Skip to main content

चीझी स्प्रिंग ओनिअन ऑम्लेट

लेखक खादाड अमिता यांनी गुरुवार, 06/01/2011 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मुंबईत पण चक्क जरा थंडी वाजते. तेव्हा सकाळी एक मस्त 'आलं मारके' चहा आणि असं 'heartwarming' ऑम्लेट मिळालं म्हणजे 'मोगाम्बो बहुत खुश हुआ'! सामग्री: २ अंडी २ मोठे चमचे दूध १/४ कप कांद्याची पात, बारीक चिरलेली (अंदाजे एक मूठभर) १ मोठा चमचा, किसलेलं चीज चवीनुसार मीठ आणि मिरपूड १ चमचा तेल किंवा बटर कृती: - तेल वगळून बाकी सगळी सामग्री फेटून चांगलं मिक्स करून घ्या. - एका नोन स्टिक pan वर थोडं तेल किंवा बटर गरम करून त्यात अंड्याच मिक्स्चर ओता. - मग त्याला अगदी मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा. - आता त्या ऑम्लेट ला मधून फोल्ड करा आणि मुउसर शिजल्यावर गरम गरम सर्व्ह करा.

वाचने 5583
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

अनुमोदन आणि बिनशर्त पाठिंबा! पाकृंवर सेन्सॉरशिप आलीच पाहिजे. आमच्या वासना चाळवल्या जातात हे असले फोटो पाहून. ;-) अवांतरः असा नाष्टा तयार असेल तर भल्या पहाटेही आम्ही आनंदाने अंथरूण सोडू.

In reply to by नगरीनिरंजन

अनुमोदन आणि बिनशर्त पाठिंबा! बाकी अजुन काही बोलण्यासारखे रहात नाही :( - छोटा डॉन

तुमच्या या दूध मिसळण्याच्या आयडियेने ऑम्लेट मस्त फुगतं आणि लुसलुशीत होतं हे मी करुन पाहिलं आहे. इराणी (हाटेलवाले..!!) चोरतील ही पाकृ.. "ऑम्लेट्-बन" साठी .. त्याआधी कॉपीराईट करुन घ्या.. :)

In reply to by नंदिनी राणे

मला सॉया सॉस करता येत् नाही. मी ते विकत आणते. इथे http://www.wikihow.com/Make-Your-Own-Soy-Sauce दिलेली आहे. बघा उपयोगी आहे का.

(प्रयोगशील)बेसनलाडू फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे. (खवय्या)बेसनलाडू

नसलं तरी चालतं तुम्हाला? :P

In reply to by आनंदी गोपाळ

चवीनुसार मीठ आणि मिरपूड
लिव्हलय की. :) ए पर्‍या तुझी चाळीशी दे पाहू थोडा वेळ. नव गिर्‍हाईक आलय. ;)

तुमच्या या दूध मिसळण्याच्या आयडियेने ऑम्लेट मस्त फुगतं आणि लुसलुशीत होतं हे मी पण करुन पाहिलं आहे... मजा आ गया...