पझल (२००९) – दिग्दर्शिका: नातालिआ स्मर्नॉफ (अर्जेंटिना)
चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा एका घरात पार्टी चालू असते. घरची गृहिणी झटत असते. स्वयंपाकघरातून तऱ्हतऱ्हेचे पदार्थ आणून घरातल्यांची आणि पाहुण्यांची सरबराई करत असते. हळूहळू लक्षात येतं की खुद्द तिचाच वाढदिवस साजरा करायला लोक जमले आहेत. पण तिला मात्र आराम नाही. नवरा आणि दोन वयात आलेली मुलं असा तीन पुरुषांचा संसार करणारी ती बाई (मारिआ) पुढच्या काही प्रसंगांत अधिक ओळखीची वाटू लागते. नवरा तसा प्रेमळ आहे. मुलं गुणी आहेत. सगळे आपापल्या आयुष्यात मग्न आहेत. म्हटलं तर ती अगदी सुखी गृहिणी आहे. पण काहीतरी सलतं आहे. ते उचकटून वर यायला वाढदिवसाला आलेल्या एका भेटवस्तूचं निमित्त होतं. ते एक जिगसॉ पझल आहे. ते सोडवण्यात मारिआला एक विलक्षण आनंद मिळतो. तहानभूक, घरकाम विसरून ती त्यात रमून जाते.
मग तिला जिगसॉ पझल सोडवण्याची चटक लागते. जिनं तिला ते भेट दिलेलं असतं त्या बाईला दुकान विचारून ती तिथनं आणखी पझल्स आणते. तिथंच सूचनाफलकावर तिला एक माहिती मिळते. पझल सोडवण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कुणाला तरी एक पार्टनर हवा असतो. ती त्या माणसाला जाऊन भेटते. तो तिची चाचणी घेतो आणि आपली पार्टनर म्हणून तिची निवड करतो.
मध्यमवयीन, मधमवर्गीय मारिआचं आयुष्य इथं एक कलाटणी घेतं. तिचं साधं घर दूर उपनगरात असतं, तर त्याचं आलिशान घर शहरात मध्यवर्ती असतं. आठवड्यातून दोनदा एकत्र येऊन पझल सोडवण्याचा सराव करण्यासाठी मारिआ गपचूप शहरात येऊ लागते. माहेरची एक नातेवाईक आजारी असण्याचं खोटं कारण सांगून ती येत असते. कारण असल्या उद्योगांवर नवरा चिडेल हे तिला ठाऊक असतं. नवर्यापासून लपवून एखादी भानगड करावी तसं हे चालू असतं.
मग हळूहळू स्पर्धेचा दिवस येतो, आणि...
पुढची गोष्ट सांगत नाही. पण चित्रपटाचं वेगळेपण जाणवेल असे काही तपशील सांगतो. प्रत्यक्ष स्पर्धा आणि तिचा निकाल, जिंकणं-हरणं यावर अमेरिकन चित्रपटातल्यासारखा इथं भर नाही. भर आहे तो स्वतःच्या आनंदाची एखादी गोष्ट करण्यातलं साधंसुधं समाधान एका मध्यमवयीन स्त्रीपुढे एक वेगळं स्वातंत्र्य आणि सौंदर्य कसं घेऊन येतं, यावर.
ही काही पांढरी-काळी गोष्ट नाही. इथं नवरा दुष्ट नाही. त्याचं बायकोवर आणि तिचंही त्याच्यावर प्रेम आहे. एका पुरुषप्रधान व्यवस्थेत आपल्या बायकोची गरज मात्र त्याला उमजत नाही. मुलं आपापल्या मार्गावर जाऊ इच्छितात. आपल्या मर्जीविरुध्द जगण्याचं स्वातंत्र्य त्यांना तो देतो. जेव्हा मारिआ स्पर्धेविषयी सांगते तेव्हाही किंचित कटकट सोडता तो ते मान्य करतो.
प्रश्न आहे तो मारिआचा. भेटवस्तू म्हणून मिळालेलं तिचं पहिलं पझल म्हणजे इजिप्तची राणी 'नेफरटिटी'चं चित्र असतं. तिचा पझल पार्टनर तिला नेफरटिटी, तिनं केलेल्या धार्मिक सुधारणा यांविषयी सांगतो; तिला वाचायला आपल्याकडचं सुरेख चित्रांचं एक पुस्तक देतो; 'सवडीनं वाचून परत कर' सांगतो. पझल सोडवण्याच्या सर्वसाधारण तर्हेपेक्षा मारिआची पध्दत वेगळी आहे हे लक्षात येतं तेव्हा तो तिला रूढ चौकटीत बसवायला जात नाही. त्यापेक्षा तिची शैली विकसित होऊ देतो. त्या शैलीला अनुसरून ते दोघं एकत्र काम करतात – खरे पार्टनर्स म्हणून. एखाद्या पुरुषाशी विवाहबाह्य संबंध ठेवण्यासारखं हे असतं. पण हे निव्वळ क्षणिक सुखासाठी नसतं. कारण तिला नव्यानं घडवण्याची ताकद त्याच्यात असते. दोघं एकत्र येऊन काहीतरी छान घडत असतं. हे मारिआलाही कळत असतं. म्हणून ती घरी आपल्या पार्टनरविषयी अजिबात काही सांगत नाही.
आपली पत्नी आजकाल अधिक सुंदर दिसते आहे हे नवर्याला जाणवतं. तिला तो हे बोलूनही दाखवतो. दोघांचं सहजीवन हे तसं सुखीही असतं. त्यामुळे तीही या गोष्टीनं सुखावते; तोही सुखावतो. तिचं हे फुलून येणं अतिशय तलम, सुंदर आहे. एका अत्यंत शांत, ठाय लयीत चित्रपट उलगडत जातो आणि संपतोही. अर्जेंटिनासारख्या देशात घडणारी ही कहाणी अगदी आपल्याच देशात आपल्या परिसरात घडत असेल असं वाटतं. अखेर आपल्या मनात घर करून राहते ती साधीसुधी पण मनस्वी, अखेरच्या चौकटीत निळ्याशार आकाशापुढे आता मोकळी झालेली मारिआ.
(या चित्रपटाला बर्लिन महोत्सवात नामांकन होतं.)

वाचने
6620
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
एखाद्या पुरुषाशी विवाहबाह्य संबंध ठेवण्यासारखं हे असतं.
मस्तच ओळख आणि धन्यवाद, जंतु.
इतक्या छान चित्रपटाची ओळख
मस्त ओळख
परिपूर्ती
नोकरी करत असल्यास गोष्ट वेगळी
In reply to परिपूर्ती by नंदन
चित्रपट पहावासा वाटतो आहे
ओळख आवडली
चांगली ओळख
नेटफ्लिक्सवर नाही
In reply to चांगली ओळख by निनाद
जालावर
In reply to नेटफ्लिक्सवर नाही by शुचि
चित्रपटाचं कथानक आवडलं आणि
चिंतातुर जन्तू छान आहे हा चित्रपट
पहायलाच हवा हा चित्रपट.
चिंजं
सहमत आहे!
In reply to चिंजं by सहज
छान परीक्षण. सहज यांच्या
भर आहे तो स्वतःच्या आनंदाची
नेफरटिटी....एक प्रतीक
धन्यवाद
In reply to नेफरटिटी....एक प्रतीक by इन्द्र्राज पवार
एका सुंदर चित्रपटाची तितकीच
मलापण! इंद्रानी उलगडून
In reply to एका सुंदर चित्रपटाची तितकीच by मस्त कलंदर
अरेच्या, हे तर चित्रपट
धन्यवाद
सुरेख ओळख! इन्द्रराज यांचा
'पझल' आणि स्त्रीची भीती...!!
'गृहप्रवेश'
In reply to 'पझल' आणि स्त्रीची भीती...!! by इन्द्र्राज पवार
मस्तच........!