Skip to main content

नाव + आडनाव

लेखक त्रास यांनी रविवार, 15/02/2009 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
असे असल्यास मजा येते- भावना प्रधान शहा निशा आणखी काही उदाहरणे माहित असल्यास कळवावी.

वाचने 9934
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

आत्ता जरा चांगल्या मुड मधे बाहेर चाल्लो आहे ... आलो की सगळी णावं आडणावं काढतो तुमची थांबा .. तोवर त्रास सहण करा ..

"पिवळा डांबिस!!!!" का? असं बघा, नुसत्या, पिवळा *** या नांवाला काही अर्थ नाही..... आणि नुसत्या, *** डांबिस या नांवात तो खमंगपणा नाही (इथे मिपावर सगळे, अगदी सगळेच, डांबिस!!!!) तुमचं काय म्हणणं? :)) (खुद के साथ बाता: आम्हाला हे "पिवळा डांबिस" हे सदस्य नांव सुचवणार्‍या आमची प्रियतमा #२ शिवास रीगल हिचे आम्ही अनंत आभारी आहोत!!!!!) :)

तिरशिंगराव माणूसघाणे आणि सोनुबाई पितळे अलका कुबेर आनंद रडके वात्स्यायन कामेरकर

माझ्या ऐकिवातले एक असेच नाव.. अक्षर शहा त्याला कदाचित अक्षरशः म्हणत असावेत.. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

खाली दिलेली इतर सगळी नावे गंमतशीर आहेतच पण नाव आडनाव एकत्र मिळून त्या शब्दाचा एक अर्थ व्हायला हवा हे महत्त्वाचं अपेक्षित असावं... अक्षरशः त्यात छान बसतं....... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विद्यासागर दिवटे हे आमच्या मित्रमंडळींपैकी एक. गीतकार स्वानंद किरकिरे. माझ्या वर्गात गीतांजली काटे नावाची मुलगी होती. रेवती

In reply to by रेवती

आनंद शोचे.. ( देॠब्रा आडनाव आहे हे.. मुळचे हैद्राबाद साइडचे लोक ) महेंद्र

In reply to by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)

शौचे आसनं ते? प्रसन्न शौचे आमचा मित्र हाय प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

तेच हो, ,मला लिहिता आलं नाही. मला ओउ लिहिता येत नाही इथे.. :)

In reply to by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)

औ = ए + यु = a + u (दोन नावांमुळे त्रस्त) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by रेवती

रेवतीताई, आडनाव नाही आलं शेवटच्या नावात! ;-) रंगांची नावं आडनावं म्हणून, उदा. निळे, हिरवे, काळे, गोरे, पाहून मला अंमळ गंमतच वाटते. मेघना निळे (माझी एक मैत्रीण) अदिती जोशी आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>मेघना निळे (माझी एक मैत्रीण) तुम्ही तिला 'घननीळा' म्हणून हाक मारता काय मग?

सुकेशी टकले :) माझी एक मैत्रीण आहे,'Dharamshee' आडनाव आहे तिचं.तिला आम्ही कधीकधी 'धर म्हशी' म्हणून चिडवतो. :P

कुठल्याश्या मराठी सिरियलनंतर येणार्‍या श्रेयनामावलीतलं नाव: 'बाळा दुपटे'

सविता घायकुते(कायम घायकुतीला आलेली) सुनंदा बोडके , प्रसन्न कवळी . नयन डोळे "अनामिका"

आमचेकरं पन एक मानूस हाय, यशवंत रावजी पाटील नावाचा आमचे गावातली सगली पोराटोरा त्याना यरा पाटील म्हनून हाका मारतान.

माझ्या मते, त्रास यांनी सुरू केलेल्या धाग्याचा मूळ हेतू हा नाव + आडनाव मिळून होणार्‍या एखाद्या अर्थपूर्ण शब्दांबाबत असावा. हे जर खरे असेल तर मूळ लेखात दिलेल्या भावना प्रधान आणि शहा निशा ह्या मालिकेत फक्त खादाडमाऊ यांनी दिलेले अक्षर शहा हेच नाव बसते. अन्य सर्व प्रतिसाद हे नाव आणि आडनाव यांच्या अर्थातील विसंगती दर्शविणारे आहेत. तेही तसे मनोरंजकच आहेत परंतु मूळ धाग्याशी अवांतरच!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

फारच वीचार करता राव तुम्ही.... माझ्या मते त्रास रावान्नी लोकन्ना त्रास देण्या करता नव्हे तर लोकान्चा त्रास हल्का करण्या साथी हा धागा काधला असावा.. त्यामुळे सर्वच नावे धाग्याला धरुन आहेत.... चालु द्या. ह.घ्या.

सागर गोटे अवांतरः अजिंक्य मांडलिक नावाची एक व्यक्ती आमच्या परिचयात आहे...

प्रकाश अंधारे सोनाली पितळे भिकोबा सावकार --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

In reply to by केळ्या

अच्छा तर ही उषा शाह (गुजराती उच्चार उसासा!!!) =)) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शाळेत मराठीच्या पुस्तकातील संपादकीय मंडळाची नावं फार विचित्र असायाची. टाले, काटे, बंड, हुजुरबाजार, आणि ही सर्व माणसे एकत्रच संपादक मंडळात असल्याने विचीत्र आडनावे एकाच ठिकाणी वाचायची असल्यास मी ते पान उघडायचो.

स्नेहा मारणे प्रियंवदा बोबडे मधुरा कडू ऑफिसमध्ये एक स्निग्धा नावाची मुलगी होती तिचे लग्न झाल्यावर आडनाव गोळे झाले - स्निग्धा गोळे

In reply to by शिल्पा ब

कोणी म्हणे ते "वडिल" झाले :) त्यांच्या अभिंनंदणाचा कोणीतरी धागा काढावा :) बाकी माझ्या कलिग चं नाव आहे "सारंग संगीत "

बारावी नंतर शाखेनिहाय कॉलेजमध्ये प्रवेश केल्याने अगोदरचे बरेच मित्र अन्यत्र गेले, पण तसेच नव्यानेही काही ओळखीचे होत गेले (हे सर्वत्रच होत असते...); त्यामुळे नवीन कोण कोण आहेत याचा नोटीस बोर्डवर लावलेल्या वर्गनिहाय याद्यावरून आम्ही आमच्या वर्गातील नावे पाहात असताना एक नाव दिसले "रंजना भास्कर देसाई...". पुढे थोडी ओळख झाल्यावर, व बुजरेपणा संपुष्टात आल्यावर ती वर्गात आल्यावर आमच्यातील एका टग्या तिचे मोठ्याने नाव पुकारत असे..."अरे व्वा, रंभा आली..."...हे नाव त्या मुलीला पुढील तिन्ही वर्षे कायमचे चिकटलेच. अर्थात 'रंभा'नेही ते स्पोर्टिव्हली घेतले होते. दुसरी एक मुलगी होती "कमल कुलकर्णी" तिचे बारसे वर्गमित्रांनी केले "कक्कू"....तर तिच्यासमवेत तिच्याच गल्लीत राहाणारा "बाळासाहेब सूर्यवंशी" झाला "बस्सू"....त्यामुळे एखादे दिवशी कक्कू आली नाही तर मित्र सूर्यवंशीला विचारायचे, "बस्सू कक्कू किधर गई??" मजा होती नावांना ट्विस्ट करायची. इन्द्रा

मुतालीक = चार अक्षरी आडनावात दोन अक्षरे इंग्रजी आणि दोन मराठी मुरलीधर देवधर = देव धर फातरफेकर.

दिशा दर्शने साक्षी खोटे बुवा कीर्तने राम राजे गुलाब काटे प्रसन्न वैराग निवास परदेशी धोंडू दगडे मोहिनी सदाफुले बारकू लहानु कोरकु जीवन लहाने कमल माळी

आमच्या घराजवळ एका डॉक्टरचा दवाखाना आहे. त्यांचे नाव आहे "डॉ. अमर करे" मी अजून त्यांच्याकडे गेलो नाही. पण जाण्यास भीती वाटते ;)

काही उदाहरणे नाव आडनाव सुबोध वाणी अक्षय साठे वसु॑धरा स्वामी अस्मिता फुले रेखा चित्रे छाया चित्रे आदर्श पुणेकर ? प्रशा॑त समुद्र सुदर्शन चक्रपाणि मदन गोळे ! आडनाव प्रथम न॑तर नाव असे असेल तर- सूर्यव॑शी राम स॑त लीला बाळ गोपाळ भरपूर सापडतील्,आठवली तेवढी लिहिली.