लतादेवीची आरती
लेखनविषय:
जय देवी जय देवी जय लता देवी
शंभर वर्षे माझेही करियर करवी |
त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही
सारे श्रमले तरी तू गात राही
काही विवाद करिता पडले प्रवाही
तुझा गायन निर्झर अखंड हा वाही |१| जय देवी...
सांगलीवरुनी उड्डाण मुंबई-पंढरी
किती गायिकांची भरली शंभरी
वीणा, नुपूर आणि आली बासुरी
तुझिया वाणी आल्या परा वैखरी |२| जय देवी....
तुझिया कृपेने सारे मंगल होऊ दे
पेडर रोडवर माझा बंगला होऊ दे
भारतरत्न माझ्या घरी येऊ दे
'कोल्हापूर-नंदन' सुखिया होऊ दे |३| जय देवी...
वाचने
1213
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
बर्र!!!! चालूद्या!
होईल हो तुमचाही बंगला..! :)
मस्त ,,,मस्त....
बर्र!!!! चालूद्या! होईल हो