हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी
८ ते १० कचोरी साठी
साहित्य :
१. हिरवी तुरीची दाणे २ वाट्या
२. हिरवी मिर्ची ३ ते ४
३. जिरे, हि॑ग (आवश्यकतेनुसार)
४. तिखट, हळ्द, मिठ (चविनुसार)
५. मैदा २५० ग्राम
६. खाण्याचा सोडा चिमुट्भर
७. तिळ १ टिस्पुन
८. तेल तळण्याकरीता
कृती :
१. हिरवी तुरीची दाणे व हिरवी मिर्ची मिक्सर मधुन बारीक करुन घ्यावीत.
२. त्यामधे तिखट, हळ्द, मिठ (चविनुसार) व जिरे, हि॑ग (आवश्यकतेनुसार) घालुन मिक्स करा.
३. मैद्यात मिठ,चिमुट्भर खाण्याचा सोडा ,तिळ, २ टिस्पुन गरम तेल घालुन मळावे.
४. मैद्याचे छोटे गोळे करुन पुरीसारखे लाटुन घ्यावे.
५. त्या पुरीवर वरील मिश्रण पुरणपोळी प्रमाणे भरुण गोळे करावे व हलक्या हातानी त्याला पुरीसारखा आकार द्यावा.
६. कढईत तेल गरम करुन डिप फ्राय करावे.
७. गरमागरम चटणी, सौस, दहि सोबत सर्व्ह करावित.
फोटो :

वाचन
4357
प्रतिक्रिया
0