✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक कहाणी (प्रेम) ३

च
चिप्लुन्कर यांनी
Sat, 01/08/2011 - 17:12  ·  लेख
लेख
साधारण आठवड्याच्या विश्रांती नंतर मी पुन्हा कॉलेज ला फ्रेन्डशिप डे चा मुहूर्त पकडून गेलो. पहिले काम त्या परीला शोधणे हे होते . एक पायाला प्लास्टर होते साजन चित्रपटाच्या संजय दत्त सारखी आमची कॉलेज ला इंट्री झाली . मित्राच्या खांद्याचा आणि काठी चा आधार घेऊन आम्ही आमचे कॅन्टीन मधील आसनावर विराजमान झालो . अनेक मित्र मैत्रिणी येऊन चौकशी करून गेले पण जिची मी वाट पाहत होतो ती काही आली नाही . पूर्ण युथ फेस्टिवल ती मला एक क्षण दिसली नाही . नाताळ संपला आणि पुन्हा कॉलेज सुरु झाले. हि वेळ सर्वांची येणाऱ्या परीक्षांच्या तयारीची होती आणि माझी मात्र येणाऱ्या १४ फेब्रु. ला तिला मी तिच्यावर प्रेम करतो ते सांगायची होती. मात्र परत माशी शिंकली . ती माझ्याशी बोलत नव्हती आणि तिच्याशी संपर्क करायला काही मार्ग मिळत नव्हता. त्यातच राहिलेले मित्रांचे वाढदिवस एकदम साजरे करण्याचे प्लान्स आमच्या कंपूत सुरु झाले. शेवटी चिपळूण च्या एका (सु) प्रसिद्ध हॉटेलात जाऊन पार्टी करायचे ठरले. त्याप्रमाणे आम्ही सगळे ठिकाणी पोचलो . आत जाताच एका मुलाने मित्रा माचीस आहे का असे मला विचारले , "नाही " असे मी त्यास उत्तर दिले. त्यात भर म्हणून कि काय लगेच सोबत च्या मित्राने , " हा फक्त बिअर पितो , धूर काढत नाही" असे उत्तर दिले. यावर तो माझा मित्रा (?) फक्त हसला. मी व माझे मित्र जाऊन एका टेबलावर बसलो . पार्टीत माझे लक्ष नव्हतेच आणि मी फक्त माझ्या प्रेमाचे काय होणार याचाच विचार करत होतो. त्या वातावरणाचा कंटाळा आला म्हणून मी बाहेर आलो आणि जाऊन बाहेरील बागेतील एका बाकड्या वर बसलो . इतक्यात तो माझा मित्र (?) येऊन शेजारील बाकड्यावर बसला आणि "मला कृपया रस्त्यावर एक रिक्षा थांबून द्याल का? "अशी विनंती करू लागला . मी प्रथम त्यास टाळले पण नंतर त्याची अवस्था बघून मी त्यास रिक्षा थांबवून द्यावी या विचाराने रस्त्यावर आलो . त्याची अवस्था पाहून कोणी त्यास घेऊन जाण्यास तयार होत नव्हते. मी त्याला रस्त्या शेजारील दगडावर बसवून त्याची चौकशी केली. तो परीच्या घराजवळ राहतो हे जेंव्हा मला कळले तेंव्हा मी माझ्या प्रेमात पुढे मागे हा कुठे तरी उपयोगी पडेल म्हणून याला आपणच सोडूया असा विचार करून त्याला घेऊन त्याच्या घरी निघालो. वाटेत त्या माझ्या मित्राने (?) दोनवेळा तो जे प्यायला ते माझ्या शर्टला पाजले. तो वास सहन करत मी कसे बसे त्याचे घर शोधून त्यास घरा पर्यंत सोडले. अचानक तो मला म्हणाला ," मित्रा , जरा हळूच जाऊन ती खिडकी ठोक, माझी बहिण उठेल आणि दार उघडेल". मी जरा गडबडलो , एकतर रात्रीची १ वाजताची वेळ आपण ह्याला नीट ओळखत नाही आणि याच्या बहिणीच्या खोलीची खिडकी आपण ठोकणार. मी जरा धास्तीने त्याला विचारले, "अरे मित्रा हेच घर आहे ना तुझे ? मला मार खायला लाऊ नकोस ." तो म्हणाला ," ठोक तू हळूच". मी जरा घाबरत ती खिडकी ठोकली, दरवाज्या बाहेरचा दिवा लागला आतून आवाज आला , " अथर्व दादा तूच आहेस का ? " . " होय, मीच आहे" इति अथर्व. दरवाजा उघडला. अथर्व आत गेला आणि "अग त्या बाहेरच्या माझ्या मित्राला थोडे पाणी दे ." असे त्याच्या बहिणीला म्हणाला. त्याची बहिण बाहेरचा दादाचा मित्र कोण हे पाहायला आली आणि तिला पाहताच मी गार पडलो. ती दुसरी कोण नसून परी होती. क्रमशः

Book traversal links for एक कहाणी (प्रेम) ३

  • ‹ एक कहाणी (प्रेम) २
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3402 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

या ठिकाणी अशी कथा टंकायची असते ना?

चिप्लुन्कर
Sat, 01/08/2011 - 17:22 नवीन
या ठिकाणी अशी कथा टंकायची असते ना? जाणकार मार्ग दाखवतील अशी आशा आहे. गेले ३ भाग मी कलादालनात टाकले नी " हि कथा इथे कशाला? " असा प्रतिसाद मिळाला होता . या वेळी शक्य तितका शुद्ध लेखनाचा प्रयत्न केला आहे. नंदादीपचे आभार त्याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आपला चिपळूणकर. महा -०८
  • Log in or register to post comments

छान...

नन्दादीप
Sun, 01/09/2011 - 11:16 नवीन
मस्त जमलय.......प्रगती आहे मित्रा...असाच सपाटा चालू ठेव...... >>>>नंदादीपचे आभार त्याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कसच...कसच....पार लाजेने चूर झालो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिप्लुन्कर

अरे वा..... हे लिखाण वाचून

विजुभाऊ
Sat, 01/08/2011 - 18:01 नवीन
अरे वा..... हे लिखाण वाचून एका त्रीशतकी काकांची आठवण आली.
  • Log in or register to post comments

छान...

चिगो
Sat, 01/08/2011 - 22:24 नवीन
चांगलं लिहीताय तुम्ही, आणि शुद्धलेखनही सुधारलंय बरेच... पण एवढे छोटे छोटे भाग का टाकताय? थोडे मोठे भाग टाका की राव...
  • Log in or register to post comments

तूम्च्या कथा बाव फारच ह्या असतात

आत्मशून्य
Sun, 01/09/2011 - 02:14 नवीन
म्हणूनच तर कही काही आवडूनही जातात
  • Log in or register to post comments

च्च च्च च्च च्च मित्राचीच

विनायक बेलापुरे
Sun, 01/09/2011 - 07:29 नवीन
च्च च्च च्च च्च मित्राचीच बहिण निघाली का ? होमवर्क नीट केला नाही :(
  • Log in or register to post comments

म्हणजे सॅड एंडीग आहे कथेला

आत्मशून्य
Mon, 01/10/2011 - 00:18 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक बेलापुरे

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा