कमाई
अरे **व्या , अजून कुठे आहेस ? वेळणेश्वर ला काय तुझा बाप येणार आहे का आत्ता ? विशाल ने जरा घुस्शात च फोन वर विचारले पण पलीकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्या मुले विशाल रागात गुहागर कडे निघाला.
आज त्याचा २७ वा वाढ दिवस आणि तोच त्याला अमेय या बालमित्र सोबत वेळणेश्वर ला दोघांची लाडकी किंगफिशर पिऊन साजरा करायचा होता पण अमेय मात्र त्याच्या राणी सोबत गायब झाला होता. वास्तविक राणी आणि विशाल हे पहिले प्रेमी पण अमेय हा राणी ला भेटला त्या दिवसा पासून राणी मात्र विशाल ला कल्टी देऊन अमेय सोबत वेळ घालवू लागली पण विशाल मात्र अमेय सोबत असलेल्या मैत्री मुले आणि फक्त एका मुलीसाठी मैत्री तुटून जाऊ नये म्हणून शांत राहिला .
पण आज विशाल नेहमी प्रमाणे वागत नव्हता . सकाळी घरून निघताना काही ठरवून निघाले ला तो आता खूप गंभीर होऊन विचार करत होता .
पुन्हा एकदा मोबाईल वर नजर टाकून काही मनाशी ठरून त्याने बाइक दामटवली .
अमेय इकडे विशाल चा फोन ठेवताच घरून निघाला आणि मनात विचार करत होता कि मार्गाताम्हनेत पोचून विशाल ला फोन करून सांगू कि स्पॉट वर ये.
अमेय ने अमित आणि बाळा ला गोळा केले आणि ते लोक वेळणेश्वर ला जाण्यास निघाले . अमेय वाटेत विशाल ला सारखा मोबाईल लावत होता पण काही लागत नव्हता . " साला हे डोकोमो पण अशी दळीद्री सेवा पुरवतील वाटला नव्हते" . अमित म्हणाला "अरे अमेय पण तू बोलला आहेस ना विशाल ला कि आपण स्पॉट वर भेटू म्हणून?" " अरे सकाळी राणी कावली होती कि त्या बेवड्या सोबत जाऊ नको आपण पिक्चर ला जाऊ. साला तिला वेळ दिला कि हा पेटतो आणि त्याला दिला कि ही" अमेय आज जरा राणी वर जास्तच भडकला होता हे सर्वांच्या लगेच लक्षात आले.
"आपण चहा मारू या का?" बाळा ने अमेय ला विचारले . " हलकट माणसा सकाळी २ वडा पाव आणि कटिंग मारलीस ना आता जरा त्या विशाल ला शोधू मग तू पी कटिंग आम्ही भिडवतो ग्लास " अमेय उत्तरला.
वेळणेश्वर च्या स्पॉट वर विशाल ची गाडी दिसताच अमेय च्या जीवात जीव आला " ही बघ राणी पण पहिल्या राजाची असे बाळा ने विशाल ची गाडी अमेय ला दाखवत खिजवले ".
अरे पण विशाल कुठाय ? चला रे त्याला शोधू असे म्हणत सर्व जण चहू कडे निघाले.
अमित ...... अमित ....... अमित ...... इकडे ये लवकर, अमेय धाव इकडे .
बाळा ची हाक ऐकून सर्वजण सुरु बनात धावले.
एका सृरूच्या झाडा खाली पडलेल्या निष्प्राण देहाला पाहून अमेय तर मटकन खाली बसला , अमितला ही काहु सुचे नासे झाले .
काही दिवस लोटले आणि एक दिवस बाळा एक चिठी घेऊन अमेय ला भेटला आणि म्हणाला अमेय ही चिट्ठी वाच.
प्रिय अमेय ,
मी तुझ्या आणि राणी मध्ये मोठे अडचण आहे हे मला माहित आहे पण मी राणी ला विसरू शकत नाही. कारण ते माझे पहिले प्रेम होते आहे आणि राहील . मी या वर्षी तुम्हा दोघांच्या आयुष्यातून कायम चे निघून जाणार आहे पण तू मात्र तिला शेवट पर्यंत सांभाळशील असे आशा आहे तुम्हा दोघान साठी म्हणून मी एक भेट सुरु बनात ठेवली आहे मी जिथे तुम्हाला शेवट भेटेन त्या ठिकाणी फुटभर खोल मी भेट ठेवली आहे. तुम्हा दोघांचे प्रेम वाढो हे माही मनोमन इच्छा आहे. राणी मला कधीच समजू शकली नाही आणि तू मला समजून पण दुरावलास. मी शेवटी पुन्हा अनाथ झालो आता हे एकटे पण सहन होत नाही. पुन्हा पुढल्या जन्मी भेटू.
तुझा (प्रिय ) मित्र ,
विशाल.
त्या रात्री अमेय झोपू शकला नाही विशाल चे आई बाबा वारल्यावर त्याने विशाल ची पूर्ण जवाबदारी घेतली होती आपल्या आई वडिलांना त्याने सांगून विशाल ला एक चागली नोकरी पण दिली होती. त्याची पूर्ण खात्री होती कि विशाल आता सेटल झाला आहे. घर गाडी या गोष्टी तर त्याच्या कडे होत्याच पण विशाल ला लवकर लग्नाच्या बेडीत अडकवावे म्हणून तो विशाल साठी चागली स्थळे पाहत होता. रात्री उशिरा त्याचा डोळा लागला.
सकाळी बनात अमेय ने जाऊन त्याजागी खणून पाहिले त्यात एक पिशवी मिळाली त्यात एक सोन्याचे लॉकेट त्यात अमेय आणि राणी चे फोटो आधीच लावले होते आणि विशाल च्या गाडी घर आणि इतर कागद पत्रे होती . आणि एक कागदावर खालील मजकूर लिहिला होता . माझ्या सर्व आयुष्याची कमाई मी तुला देत आहे .
पाणावल्या डोळ्याने अमेय ने कागद पालटला तर मागे राणी चा फोटो तेच लोकेट घालून पण विशाल आणि तिच्या सोबत चा होता.
=======================================
हे माझे पहिलेच लेखन असून यात काही त्रुटी आढल्यास सांगाव्या . जाणकारान कडून मागदर्शन मिळवण्यास उत्सुक
आपला चिपळूणकर
महा - ०८
याद्या
2845
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
छान प्रयत्न.... अजून लिहित
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा
छान आहे
छान लिहिले आहे .. येवुद्या
येउदे!
खुपच छन
चांगला प्रयत्न आहे, मराठी
त्रूटी आढळल्या नसल्याने
लिहित रहा. चांगली आहे कथा.
छान