✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण दुसरे, भाग-१: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय

स
सुधीर काळे यांनी
Mon, 01/03/2011 - 14:16  ·  लेख
लेख

Book traversal links for "भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण दुसरे, भाग-१: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय

  • ‹ "भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग १(ब) "परिचय" प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती
  • Up
  • "भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-२: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5494 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

बेडकांच्या राजाची गोष्ट....

प्रसन्न केसकर
Mon, 01/03/2011 - 17:48 नवीन
बेडकांच्या राजाची गोष्ट आठवली सुरुवातीचा भाग वाचुन.
  • Log in or register to post comments

मी माझ्या 'टिपां'त त्याबद्दल उल्लेख करायला हवा होता!

सुधीर काळे
Tue, 01/04/2011 - 03:11 नवीन
केसकरसाहेब, खरं तर मूळ पुस्तक वाचतानाच मलाही ती कथा आठवली होती आणि मी माझ्या 'टिपां'त त्याबद्दल उल्लेख करायला हवा होता. (Anglo-Saxon, Hillary,आणि Obama यांचा केला आहे त्याच धर्तीवर!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

चांगले आणि अचूक असे

नगरीनिरंजन
Mon, 01/03/2011 - 18:04 नवीन
चांगले आणि अचूक असे विवेचन. >>अशा तर्‍हेची वागणूक कदाचित सरकारी नोकर्‍यांत आणि नोकरशाहीत जास्त प्रचलित असेल पण अशा आपल्या पदक्रमाबद्दालचा आणि अशा पदांची द्योतक असणारी डामडौलाची प्रतीके, चिन्हे यांचा ध्यास खासगी नोकर्‍यांतही दिसतोच. पूर्णपणे सहमत. सत्ता आणि अधिकारांची लालसा हे भारतात तांत्रिक क्षेत्रात स्वतःची प्रॉडक्टस् तयार न होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे असे मला वाटते. कामाला लागून पाच वर्षे नाही झाली तोच प्रत्येकाला टीम लीडर किंवा प्रोजेक्ट लीडर व्हायचे असते आणि व्यवस्थापन करायचे असते. या उलट इतर विकसित देशांत १५-२० वर्षं नोकरी झालेले लोकही एका सर्वसामान्य सदस्यासारखे तांत्रिक काम करतात आणि इतक्या अनुभवाच्या बळावर उत्तम दर्जाचे उत्पादन वा नवनवीन कल्पना अंमलात आणतात.
  • Log in or register to post comments

तुमची असेल तर तुम्हाला एक कडक सॅल्यूट, मुजरा!

सुधीर काळे
Tue, 01/04/2011 - 08:28 नवीन
आरंभातच बीज अंताचे, गूढ अटळ ही दैववाणी दु:ख क्षणाचे हर्ष क्षणाचा, मी तर अळवावरचे पाणी वरील कविता कुणी लिहिली आहे? तुमची असेल तर तुम्हाला एक कडक सॅल्यूट, मुजरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+१

संजय अभ्यंकर
Sun, 01/09/2011 - 19:50 नवीन
लेख उशीरा वाचायला घेतला. न नि, आपले अचूक निरिक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

जलद पदोन्नतीमुळे असे कांहीं नुकसान होते असे मला तरी वाटत नाहीं

सुधीर काळे
Mon, 01/10/2011 - 12:42 नवीन
ज्यांनी जपानी कंपन्यांबरोबर काम केले आहे व ज्यांना त्यांच्या कंपन्यांना भेट देण्याची संधी मिळाली आहे त्यांनी हे पाहिलेच असेल कीं जपानमध्ये (कमीतकमी पोलाद कंपन्यांमध्ये) एक गोष्ट पहायला मिळते कीं अगदी चांगल्यात चांगल्या कंपन्यातही (ज्या अतीशय उच्च विश्वविद्यालयातील सर्वश्रेष्ठ गुण मिळालेले विद्यार्थी नेमतात) पदोन्नती अक्षरशः किती वर्षें काम केले यावर अवलंबून असते. आजची ताजी परिस्थिती माहीत नाहीं पण मी १९७२ ते १९९२ च्या दरम्यान तिथे नेमाने जात होतो आणि सगळीकडे पहिली पदोन्नती मिळायची १४-ते १५ वर्षांनी! ('सुबक ठेंगणी' मॅडम आजची परिस्थिती सांगू शकतील, पण हल्ली त्यांचे दर्शन 'मिपा'वर बर्‍याच दिवसात झालेले नाहीं.) जरा चांगली ओळख झालेले जपानी या 'लष्करी खाक्या'बद्दल (regimentation) माझ्याकडे बोलायचे सुद्धा! असे असूनही जपानी लोकांनी पोलाद व्यवसायात कुठलाही सांगण्यासारखा नवा शोध लावला नाहीं. पण दुसर्‍यांनी लावलेले शोध जास्त परिणामकारकपणे राबविले! तेंव्हा जलद पदोन्नतीमुळे असे कांहीं नुकसान होते असे मला तरी वाटत नाहीं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

वाचते आहे..

यशोधरा
Mon, 01/03/2011 - 18:15 नवीन
वाचते आहे..
  • Log in or register to post comments

अनुवाद वाचतो आहे. त्याबद्दल

नंदन
Mon, 01/03/2011 - 20:46 नवीन
अनुवाद वाचतो आहे. त्याबद्दल तुमच्या चिकाटीला दाद द्यावी तेवढी थोडीच. लहान लहान भागांमध्ये विभागला गेल्यामुळे पहिल्या भागाहून हा भाग अधिक वाचनीय झाला आहे.
  • Log in or register to post comments

अनुवाद

आमोद शिंदे
Tue, 01/04/2011 - 02:31 नवीन
अनुवाद वाचतो आहे.
त्याबद्दल तुमच्याही चिकाटीला दाद द्यावी तेवढी थोडीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

कन्टेन्ट खरं आहे!

पिवळा डांबिस
Tue, 01/04/2011 - 06:27 नवीन
लहान लहान भागांमध्ये विभागला गेल्यामुळे पहिल्या भागाहून हा भाग अधिक वाचनीय झाला आहे. नंदनशी सहमत आहे! अशा प्रकारच्या लिखाणात मूलतः संवाद वगैरे नसतात त्यामुळे सलग मोठा एकच भाग हळूहळू इंटरेस्ट गमावतो. काळेकाका, हे नवीन टेकनिक वर्क होतं आहे आमच्यासारख्या एडीडीवाल्यांसाठी!!:) अनुवाद वाचतो आहे. त्याबद्दल तुमच्या चिकाटीला दाद द्यावी तेवढी थोडीच. तुमच्या चिकाटीला तर आम्ही कधीच दाद दिलेली आहे.:) खरंच, सोपं काम नाहीये हे!
  • Log in or register to post comments

@Anglo-Saxon: माझ्या मते

निनाद मुक्काम …
Tue, 01/04/2011 - 08:20 नवीन
@Anglo-Saxon: माझ्या मते हिटलर ला ह्या गोष्टीची कल्पना होती .म्हणून हिटलर ने ब्रिटीश राष्ट्रे फ्रेंच राष्ट्रासारखे खालसा केले नाही.अथवा प्रत्यक्ष सैन्य घुसवले नाही .(ब्रिटीश राजघराण्यात फार पूर्वी एक जर्मन वंशीय येऊन गेला .) कारण इंग्लिश ताकद त्याच्या आरमारात होती .तर जर्मन हवाई आणि भूदल . बाकी लेख मस्त झालाय . आणि इंग्रजांनी अनेक दशके आपल्या देशातील राजकारण /समाजकारण /मानसिकता ह्यावर दीर्घ अभ्यास केला .हे त्याच्या अधिकार्यांनी त्यांच्या मायदेशी पाठविलेल्या पत्रातून वेळोवेळी दिसून येते . बाकी शिवाजी महाराजांच्या राज्यभिशेकाचे वर्णन मिळवण्यासाठी .पुरंदरे ह्यांना लंडन गाठावे लागले .तेथे इंग्लिश वकिलाने ह्या प्रसंगाचे वर्णन आपल्या डायरीत लिहिले आहे . ती डायरी पहिली . (म्हणूनच कदाचित गागा भट्ट ह्यांच्या हस्ते राज्याभिषेक झाला ह्यावर वादंग उठत नाही .कारण विदेशी व्यक्तीस खोटे पाडणे आपल्या देशी साहेबांना जमत नाही .अजून .)
  • Log in or register to post comments

असेच कळवत जा ही विनंती!

सुधीर काळे
Tue, 01/04/2011 - 08:25 नवीन
वाचकांबरोबर झालेल्या विचारांच्या देवाण-घेवाणीहा परिणाम आहे. तुम्हा वाचकांकडे मी 'ग्राहक' म्हणून पहातो व त्यामुळे तुमच्या सूचनांचे नेहमीच स्वागत असेल. यापूर्वी 'न्यूक्लियर डिसेप्शन' लिहिताना अनेकांनी-विशेषत: मदनबाण आणि विकास पिसाळ या दोघांनी-मला खूप उपयुक्त सूचना दिल्या होत्या व त्यांचा मला खूप फायदा झाला. असेच कळवत जा ही विनंती!
  • Log in or register to post comments

मदनबाण आणि विकास पिसाळ या

आमोद शिंदे
Tue, 01/04/2011 - 10:00 नवीन
मदनबाण आणि विकास पिसाळ या दोघांनी-मला खूप उपयुक्त सूचना दिल्या होत्या व त्यांचा मला खूप फायदा झाला.
हे विकास पिसाळ दिसत नाहीत आजकाल. कुठे आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

भारतिय व्यक्तिचा स्वतःबद्दलचा द्रुष्टिकोण

शेखर काळे
Wed, 01/05/2011 - 06:09 नवीन
माझे असे मत आहे की भारतीय व्यक्तीला दुसरे लोक आपल्याकडे कोणत्या द्रुष्टिने पाहतात हे अत्यंत भावनिकरित्या महत्वाचे वाटते. म्हणजे असे की घरातली खाट मोडली असेल तरी त्यावर चादर झाकून खिडक्यांना रंग देणे हे जास्त महत्वाचे. कारण .. लोक काय म्हणतील ? ...
  • Log in or register to post comments

हे पुस्तक भारतीयांचे निस्पृह पण सुंदर आत्मपरीक्षण आहे

सुधीर काळे
Wed, 01/05/2011 - 09:06 नवीन
शेखर-जी, खरे तर हे पुस्तक म्हणजे एका भारतीयाने भारतीय समाजाचे केलेले निस्पृह पण सुंदर आत्मपरीक्षण आहे. ते पुस्तक वाचताना मला सारखे मी आरशात पहातो आहे कीं काय असेच वाटत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर काळे

दोनदा उमटल्याने हा प्रतिसाद काढून टाकला आहे!

सुधीर काळे
Wed, 01/05/2011 - 10:24 नवीन
दोनदा उमटल्याने हा प्रतिसाद काढून टाकला आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर काळे

छान अनुवाद

सहज
Wed, 01/05/2011 - 07:10 नवीन
वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

चांगले लिखाण. भारतीय मानस

विजुभाऊ
Wed, 01/05/2011 - 12:01 नवीन
चांगले लिखाण. भारतीय मानस अजूनही राजेशाही जमान्यातच वावरत आहे. संस्थाने खालसा झाली , राजेशाह्या संपल्या..... लोकानी एम पी एम एल ए ना नवे राजे म्हणून स्वीकारलय. कोणत्याही अधीकारपदावरील व्यक्तीला आपण " सर" म्हणून संबोधतो. " सर" ही उपाधी इंग्लंडची राणी बहाल करत असते. आपण ती सर्वाना अशीच वाटत असतो. दुर्दैवाने हे आपल्या शिक्षणक्षेत्रातल्या तथाकथीत धेन्डाना सुद्धा ठाऊक नसते. गुलामगिरीच्या मानसिकतेतून आपण अजून बाहेर आलेलो नाही. एक राष्ट्र म्हणून अजूनही आपण स्वतःला समजत नाही. राष्ट्र म्हणून आपल्याला अस्मिता मिळालेलीच नाहीय्ये
  • Log in or register to post comments

पहा पटते का!

सुधीर काळे
Wed, 01/05/2011 - 14:52 नवीन
विजूभाऊ, जरा एक वेगळा विचार मांडू इच्छितो! आपण मराठीत किंवा हिंदीत बोलत असताना भाऊ (विजूभाऊ), भाई (हिंमतभाई), भैय्या (राजूभैय्या) असल्या एतद्देशीय उपाधी वापरतोच. पण आपल्याहून उच्चपदस्थ असलेल्यांना किंवा वडीलधार्‍यांना आपण त्या-त्या भाषेतले आदरार्थी संबोधन वापरतो. उदा. मी माझ्या इंडोनेशियातील वडीलधार्‍या मंडळीना किंवा बॉसला (येथील प्रथेनुसार) पुरुष असल्यास Bapak (पिताश्री) किंवा ती व्यक्ती स्त्री असल्यास Ibu (मातोश्री) असे संबोधतो, Sir असे नाहीं. किंवा उर्दू किंवा हिंदी भाषिकांशी बोलताना तितक्याच सहजपणे 'जनाब' तोंडात येते. मराठी-हिंदीत साहेब किंवा साहब (हे शब्द कुठून आले आहेत कुणास ठाऊक!) वापरतो. खरे ना? आता याची दुसरी बाजू. माझा हुद्दा जाणणारे किंवा वय ओळखणारे ब्रिटिश नागरिकसुद्धा मला Sir म्हणतात त्यात छद्मीपणाचा अजीबात लवलेशही नसतो. त्यामुळे गुलामगिरीच्या मानसिकतेतून आपण अजून बाहेर आलेलो नाही हे तुमचे निवेदन बरोबर नाहीं असे मला वाटते. आज भारतीयांना बाहेर देशी खूप सन्मानाने वागविले जाते. बाहेरदेशी असलेले भारतीय आपल्याला हेच सांगतील! या उलट गरज लागल्यास मला एकाद्या गोर्‍याला 'फायरिंग' देताना अजीबात चाचरायला होत नाहीं. कारण ते सारे नैमित्तिक (issue-based) असते. पहा पटते का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा