवून देणार्‍या लेखनाची सातत्याने टिंगल होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

गरज

अन्या दातार
Tue, 01/11/2011 - 19:28 नवीन
>> मुंबईच्या मध्य रेल्वेने प्रवास करणार्‍या बायका भाजी निवडत घरी जात असत हे मी पाहिले आहे. पुरुषांना भाजी निवडण्याची गरज वाटत नाही. गरज भलेही वाटत असेल हो, पण जागा असते का तिथे? दोन बाकड्यांमधल्या जागेतही लोक उभे असतात मग भाजी कुठे निवडायची? (बाकी स्त्रियांसाठी राखीव डब्यातून प्रवास करणे मला कायदेशीरदृष्ट्या शक्य नसल्याने त्याबद्दल बोलू शकत नाही.) सरसकट विधान करणे मला जमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अन्या, स्त्रियांच्या डब्यातही

यशोधरा
Tue, 01/11/2011 - 19:32 नवीन
अन्या, स्त्रियांच्या डब्यातही तितकीच गर्दी असते की :) पुरुषांच्या डब्यात जशी आणि जितकी गर्दी असते तितकीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

शंका

आजानुकर्ण
Wed, 01/12/2011 - 09:59 नवीन
स्त्रियांच्या डब्यातही पुरूषांच्या डब्याइतकीच गर्दी असेल तर स्त्रियांना भाज्या निवडणे कसे शक्य होते याबाबत शंका वाटते. अनेक सरकारी वगैरे कार्यालयांमध्ये स्त्रिया भाज्या निवडताना पाहिले आहे. कामाच्या वेळेत भाज्या निवडणे हे कामाच्या वेळेत मिपा मिपा खेळण्याप्रमाणेच आक्षेपार्ह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

न निवडून सांगतात कोणाला?

यशोधरा
Wed, 01/12/2011 - 12:05 नवीन
न निवडून सांगतात कोणाला? आडमुठे प्रश्न विचारणारे आणि निरनिराळ्या शंका कुशंका काढणारे कुटुंबिय घरी असतील, त्यांच्या तोंडात भरण्यासाठी निवडत असाव्यात. >>अनेक सरकारी वगैरे कार्यालयांमध्ये स्त्रिया भाज्या निवडताना पाहिले आहे. > मी पण. तसेच सरकारी, निमसरकारी आणि खाजगी कार्यालयातील पुरुषांना कामाच्या वेळेत चकाट्या पिटतानाही पाहिले आहे. तुम्ही नाही बघितलेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

दुरुस्ती

आजानुकर्ण
Wed, 01/12/2011 - 14:10 नवीन
सरकारी, निमसरकारी आणि खाजगी कार्यालयातील स्त्रिया आणि पुरुष चकाट्या पिटताना पाहिले आहे. भाज्या निवडणे हे जसे स्त्रियांचे लक्षण आहे तसे चकाट्या पिटणे हे पुरुषांचे व्यवच्छेदक लक्षण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

भाज्या निवडणे हे जसे

यशोधरा
Wed, 01/12/2011 - 14:39 नवीन
भाज्या निवडणे हे जसे स्त्रियांचे लक्षण आहे >> हो? >> तसे चकाट्या पिटणे हे पुरुषांचे व्यवच्छेदक लक्षण नाही >> आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

चकाट्या पिटणे हे केवळ

आजानुकर्ण
Wed, 01/12/2011 - 14:59 नवीन
चकाट्या पिटणे हे केवळ पुरुषांचे व्यवच्छेदक लक्षण नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

बेटर. तसेच भाज्या निवडणे हे

यशोधरा
Wed, 01/12/2011 - 15:45 नवीन
बेटर. :) आडवळणाने का होईना, तुम्ही पुरुषही चकाट्या पिटतात ह्याला सहमती दर्शवल्याबद्दल धन्यवाद. आता त्यांनी भाज्या निवडायला सुरुवात केली की झालेच. काहीजण मनात तुम्ही उल्ल्केख केला आहे त्या व्यवच्छेदक लक्षणांबद्दल काही न आणता निवडतातही. :) तसेच भाज्या निवडणे हे केवळ स्रियांचे व्यवच्छेदक ल़क्षण नाही. निदान नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

ऑ

आजानुकर्ण
Wed, 01/12/2011 - 18:02 नवीन
तसेच भाज्या निवडणे हे केवळ स्रियांचे व्यवच्छेदक ल़क्षण नाही. निदान नसावे.
असे असेल तर पुरूषही भाज्या निवडतात हे सिद्ध होऊन एकंदर चर्चेचा सूर पालटण्याची शक्यता आहे असे नम्रपणे सुचवू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मी ह्या चर्चेत दिलेले

यशोधरा
Wed, 01/12/2011 - 18:34 नवीन
मी ह्या चर्चेत दिलेले प्रतिसाद एकदा नीट वाचायची तसदी घ्याल का? कृपया? कुठेही मी पुरुषांनी अमकेच करावे वा स्त्रियांनी तमके का करु नये वगैरे सूर लावलेला नाहीये. उलट माझ्या प्रतिसादांमधे मी कोणत्याही व्यक्तीने - इथे स्त्रीने - स्वतःला सक्षम बनवावे हेच सांगितलेले आहे. अन्या, ह्यांनी पुरुषांच्या डब्यात खूप गर्दी असते त्यामुळे ते भाज्या निवडू शकत नाहीत असे विधान केले आहे, त्यावर मी फक्त बायकांच्या डब्यातही गर्दी असते हे सांगितले आहे आणि त्यात काहीच अतिशयोक्ती नाही. लोकलमधून प्रवास केल्याने मी हे नक्कीच अनुभवावरुन सांगू शकते. तेह्वा गर्दी असते, हे भाज्या न निवडण्याचे कारण चालेलच असे नाही. >>असे असेल तर पुरूषही भाज्या निवडतात हे सिद्ध होऊन >> त्यामुळे सिद्ध होत नाही. 'निदान नसावे' हे फार महत्वाचे. दुसरे म्हणजे, "काहीजण मनात तुम्ही उल्लेख केला आहे त्या व्यवच्छेदक लक्षणांबद्दल काही न आणता निवडतातही" हे वाक्य वाचायला तुम्ही विसरलात का? की तुमचे येन केन प्रकारे काहीही बादरायण संबंध लावून प्रतिवाद करायचाच, हे धोरण आहे? बाकी अन्या दातार ह्या आयडीला दिलेल्या उत्तरावर तुम्ही इतक्या हिरीरीने चालवलेला प्रतिवाद वाचून मजा वाटली. असो. बाकी ह्यापुढे चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

अन्या दातार ह्या आयडीला

आजानुकर्ण
Wed, 01/12/2011 - 20:00 नवीन
अन्या दातार ह्या आयडीला दिलेल्या उत्तरावर तुम्ही इतक्या हिरीरीने चालवलेला प्रतिवाद वाचून मजा वाटली.
??? आमची कुठेही शाखा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

समता

श्रावण मोडक
Wed, 01/12/2011 - 12:20 नवीन
अनेक सरकारी वगैरे कार्यालयांमध्ये स्त्रिया भाज्या निवडताना पाहिले आहे. कामाच्या वेळेत भाज्या निवडणे हे कामाच्या वेळेत मिपा मिपा खेळण्याप्रमाणेच आक्षेपार्ह आहे.
चला, इथे तरी स्त्री-पुरूष समता आहे हे नसे थोडके. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

जास्त कमावणारा नवरा

प्रियाली
Tue, 01/11/2011 - 03:31 नवीन
स्त्रियांना जास्त कमावणारा नवरा हवा असणे यात अयोग्य काय आहे? अतिशय योग्य निर्णंय आहे. मी कितीही ठाम माझ्या पायावर उभी असले आणि दोघाचौघांना पोसण्याची ताकद असली तरी मला माझ्याहून जास्त कमावणारा जोडीदार आवडेल. यामागे माझे म्हणणे असे की यदाकदाचित उद्या माझी नोकरी गेली तर माझ्या जोडीदाराचे उत्पन्न मला आणि कुटुंबाला पुरेल असे हवे. पुरुषांना कमी पगाराच्या बायका का हव्या असतात हे कोडे आहे. ;) नुकताच मला माझ्या काही वर्गमित्रांशी बोलण्याचा प्रसंग आला. अनेकांपैकी फक्त दोघांच्या बायका प्रोफेशनली स्टेबल आणि उत्तम पगाराच्या नोकर्‍या करताना आढळल्या. इतरांच्या बायका गृहिणी, घरात बसून ट्यूशन घेणार्‍या किंवा शिक्षिकेची नोकरी करणार्‍या होत्या. (हे करण्यात काही कमी आहे असे नाही परंतु इंजिनिअरिंग करून, जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे कमर्शिअल आर्टिस्ट असून, एमबीए असून किंवा एम.एस्सी. असून कायमस्वरुपी घरकाम करण्याचा निर्णय घेणार्‍या बायकांबद्दल आश्चर्य वाटते हे खरेच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

>>...... असून कायमस्वरुपी

शुचि
Tue, 01/11/2011 - 03:52 नवीन
>>...... असून कायमस्वरुपी घरकाम करण्याचा निर्णय घेणार्‍या बायकांबद्दल आश्चर्य वाटते हे खरेच >> कधी कधी कौटुंबिक वातावरण नोकरीकरता पोषक नसते. कधीकधी स्वतःचा निर्णय असतो. _______________________________________________ माझी एक मैत्रिण आहे तिने एम बी बी एस केले आणि आता पूर्ण वेळ ग्रुहीणी आहे. नवरा म्हणतो "काय ते डॉक्टरकीचं ज्ञान पाजळायचं ते घरी पाजळा!!!" पण तिने नवर्‍याला अफलातून साथ दिली आहे. नवर्‍याचं मित्र-वर्तुळ अफाट आहे. घरी सारखी येजा आणि राबता असतो. यातूनच तो मोठ्या पदावर चढू शकला आहे. हीने रांधा-वाढा-उष्टी काढा एवढच नाही तर अप्रतिमच साथ त्याला दिली आहे. मुलांना वेगवेगळ्या वर्गांना(क्लासेस) घालणे, पाहुण्यांची सरबराई , पार्टीज ना जाणे सर्व मनापासून आणि शिस्तीत ठेवले आहे. त्यांची बचत दांडगी आहे ती हिच्या शिस्तप्रिय स्वभावामुळेच. मुलांना देखील मातृसौख्य भरपूर आहे. सारखे नवनवीन पदार्थ आणि व्यवस्थित साग्रसंगीत सर्व जय्यत मिळतं. सांगायचा मुद्दा हा की जे लोक खरच चमकणार असतात ते कुठेही चमकू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

खरेच?

प्रियाली
Tue, 01/11/2011 - 04:01 नवीन
कधी कधी कौटुंबिक वातावरण नोकरीकरता पोषक नसते.
हे समजू शकते. म्हणजेच समानतेपासून स्त्री अद्याप दूर आहे असेच म्हणायला हवे.
कधीकधी स्वतःचा निर्णय असतो.
खरेच? एखादी मुलगी इंजिनिअरींग किंवा मेडिकलला अ‍ॅडमिशन घेताना भविष्यात कायमस्वरुपी घरी बसण्याचा निर्णय घेते? असे असेल तर या मुलींचे प्रबोधन आवश्यक आहे. असा निर्णय किती पुरुष घेताना पाहिले आहेत?
माझी एक मैत्रिण आहे तिने एम बी बी एस केले आणि आता पूर्ण वेळ ग्रुहीणी आहे. नवरा म्हणतो "काय ते डॉक्टरकीचं ज्ञान पाजळायचं ते घरी पाजळा!!!" पण तिने नवर्‍याला अफलातून साथ दिली आहे. नवर्‍याचं मित्र-वर्तुळ अफाट आहे. घरी सारखी येजा आणि राबता असतो. यातूनच तो मोठ्या पदावर चढू शकला आहे. हीने रांधा-वाढा-उष्टी काढा एवढच नाही तर अप्रतिमच साथ त्याला दिली आहे. मुलांना वेगवेगळ्या वर्गांना(क्लासेस) घालणे, पाहुण्यांची सरबराई , पार्टीज ना जाणे सर्व मनापासून आणि शिस्तीत ठेवले आहे. त्यांची बचत दांडगी आहे ती हिच्या शिस्तप्रिय स्वभावामुळेच. मुलांना देखील मातृसौख्य भरपूर आहे. सारखे नवनवीन पदार्थ आणि व्यवस्थित साग्रसंगीत सर्व जय्यत मिळतं. सांगायचा मुद्दा हा की जे लोक खरच चमकणार असतात ते कुठेही चमकू शकतात.
यावर काय बोलावे? :) माणसे कशाचाही गौरव करतात याचे उत्तम उदाहरण. बाकी, शिस्त, उत्तम स्वयंपाक, मातृसौख्य, नवनवीन पदार्थ आणि एमबीबीएस यांचा परस्परसंबंध नाही. एमबीबीएस होऊन तुमची मैत्रिण हे करण्यात मोठेपणा मानत असेल तर तिच्या अंतरंगातील खरे दु:ख जाणून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 01/11/2011 - 04:05 नवीन
बाकी, शिस्त, उत्तम स्वयंपाक, मातृसौख्य, नवनवीन पदार्थ आणि एमबीबीएस यांचा परस्परसंबंध नाही.
एवढं सगळं करायचंच होतं तर लोकं मरमरून अभ्यास करून ज्या एमबीबीएसच्या मागे लागतात त्याचीच एक सीट का फुकट घालवली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

असा आडमुठा नवरा मिळणार आहे हे

शुचि
Tue, 01/11/2011 - 04:07 नवीन
असा आडमुठा नवरा मिळणार आहे हे स्वप्न पडलं होतं का तेव्हा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

शिक्षणाने माहिती वाढली, पण

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 01/11/2011 - 04:20 नवीन
शिक्षणाने माहिती वाढली, पण विचार वाढला नाही. नवर्‍यालाही थोडे "कूल पॉईंट्स" मिळाले असावेत त्याच्या समविचारी लोकांमधे, एमबीबीएस बायको घरी रांधा-वाढा-उष्टी काढा याबरोबरच शोभेची बाहुली म्हणून पार्ट्यांमधेही मिरवते म्हणून! माझा दृष्टीकोन: नवर्‍याने परवानगी मागितली का बायकोची "नोकरी करू का" म्हणून? मग हिला का हवी परवानगी?? अशिक्षित, अर्धशिक्षित बायकांना निदान नोकर्‍याही धड मिळत नाहीत. प्रियालीचा प्रतिसाद पटला, असं जगण्यापेक्षा घटस्फोट घेऊन स्वतःवर अवलंबून असणं जास्त उत्तम. अर्थात शुचि, तुझ्या मैत्रीणीने ठरवावं तिला काय आवडतं ते! तिच्यासाठी मी तर नाही निर्णय घेऊ शकत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

तेच होतं ना सगळीकडून कुचंबणाच

शुचि
Tue, 01/11/2011 - 04:28 नवीन
तेच होतं ना सगळीकडून कुचंबणाच येते नशीबी. इकडे आड तिकडे विहीर. नवरा की नोकरी? असे पर्याय दिले तर सहसा बायका कच खातात आणि नवरा हा पारंपारीक पर्याय स्वीकारतात. कारण घरचेदेखील पाठीशी उभे रहायला तयार नसतात. मग तो म्हणतो आहे ना "सोड नोकरी तर सोड' असेच तेदेखील म्हणतात. पुस्तकी शिक्षणाने खमकेपणा येत नाही तो मूळात असावा लागतो. आपल्यावर कौटुम्बिक व्यवस्थेचे इतके महत्व बिम्बलेले असते लहानपणापासून की असा खमका स्टँड नाही घेता येत की - मला नोकरी करायचीच आहे मग तू परवानगी दे अथवा घटस्फोट दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मनोगतावरली गोष्ट

प्रियाली
Tue, 01/11/2011 - 04:42 नवीन
पुस्तकी शिक्षणाने खमकेपणा येत नाही तो मूळात असावा लागतो. आपल्यावर कौटुम्बिक व्यवस्थेचे इतके महत्व बिम्बलेले असते लहानपणापासून की असा खमका स्टँड नाही घेता येत की - मला नोकरी करायचीच आहे मग तू परवानगी दे अथवा घटस्फोट दे.
याच्याशी सहमत आहेच पण अन्याय दूर सारायचा असेल तर हे करणे भागही पडते. काही वर्षांपूर्वी मनोगतावर एक गोष्ट लिहिली होती. तिचा कल स्त्रीमुक्तीचा नसला तरी विचार न करता निर्णय घेतल्याची परिणिती कशी होऊ शकते त्यावर होता. गोष्ट बर्‍यापैकी सत्य आहे आणि या गोष्टीतील दोघांनी घटस्फोट घेऊन, पुन्हा लग्न केलेले आहे आणि त्यांचे दुसरे संसार बरे चालले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

कथा आवडली. वास्तव वाटली.

शुचि
Tue, 01/11/2011 - 05:00 नवीन
कथा आवडली. वास्तव वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

कुचंबणा होते हे खरं आणि

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 01/11/2011 - 05:04 नवीन
कुचंबणा होते हे खरं आणि उदात्तीकरण खोटं एवढंच हवं होतं. याची जाणीव होणं महत्त्वाचं आहे शुचि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

कुचंबणा होऊ दिली जाते म्हणून

नीधप
Tue, 01/11/2011 - 09:15 नवीन
कुचंबणा होऊ दिली जाते म्हणून होते. दोष आईवडिलांचा आहे. एम बी बी एस चे शिक्षण काय मुलीला डॉक्टर केली हे मिरवायला दिले? या शिक्षणासाठीचे तुझे आणि आईवडिलांचे कष्ट पाण्यात घालवायचे नाहीयेत हा एवढा साधा विचार देता नाही आला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

काय सांगतेस

सुहास..
Tue, 01/11/2011 - 17:50 नवीन
असा आडमुठा नवरा मिळणार आहे हे स्वप्न पडलं होतं का तेव्हा? >>> माझ्या मते आडमुठा नाही , मुर्खच आहे. मु़ळामुठा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

पूर्णपणे सहमत

आजानुकर्ण
Wed, 01/12/2011 - 10:28 नवीन
एवढं सगळं करायचंच होतं तर लोकं मरमरून अभ्यास करून ज्या एमबीबीएसच्या मागे लागतात त्याचीच एक सीट का फुकट घालवली?
आमच्या वर्गातील 18 मुलींपैकी किमान 7 मुली इंजिनियरिंगची पदवी पदरात पाडून आता केवळ घरकाम करत आहेत. त्यांच्या जागेवर होतकरू मुलांना प्रवेश मिळाला असता तर ती 7 मुले आणि त्यांच्या प्रत्येकी 1 अशा 7 बायका यांचे भले झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हो

टारझन
Wed, 01/12/2011 - 12:46 नवीन
अगदी मनातला प्रतिसाद :) सात स्त्रीयांची वाट लावली त्या सात स्त्रीयांनी. त्यामुळी "स्त्री ची खरी दुश्मान स्त्री" च आहे ह्या वाक्याला पुष्टी मिळत आहे. बाकी आपल्या घरात काय करता येईल एवढंच आपण बघतो , उगाच मराठी संस्थळावर तावातावाने "आपले उद्धट आणि उच्च विचार " प्रकट करुन लाल करुन घेत नाही :) बाकी काही प्रतिसादांवरुन वाटते की जगातल्या सगळ्या स्त्रीयांचं उक्त जणु यांच्याच खांद्यावर आहे =)) अशांनी स्वतःच्या घरात असाच गोंधळ घालु नये अन्यथा त्यांची इंचाइंचाने अधोगती झाल्याशिवाय रहाणार नाही. चित्रा चा लेख संतुलित आहे . त्यात कुठेही आडमुठेपणा नाही , भांडकुदळपणा नाही, आणि हळुवार आहे जे काही आहे ते. :) " हळुवारपणा हा स्त्रीयांमधे असावाच्च " असे वाटते. आडमुठ्या आणि गुडघ्यात मेंदु असलेल्या स्त्रीयांची ( आणि पुरुषांचीही , हे लिहावं लागतं , खास आडमुठ्या स्त्रीयांसाठी) आम्हाला प्रचंड कीव वाटते =)) -( शोबाजी विरोधी स्त्रीसमर्थक) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

स्त्री समर्थक न राहून सांगतोस

रेवती
Wed, 01/12/2011 - 21:20 नवीन
स्त्री समर्थक न राहून सांगतोस कुणाला? तुझं लग्न आलय काही महिन्यांवर!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

पण तिचा नवरा जर परवानगी देत

शुचि
Tue, 01/11/2011 - 04:06 नवीन
पण तिचा नवरा जर परवानगी देत नसेल तर तिने घटस्फोट घ्यावा काय? हे तर रोगापेक्षा उपाय जालीम असे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

हे कुठून आले?

प्रियाली
Tue, 01/11/2011 - 04:08 नवीन
पण तिचा नवरा जर परवानगी देत नसेल तर तिने घटस्फोट घ्यावा काय? हे तर रोगापेक्षा उपाय जालीम असे झाले.
घटस्फोटापर्यंत तर मी पोहोचले नव्हते. :) तिचा नवरा परवानगी देत नाही आणि तिला आपले करिअर करण्यासाठी नवर्‍याची परवानगी लागते हे कळले, जे क्लेशदायक आहे. असो. व्यावसायिक शिक्षण घेऊन जन्मभर आपल्याला आवडती लाईन न घेता आल्याने कुढत बसण्यापेक्षा घटस्फोट घेऊन आपले जीवन आनंदान जगणे हा निर्णय मला योग्य वाटतो. जन्मभर अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाचा नाश करणे योग्य. रोगापेक्षा उपाय जालीम वाटत नाही. परंतु हे माझे मत झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

पण तिचा नवरा जर परवानगी देत

विजुभाऊ
Wed, 01/12/2011 - 12:10 नवीन
पण तिचा नवरा जर परवानगी देत नसेल तर तिने घटस्फोट घ्यावा काय? हे तर रोगापेक्षा उपाय जालीम असे झाले. म्हातारी मेल्याचे दु:ख्ख नाही.पण काळ सोकावतो. त्या स्त्रीला परवानगी घेण्याची आवश्यकताच का भासावी? लग्नापूर्वीच जर तिने स्वतःचे करीयर करणार असे ठरवले असते. लग्ना अगोदर जोदीदाराला संगितले असते तर हा प्रश्न आलाच नसता. अगोदर छोट्या छोट्या गोष्टीत परवानगी मागायची नवर्‍याला सवय लावली. या सर्वाला कारणीभूत आहे आर्थीक स्वातन्त्र्य..... आर्थीक निर्णयासाठी अवलंबून असलात की तुमचे स्वत्व संपलेले असते. देणारा त्याच्या अटी लादत जातो. बॅन्क , सावकार , वर्ल्ड बॅन्क यांचेही असेच असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

>> एमबीबीएस होऊन तुमची

शुचि
Tue, 01/11/2011 - 04:14 नवीन
>> एमबीबीएस होऊन तुमची मैत्रिण हे करण्यात मोठेपणा मानत असेल तर तिच्या अंतरंगातील खरे दु:ख जाणून घ्या.>> +१०००० हो ती दु:खी आहे. खूप दु:खी आहे. पण मला हे कौतुक वाटतं की तरी तिने संसार व्यवस्थित पार पाडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

माझ्या एका मैत्रिणीची आठवण

रेवती
Tue, 01/11/2011 - 05:08 नवीन
माझ्या एका मैत्रिणीची आठवण झाली. त्या डॉ. मैत्रिणीने लग्नाच्या मांडवातच लग्न करायला नकार दिला कारण नवरा ऐनवेळी (लग्नाच्या दिवशी सकाळी) नोकरी चालणार नाही, अमकं चालणार नाही, तमकं चालणार नाही असे म्हणाला. तिच्या म्हणण्यानुसार त्याने ही अरेरावी योग्य वेळीच केली. लग्न झाल्यावर केली असती तर घटस्फोटाची नसती कटकट मागे लागली असती. शिवाय आईवडीलांचा पुरेसा पाठिंबा कशालाच नाहीये. तिचं लग्न पुन्हा होण्यास थोडा उशीर झाला पण आता ठिक आहे सगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

या मुलीचं वागणं आवडलं...असंच

शिल्पा ब
Tue, 01/11/2011 - 06:58 नवीन
या मुलीचं वागणं आवडलं...असंच खंबीर रहायला हवं.उगाच समाजाला घाबरून लग्न केलं असता तर समाज आला असता का निस्तरायला? तिला भावनिक, मानसिक आधार द्यायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

रेवती ताई आपल्या मैत्रिनीने

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 07:07 नवीन
रेवती ताई आपल्या मैत्रिनीने घेतलेला निर्णय योग्य आहे असे वाटते. अवांतर : आमच्या बाबतित इथे उलटे झाले आहे. जेव्हा जेव्हा मि मुलिंना 'नोकरि करयचि नाहि' असे सांगितले, तेव्हा तेव्हा त्यांनि मला रिजेक्ट केले. आनि जेव्हा नाईलाजस्तव मी हि अट काढुन टाकली तेव्हा मात्र नोकरिचि इच्छाच नसनारि बायको मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा