एक कहाणी ( प्रेम) २
सोमवार सकाळ : गाडी आधल्या दिवशी मस्त घुवून करून आणलेली , मी पांढरा शर्ट आणि निळी जीन्स घालून ( कोणी तरी तेंवा सांगितले होते कि हे कॉम्बी. लई भारी मुलीना आवडते म्हणून.) . गाडी आणि स्वारी दोन्ही खुशीत .... कोलेज जवळ एका स्टाल वरून एक मस्त फ्रेंड शिप बेल्ट घेतला नी तिला क्लास सुटल्यावर गाठला . नशिबाने तेंवा रस्त्याला वर्दळ कमी होती . लई डेरिंग केले आणि म्हटला " माझ्याशी फ्रेंड शिप करशील का? " ती म्हणाली " नाही" . मी हिरमुसलो . परत घरी आलो . मित्रांनी सारखे फोन केले आणि बोलावले म्हणून निघालो . रस्त्यात जोरात पाऊस आला म्हणून गाडी रस्त्यावर लाऊन एका आडोश्याला थांबलो . काय भाग्य माझे... प्रत्यक्ष ती भिजत भिजत जात होती . मी धावत जाऊन तिला हाक देली ती दचकून थांबली . मी तिला म्हटले ," अगं पोरी भिजू नकोस इकडे आडोसा आहे थांब इथे थोडा वेळ ." तो आडोसा बराच मोठा होता त्यामुळे तिथे आम्ही आणि बरेच अजून काका... मामा ... सारखे लोक होतेच . काही वेळ झाला आणि पाऊस थांबायचे नाव घेत नवता. तिची चल बिचल सुरु झाली . मी तिला विचार ले , " काय झाले ? " ती उत्तरली ," लेक्चर ला उशीर होतोय. " कदाचित तिला अवघडल्या सारखे होत असेल म्हणून मी पावसात धावत जाऊन रिक्षा थांबवली ( आई शप्पत तेंवा आई साठी पण नाही हो एवडे कधी केले. पण आत्ता करतो ) . ते त्या रिक्षा ने ती निघून गेली. पाऊस कमी झाल्यावर मी पण कॉलेज कॅन्टीन ला गेलो आणि मित्रांच्यात बसलो. काही वेळानी ती आणि तिचा सर्व कंपू कॅन्टीन मध्ये आला . मी परत नेहमी प्रमाणे टक लाऊन ( नजर ठेऊन म्हणा ना. ) बसलो. तशी तिला माझी नजर तिच्यावर आहे हे कदाचित ठाऊक होते त्या मुळे ती अवघडून गेली होती. आणि मी तिला पाऊसात पाहिलेले रूप आठवत होतो . भिजलेले केस कपाळावरून निथालणारे पाण्याचे थेंब. आणि ती चे मुळचे सौंदर्य .
नंरात नवा कंपू म्हणून माझे सर्व मित्र त्या मुलींच्या घोळक्यात गेले नी ओळख करून घेण्यात गुंतले . मी ही त्यांना जाऊन जॉईन केले. त्यावेळी मात्र तिने माझ्या शी फ्रेंड शिप केली . आणि बेल्ट बांधून घेतला आणि मला पण एक बेल्ट बांधला सुद्धा . आमच्या मैत्रीची सुरवात तर झाली होती.
प्रतिक्रिया
गाडी आधल्या दिवशी मस्त घुवून
भेटला...
एक कहाणी (प्रेम) १
''लई भारी मुलीना आवडते
तिने माझ्या शी फ्रेंड शिप
संपादक मंडळाला विनंती आहे कि
वा ! पौगंडावस्थेची आठवण करुन
कलादालन ?
हे आणि काय आता?
हा घ्या फोटू गणपा काका