अँगल चे नॉमेन्केचर आल्फा,बिटा,थिटा हे मला माहीत आहे.
हे आल्फा मेल म्हणजे नेमके काय असते?
ह्याची व्याख्या काय?
ह्या मंडळीची नेमकी दिनचर्या काय असते?
ह्यांना हे नाव नेमके कशामुळे मिळते?
-----------------------------------------------------------------------------------------
रोज आपल्या बायको किंवा होणार्या बायकोकडुन जोडे खातो, खरे खुरे किंवा शाब्दिक.
आणि बिटा सारखा लाल लाल होतो तो बिटा मेल.
अगदी चांदीच्या ताटात वाढुन समोरुन वाढुन आले तरी त्याचा आस्वाद न घेउ शकणारा थिटा मेल.
पण हे आल्फाची व्याख्या काही माहीत नाही बॉ?
वाचने
7172
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकापेक्षा जास्त बायका ज्याला
एकापेक्षा जास्त बायका ज्याला असतात त्यो अल्फा मेल. ;-)
हा हा हा आता पोचलेल्या
हा हा हा
आता पोचलेल्या लोकांचे एक से एक प्रतिसाद येणार..
(विंगेत खुर्चीवर मांड ठोकुन बसलेला) -गणा
आल्फा मेल
https://www.buzzle.com/articles/alpha-male-characteristics.html
मराठी
जरा मराठी त सांगा की राव.
एवढी भारी ईंग्रजी कळत नाय राव.
बिपीन कार्यकर्ते आणि धमाल
बिपीन कार्यकर्ते आणि धमाल मुलगा यांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक.
???
तुर्त विचारात आहे.
मास्तरचा ह्यापुर्वीचा लेख आणि आत्ताचा हा लेख ह्यामुळं गोंधळून गेलो आहे.
अल्फा मेल हा इतरांपेक्षा
In reply to ??? by धमाल मुलगा
अल्फा मेल हा इतरांपेक्षा वेगळा असतो/ इतरांचे लक्ष्य वेधून घेण्याची हातोटी त्याच्या कडे असते.
आत्मविश्वासाचे तेज त्याच्या चेहेर्यावर झळकत असते. त्याचे चातूर्य स्त्रीयाना आकर्षीत करते.
अशी काहिशी व्याख्या त्या संस्थळावर दिलेली आहे.
पण मला वाटते अशा प्रकारचे मेल फक्त पाळण्यातच दिसतात.
जसजसे त्यांचे वय वाढते. पाय पाळण्याबाहेर येवू लागतात तस तसे त्यांचे अल्फा किरण विरळ होऊ लागतात.
मोठे झाल्यानन्तर ते वेंधळेपणामुळे इतरांचे लक्ष्य सहज वेधून घेतात. त्यांच्या चेहेर्यावरचे आत्मविश्वासाचे भाव फिके पडल्यामुळे उगाचच ते बावरलेले ( भिजलेल्या मांजरसारखे)दिसतात. ते नक्की काय करतील या चिंतेमुळे पत्नी त्यांच्या सोबतच रहाते.
अवांतरः अल्फा हा शब्द "अरे तो आला ;लपा " या वाक्याचा शॉर्ट फॉर्म असावा
"अल्फा" हा शब्द फाअल या
"अल्फा" हा शब्द फाअल या शब्दाचा अपभ्रंश आहे ज्याचा उगम फाअर अथवा फार या शब्दापासून झाला असावा असे काही (टिंबकटूचे)भाषाशास्त्रज्ञ मानतात.
म्हणजे जे पुरुष फार वात्रट, फार चावट, फार खोडकर, फार गंमतीशीर, फार फार फार असे असतात त्यांना अल्फा मेल म्हणतात.
लाफा मेल
कदाचित अल्फा हा लाफाचे भ्रष्ट स्वरूप असावे.
म्हणजे, एखादा पुरुष जो स्वतःला अतिशय केपेबल किंवा ही-म्यान किंवा श्मार्ट समजत असतो. सर्व संकटातून आपणच इतरांची सुटका करू शकतो आणि सर्व प्रश्नांवर आपण तोडगा काढू शकतो अशी त्याची समजूत असते आणि इतरांना अशा मूर्खाला दोन चार लाफा द्याव्याशा वाटत असतात, ते या माणसाला अल्फा मेल म्हणत असावेत.
बाकी लाफा मारणे म्हणजे नेमके काय? धोपटणे आणि थापा मारणे या दोन्हीसाठी त्याचा वापर होतो असे वाटते.
अच्छा.....!! म्हणजे आमचा बॉस
In reply to लाफा मेल by प्रियाली
अच्छा.....!! म्हणजे आमचा बॉस का गं ताऊ..... आपलं ताई ?? :D
तुमचाच नै
In reply to अच्छा.....!! म्हणजे आमचा बॉस by सूड
जगातले सर्व मेल-बॉस असे असतात असे आपले मला वाटते. ;)
सर्व मेल बॉसांची क्षमा मागते.
जगातले सर्व मेल-बॉस
In reply to तुमचाच नै by प्रियाली
चूकून मेल-बॉक्स असे वाचले ;) ....... म्हणून मि मेल-बॉक्सची क्षमा मागतो.
बादवे, आम्ही तर फीमेल बॉसना अल्फा-मेल असे संबोधतो. अर्थात रॉखी सॉवंत, बॉबी डॉर्लींग या सूध्दा अल्फा-मेल सदरात मोडतात.
हा हा हा मस्त
In reply to लाफा मेल by प्रियाली
हा हा हा
मस्त व्युत्पत्ती.
किंवा असा मनुष्य पाहुन महाराष्ट्रातील जुन्या काळातील बायका "आला पहा मेला " असं म्हणत असतील. कुणा इंग्रजाने ते ऐकुन तसेच उच्चारण्याचा प्रयत्न करता करता
आला पहा मेला == आल्पाहा मेला == अल्फाहा मेल == अल्फा मेल
असे झाले असावे.
अधिक प्रकाश जाणकार टाकतील
जबरा ...
In reply to हा हा हा मस्त by अवलिया
=)) =)) =))
जबरा ....
नान्या लै हुशार आहे असा आमचा पहिल्यापासुन संशय होता :)
- छोटा डॉन
संशेव?
In reply to जबरा ... by छोटा डॉन
आम्हाला कात्रीच होती.
च्यायला, नानबा, येऊद्या आता मराठीतून इंग्रजीत नेलेली शब्द व्युत्पत्ती! :D
नानांनी केलेली व्युत्पत्ती
In reply to हा हा हा मस्त by अवलिया
नानांनी केलेली व्युत्पत्ती मस्त! "आला पहा मेला" हा हा :-D
आला पहा मेला == आल्पाहा मेला == अल्फाहा मेल == अल्फा मेल ....
In reply to हा हा हा मस्त by अवलिया
ह ह पु वा!
नाना तुम्ही जिंकला !
In reply to हा हा हा मस्त by अवलिया
नाना तुम्ही जिंकला !
जोरदार ठ्ठ्यॉ!!! =)) =) =))
In reply to हा हा हा मस्त by अवलिया
जोरदार ठ्ठ्यॉ!!!
=)) =) =))
तरीच!
In reply to हा हा हा मस्त by अवलिया
आला पहा मेला == आल्पाहा मेला == अल्फाहा मेल == अल्फा मेल
तरीच नानाचा कोणताही लेख आला की काही संपादक 'अल्फा मेल, अल्फा मेल' असं पुटपुटतात असं ऐकलं होतं बॉ!!!!:)
-प्रकाश जाणकार
(डांबिसा, तुकां काय खातां रद्द करांन घेवंचा आसां? वशाड मेलो!!!:))
हम्म्म्म्म्म्म आपणाला बराच सराव दीसतोय अल्फा मेल ऐकाय्चा ?
In reply to हा हा हा मस्त by अवलिया
:)
किंवा असा मनुष्य पाहुन
In reply to हा हा हा मस्त by अवलिया
आम्ही फक्त 'अल्फा क्यु ' अर्थात (alph Q) हाच शब्द एकुन होतो. एकदा हे निकनेम घेतले तर माझा आयपी बॅन झाला होता ३ दिवस ;)
=)) =)) =)) हहपुवा द्मु+१
In reply to हा हा हा मस्त by अवलिया
=)) =)) =))
हहपुवा द्मु+१
आला पहा मेला =))
In reply to हा हा हा मस्त by अवलिया
हा हा हा
In reply to हा हा हा मस्त by अवलिया
आला पहा मेला == आल्पाहा मेला == अल्फाहा मेल == अल्फा मेल
=) =) =)
च्च च्च..
In reply to लाफा मेल by प्रियाली
हे फारच पाशवी होतंय हां. ;)
मास्तर
तुम्ही हा प्रश्न कुठल्या 'अँगल'ने विचारलात त्यावर उत्तर अवलंबून आहे..
बाकी अवलियाशेठची व्युत्पत्ती एकदम खतरा..:D
ट्रेनिंग
ट्रेनिंग वगैरे घेवून अल्फा मेल होता येते का? सिस्को,माय्क्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन सारखे अल्फा मेल सर्टिफिकेशन आहे का?
(होतकरु) चिरोटा
बहुतेक सिंहांच्या प्रमुखाला म्हणतात बॉ...
मी तर वाचलं होतं की, खऱ्या-खुऱ्या ( मनमोहन नव्हे!!) सिंहाच्या प्रमुखाला किंवा त्या कळपाच्या सर्वात शक्तिमान प्राण्याला अल्फा मेल म्हणतात !
दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच
In reply to बहुतेक सिंहांच्या प्रमुखाला म्हणतात बॉ... by दैत्य
दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच नाय वो कुठल्याही कळपात रहाणार्या प्राण्याच्या त्या त्या कळपातल्या सर्वात 'शक्तिमान' नर-प्राण्याला अल्फाहा मेला म्हणतात ;)
(नानबा तुझी व्युत्पत्ती एकदम चपलख आहे :) )
नाय हो
In reply to बहुतेक सिंहांच्या प्रमुखाला म्हणतात बॉ... by दैत्य
सिंहाच्या एका कळपात एकच सिंह असतो सायबा, बाकी सम्द्या शिंविणी नि चिल्लीपिल्ली. त्यामुळे अल्फा, बीटा भानगड नस्तीया. लांडग्यांच्या, माकडांच्या कळपात असते ही भानगड. जरा धाकल्या माडगूळकरांचे 'सत्तांतर' वाचा किंवा फार्ले मोवाचे 'नेवर क्राय वुल्फ'.
रमतारामशी सहमत. बाकी
In reply to नाय हो by रमताराम
रमतारामशी सहमत.
बाकी माडगूळकरांचे 'सत्तांतर' एकदम मस्तच.
किंवा जगदीश गोडबोल्यांचे
In reply to नाय हो by रमताराम
किंवा जगदीश गोडबोल्यांचे ' लांडगा आला रे आला ' - नेव्हर क्राय वुल्फ चे भाषांतर.
दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच
दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच नाय वो कुठल्याही कळपात रहाणार्या प्राण्याच्या त्या त्या कळपातल्या सर्वात 'शक्तिमान' नर-प्राण्याला अल्फाहा मेला म्हणतात
अहो गणपाभौ , शिंव्ह म्हंजी बगा तसंबी सगल्यात पावरबाज की राव ! आता ह्ये सांगा, बळीच्या बकऱ्याला पावर असती का ? त्याला कोन म्हननार अल्फाहा !
दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच
In reply to दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच by दैत्य
दैत्यम्हाराजं केवळ शिंव्हच नाय वो कुठल्याही कळपात रहाणार्या ( जंगली ) प्राण्याच्या त्या त्या कळपातल्या सर्वात 'शक्तिमान' नर-प्राण्याला अल्फाहा मेला म्हणतात
हॅ हॅ हॅ....... दैत्य बुवा पक्के वस्ताद हो तुम्ही. तवेडा कंसातला शबुद मगाशी घाई घाईत टायपाचा र्हायला.
धनंजयचा प्रतिसाद वाचण्यास
धनंजयचा प्रतिसाद वाचण्यास उत्सूक आहे.
- - -
आर्रर्र - हा प्रतिसाद विजुभाऊंच्या "मी मी आहे तर तुम्ही कोण?" चर्चासत्रातला इथे कसा पडला?
पण "अमुकतमुक यांचा प्रतिसाद वाचण्यास उत्सूक आहे" म्हणजे "नमस्कार" या नव्या मिपा-रूढीस अनुसरून वरील वाक्य लिहिले आहे.
अवांतर :
* समूह करून राहाणार्या काही जनावरांच्या समाजात प्रत्येक जनावराच्या सामाजिक महत्त्वाची उतरंड (क्रम) असते. क्रमाचा संदर्भ ग्रीक अक्षरमालेप्रमाणे, "आल्फा, बेटा, गामा..." वगैरे देण्याची प्रथा आहे. त्या क्रमातील सर्वोच्च जनावर नर असल्यास त्याला "आल्फा मेल" म्हणतात. काही जनावरांमध्ये "आल्फा फीमेल" असतात. आल्फा जनावराला समाजात मिळालेल्या अन्नाचा पहिला वाटा खाण्यासाठी, संभोगाकरिता जोडीदार निवडण्यासाठी, वगैरे अग्रक्रम असतो.
"आल्फा मेल" ही प्राणिशास्त्रातील कल्पना मनुष्यांच्या वर्णनात उपमा म्हणून वापरतात. मनुष्यांच्या समाजात जो नर अशा आत्मविश्वासाने वागतो की "नेतृत्वामुळे मिळणारे आनुषंगिक कौतूक आपल्याला लोकांनी देणे आहे" त्याला "आल्फा मेल" म्हणतात. *
आवांतर आवडले गुरुजी
In reply to धनंजयचा प्रतिसाद वाचण्यास by धनंजय
आवांतर आवडले गुरुजी :)
हा बघा
या वीराला अल्फा मेल म्हणता येईल का हो प्रभुजी?
मास्तर...
एक राहिलं ना तुमचं....हे सगळं विचारताना गॅमा पण काय असतं?
- (रेडियोस्कोपिक) डॉ. वाटी...
?????
मिपावरचे आल्फा मेल कोण?
म्हणजे मिपावर काही ठराविक
In reply to ????? by विनायक प्रभू
म्हणजे मिपावर काही ठराविक 'मेलांच्य' मागे धावणार्या माद्या (मोठ्या नंबराने) आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का हो प्रभुमास्तर??? फारच क्रिप्टीक ब्वॉ तुम्ही.
छ्या..
In reply to ????? by विनायक प्रभू
मास्तर तुम्ही दरवेळेला भलताच अँगल घेता(विचारात)...
अता परत नव्या उत्तराच जुगाड कराव लागेल..
बाकी चालू दे..